मुंबई : साऊथ सिनेसृष्टीतील सुपरस्टार नागार्जुन हे आज २९ ऑगस्ट रोजी आपला वाढदिवस साजरा करत आहे. वाढदिवसाच्या या खास प्रसंगी त्यांच्या 99व्या चित्रपटाची घोषणा करण्यात आली आहे. यासोबतच त्याच्या चित्रपटामधील फर्स्ट लूक पोस्टर आणि टायटलही देखील शेअर केले गेले आहे. नागार्जुनचा 'ना सामी रंगा' हा चित्रपट जानेवारी 2024 मध्ये रिलीज होणार आहे. 'ना सामी रंगा' या चित्रपटातून कोरिओग्राफर विजय बिन्नी हे पहिल्यांदा दिग्दर्शनात उतरणार आहे. या चित्रपटाची निर्मिती श्रीनिवास सिल्व्हर स्क्रीनच्या बॅनरखाली करण्यात आली आहे. 'ना सामी रंगा'मधील पोस्टरमध्ये नागार्जुनचा लूक पूर्णपणे वेगळा आहे. या लूकमध्ये नागार्जुनची केस आणि दाढी विस्कटलेली आहे. याशिवाय त्याच्या हातात बिडी जळताना दिसत आहे.
- " class="align-text-top noRightClick twitterSection" data="">
नागार्जुनचे चित्रपटसृष्टीतील पदार्पण : नागार्जुनने 1967 मध्ये 'सुदीगुंडलू' चित्रपटाद्वारे बालकलाकार म्हणून चित्रपटसृष्टीत पाऊल ठेवले. यानंतर त्यांनी तमिळ, तेलुगु आणि हिंदी चित्रपटामध्ये काम केले. नागार्जुनने 'शिवा' चित्रपटातून हिंदी चित्रपटसृष्टीत पदार्पण केले. त्यानंतर 'गुन्हेगार', 'खुदा गवाह' या चित्रपटात काम करून बॉलिवूडमध्ये देखील नाव कमाविले. दरम्यान त्यानंतर नागार्जुनने तब्बूसोबत 2 तेलुगु चित्रपटांमध्ये काम केले. त्यानंतर त्यांच्या अफेअरच्या बातम्या येऊ लागल्या नागार्जुन हे तब्बूसोबत रिलेशनशिपमध्ये होते असे बोलले जाते. नागार्जुनचे लग्न झाले असताना देखील त्याने तब्बूला डेट केले होते. तब्बू नागार्जुनची पत्नी अमलाची मैत्रीण होती.
तब्बूने कॉफी विथ करण या शोमध्ये केला खुलासा : जेव्हा तब्बू करण जोहरच्या 'कॉफी विथ करण' या शोमध्ये आली होती, तेव्हा तिला याबद्दल विचारण्यात आले होते. यावेळी तब्बूने म्हटले , 'नागार्जुनसोबत माझे सर्वात महत्त्वाचे नाते होते. 'माझे त्याच्याशी असलेले नाते खूप गोड आहे आणि ते कधीही बदलणार नाही. माझ्याकडे त्या नात्यासाठी टॅग नाही, परंतु मी याबद्दल काहीही करू शकत नाही'. असे तिने सांगितले होते. आजही नागार्जुनचे खूप फॅन फॉलोविंग आहे. तसेच तब्बू देखील हिंदी चित्रपटसृष्टीत आता खूप सक्रिय आहे. तब्बू अनेक हिंदी आणि तेलुगु चित्रपटामध्ये दिसते.
हेही वाचा :