कान्स (फ्रान्स) - युक्रेनमधील एका अर्धनग्न महिलने कान्सच्या रेड कार्पेटवर निदर्शने केली होती. युक्रेनमध्ये सुरू असलेल्या महिलांवरील बलात्काराचा विरोध करण्यासाठी त्या महिलेने कान्स फिल्म महोत्सवातआपला आवाज उठवला होता. त्यानंतर दोनच दिवसांनी पुन्हा एकदा 75 व्या कान्स चित्रपट महोत्सवात रविवारी आणखी एक व्यत्यय आला.
कान्सच्या रेड कार्पेटवर महिलांचा एक गट दाखल झाला. त्या सर्वजणींनी काळे कपडे घातले होते. हाता बॅनर घेऊन या महिला अवतरल्या आणि काळ्या धुराचे ग्रेनेड सोडले. त्यांच्याकडे असलेल्या बॅनरवर महिलांच्या नावांची एक लांबलचक यादी होती, ज्यामध्ये 'ए वुमन' हे शब्द ठळक होते. बॅनरवरील नावे कौटुंबिक हिंसाचाराच्या प्रकरणांमध्ये फ्रान्समध्ये पुरुषांकडून मारल्या गेलेल्या महिलांशी संबंधित आहेत.
डेडलाइननुसार, ही संपूर्ण घटना 'होली स्पायडर' या स्पर्धेच्या चित्रपटाच्या प्रीमियरच्या वेळी घडली आणि त्याचे व्हिडिओ ट्विटरवर शेअर करण्यात आले. 'होली स्पायडर' हा इराणमधील एका स्त्रीबद्दलचा स्त्रीवादी थ्रिलर चित्रपट आहे जो वेश्यांचा खून करणाऱ्या पुरुषाचा माग काढतो.
हेही वाचा - कोर्टनी कार्दशियन, ट्रॅव्हिस बार्कर यांनी तिसर्यांदा इटलीत केला शाही विवाह