ETV Bharat / entertainment

Farrey teaser Out : बॉलीवूडमध्ये आणखी स्टार कीडचे पदार्पण, सलमान खानची निर्मिती असलेल्या चित्रपटाचा टीझर प्रदर्शित - फर्रेचा टीझर प्रदर्शित

Farrey teaser Out : सलमान खानची भाची अलिझेहचा पहिला चित्रपट 'फर्रे'चा टीझर रिलीज झाला आहे. या चित्रपटाच्या टीझरची प्रेक्षकांमध्ये चांगलीच चर्चा आहे. हा चित्रपट लवकरच रूपेरी पडद्यावर दाखल होणार आहे.

Farrey teaser Out
फर्रेचा टीझर रिलीज
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Sep 25, 2023, 8:39 PM IST

मुंबई - Farrey teaser Out : गेल्या काही दिवसांपासून अनेक स्टार किडची बॉलिवूडमध्ये एंट्री करत आहेत. दरम्यान आता सलमान खानच्या प्रोडक्शनमध्ये एक चित्रपटाची निर्मिती सुरू केली आहे . या चित्रपटाचं नाव 'फर्रे' असं असणार आहे. या चित्रपटाद्वारे सलमान खानची भाची अलिझेह अग्निहोत्री बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे. सध्या 'फर्रे' या चित्रपटाचा टीझर रिलीज झाला आहे, ज्यामध्ये अलिझेह इतर कलाकारांसह दिसत आहेत. हा अलिझेहचा पहिला बॉलिवूड चित्रपट आहे. त्यामुळे ती या चित्रपटासाठी खूप उत्सुक आहे. या चित्रपटाची स्टोरी परीक्षा पद्धती आणि अभ्यास करणाऱ्या मुलांच्या आयुष्यावर आधारित असणार आहे.

  • " class="align-text-top noRightClick twitterSection" data="">

'फर्रे' चित्रपटाचा ट्रिझर झाला रिलीज : 'फर्रे' हा चित्रपट थ्रिलर असल्याचं टीझरवरून दिसत आहे. या चित्रपटाच्या पहिल्या झलकनं इंटरनेटवर चर्चा सुरू केली. 'फर्रे' या चित्रपटाचे अनेक वापरकर्ते कौतुक करत आहेत. चित्रपटाचा टीझर लोकांचा उत्साह वाढवत आहे. सलमान खाननं त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर 'फर्रे' चित्रपटाचा टीझर शेअर केला आहे. हा टीझर चाहते खूप पसंत करत आहेत. भाईजान हा भाची अलिझेहला बॉलीवूडमध्ये पदार्पण करण्यासाठी पूर्ण पाठिंबा देत आहे. यापूर्वी सलमाननं आपल्या भाचीसाठी एक पोस्ट शेअर केली होती. सलमानची ही पोस्ट खूप हृदयस्पर्शी होती. यासोबतच 'फर्रे' या चित्रपटाकडून सलमान खानला खूप अपेक्षा आहेत.

'फर्रे' चित्रपटाची स्टारकास्ट : अलिझेह ही सलमान खानची बहीण अलविरा खान आणि अभिनेता अतुल अग्निहोत्री यांची मुलगी आहे. यापूर्वी अलिझेह आणि सलमान खान अंबानी कुटुंबाच्या गणपती पूजेमध्ये एकत्र दिसले होते. 'फर्रे' या चित्रपटाचे दिग्दर्शन राष्ट्रीय पुरस्कार विजेते दिग्दर्शक सौमेंद्र पाधी यांनी केले आहे. 'फर्रे'मध्ये अलिझेहसह जेन शॉ, साहिल मेहता, प्रसन्ना बिश्त, रोनित बोस रॉय आणि जुही बब्बर सोनी यांच्या महत्त्वाच्या भूमिका आहेत. 'फर्रे' हा 24 नोव्हेंबर 2023 रोजी रूपेरी पडद्यावर रिलीज होईल. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर किती धमाल करेल हे येणाऱ्या काळात समजेल.

हेही वाचा :

  1. Mission Raniganj Trailer : अक्षय कुमार स्टारर 'मिशन राणीगंज'चा ट्रेलर प्रदर्शित; पाहा व्हिडिओ
  2. Parineeti Chopra Raghav Chadha Wedding: परिणीती चोप्रा आणि राघव चड्ढा लग्नानंतर पहिल्यांदाच सार्वजनिकपणे दिसले एकत्र...
  3. Priyanka Chopra's mom Madhu Chopra : रागनितीचं लग्न चुकवण्यामागचं कारण आलं समोर ; प्रियांका चोप्राच्या आईनं केला खुलासा...

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.