ETV Bharat / entertainment

SRKs Jawan and Dunki : शाहरुखच्या जवान आणि डंकीसाठी चाहत्यांना करावी लागणार आणखी प्रतीक्षा - अ‍ॅटली कुमार

शाहरुख खानच्या आगामी दोन चित्रपटांच्या प्रदर्शनाच्या तारखा पुन्हा शेड्यूल होण्याची शक्यता आहे. पठाणनंतर, शाहरूखला मोठ्या पडद्यावर पाहण्यासाठी प्रेक्षकांमध्ये पुन्हा उत्सुकता निर्माण झाली आहे. चाहत्यांना मात्र किंग खानचे जवान आणि डंकी चित्रपटगृहात येण्यासाठी आणखी प्रतीक्षा करावी लागणार आहे.

जवान आणि डंकीसाठी चाहत्यांना करावी लागणार आणखी प्रतीक्षा

author img

By

Published : Mar 20, 2023, 8:19 PM IST

मुंबई - पठाण चित्रपटाने प्रेक्षकांना भुरळ घातल्यानंतर, शाहरुख खानचे दोन बहुप्रतिक्षित चित्रपट यावर्षी रिलीज होणार आहेत. बॉलिवूडच्या किंग खानकडे अ‍ॅटली कुमार यांनी जवान दिग्दर्शित केले आहे जो जूनमध्ये थिएटरमध्ये प्रदर्शित होणार होता, परंतु आता तो ऑक्टोबरमध्ये येण्याची शक्यता आहे. त्यानंतर शाहरुख खान आणि राजकुमार हिरानी यांचा डंकी हा चित्रपटाचे रिलीज डिसेंबर 2023 पासून पुढच्या वर्षी होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

  • " class="align-text-top noRightClick twitterSection" data="">

शाहरूखच्या आगामी चित्रपटांबद्दलच्या लेटेस्ट माहितीनुसार, जवान हा नियोजित तारखेपेक्षा जवळपास चार महिने उशिरा प्रदर्शित होण्याची शक्यता आहे. जवानच्या निर्मात्यांनी अद्याप चित्रपट संपवलेला नाही आणि आत्तापर्यंत, चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख ठरल्या प्रमाणे पूर्ण होण्याची शक्यता नाही कारण या चित्रपटात जास्त व्हिज्युअल इफेक्ट्ससाठी अजून काही काळ लाणार आहे.

निर्मात्यांनी अद्याप जवान चित्रपटाची नवीन रिलीजची तारीख जाहीर केलेली नाही. परंतु एसआरके आणि अ‍ॅटली ऑक्टोबर 2023 च्या रिलीजची योजना आखत असल्याची अटकळ पसरली आहे. जवान ऑक्टोबरमध्ये सिनेमागृहात आल्यास, हिराणीचा सोशल कॉमेडी डंकी 2024 च्या उन्हाळ्यापूर्वी रिलीज होण्याची शक्यता नाही. हे दोन्ही चित्रपट शाहरुखच्या यशाची हॅट्रीक साधणारे आहेत. गेली चार वर्षे शाहरुखला यश हुलकावणी देत होते. अकेर हा दुष्टचक्राचा फेरा पठाणने रोखला. पुन्हा एकदा शाहरुखच्या यशाने शिखर गाठले. आता त्याला पुन्हा यशाची कमान चढती ठेवायची आहे. म्हणूनच त्याने बॉलिवूडचे दिग्दर्शक राजकुमार हिराणी आणि साऊथचे दिग्दर्शक अ‍ॅटली कुमार यांच्यासोबत चित्रपटांची निर्मिती केली आहे. या दोन्ही दिग्दर्शकांचे आवर एकही चित्रपट फ्लॉप झालेला नाही.

जवानच्या रिलीजच्या पार्श्वभूमीवर एक मोठा प्रश्न उभा राहिला आहे तो म्हणजे सलमान खानचा चित्रपट टायगर 3. जवानच्या रिलीजच्या काही आठवड्यांपूर्वीच सलमान आणि कॅटरिना कैफ अभिनीत हा चित्रपट थिएटरमध्ये लागणार आहे. शिवाय, यात शाहरुख खान पठाणच्या भूमिकेतही खास दिसणार आहे. आता हे पाहणे मनोरंजक असेल की शाहरुख हा जवान आणि डंकी या चित्रपटांचा निर्माता देखील आहे तो टायगर 3 सोबत इतका लहान रिलीज विंडो शेअर करून त्याचा चित्रपट प्रदर्शित करण्याचा निर्णय घेऊ शकतो का हे पाहणे औत्सुक्याचे असेल.

हेही वाचा - Teaser Of Maharashtra Shaheer : मराठमोळ्या शाहिरी गाण्यांची पर्वणी असलेला महाराष्ट्र शाहीरचा टिझर रिलीज

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.