ETV Bharat / entertainment

Shubman Gill : स्पायडरमॅन चित्रपटाचे प्रमोशन करत असताना चाहत्यांनी शुभमन गिलला सारा अली खानच्या नावाने चिडवले - आवाज देणार

शुभमन गिल हा बॉलीवूड अभिनेत्री सारा अली खानसोबतच्या प्रेमप्रकरणासह विविध कारणांमुळे चर्चेत असतो. मात्र आता यावेळी तो स्पायडर-मॅन: अ‍ॅक्रॉस द स्पायडर-व्हर्स या चित्रपटाच्या हिंदी आणि पंजाबी व्हर्जनला आपला आवाज देणार या गोष्टीसाठी चर्चेत आला आहे.

Shubman Gill
शुभमन गिल
author img

By

Published : May 18, 2023, 6:22 PM IST

मुंबई - क्रिकेट सामन्यांमध्ये आपल्या कामगिरीने प्रत्येक भारतीयाला अभिमान वाटणारा क्रिकेटपटू शुभमन गिल हा बॉलीवूड अभिनेत्री सारा अली खानसोबतच्या प्रेमप्रकरणासह विविध कारणांमुळे चर्चेत असतो. शुभमन हा स्पायडर-मॅन: अ‍ॅक्रॉस द स्पायडर-व्हर्स या चित्रपटाच्या हिंदी आणि पंजाबी व्हर्जनला आपला आवाज देणार आहे. तसेच या या चित्रपटाचे प्रमोशन हे जोरदार पद्धतीने सुरू आहे. शिवाय इंस्टाग्रामवर पापाराझी अकाऊंटद्वारा एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये शुभमन मागून कारवर चढताना आणि स्पायडर-मॅन लँडिंगची प्रतिष्ठित मुद्रा करताना दिसत आहे. हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

खरचं सारा आणि शुभमन गिल करत आहे डेट : हा व्हिडिओ शेअर होताच सोशल मीडिया वापरकर्ते कमेंट विभागात रेड हार्ट इमोजी टाकले. एका वापरकर्त्याने लिहिले, शुभमन ऑन फायर (फायर इमोजीसह).' दुसर्‍याने आनंदाने लिहिले, 'स्पायडर मॅन मेरी ताकत का गलत इस्तेमाल हो राहा है' आणखी एकाने लिहिले, 'स्पायडर-मॅन अल्ट्रा लाइट. तसेच दुसऱ्या वापरकर्त्याने अभिनेत्री सारा अली खानला डेट केल्याबद्दल कमेंट करत क्रिकेटरला छेडत म्हटले, 'साराच्या घरी पण असेच जातो का ? त्यानंतर पुढे लिहले तुम्ही साराच्या घरी अशा प्रकारे जा. अशा अनेक प्रकारच्या कमेंट या पोस्टवर आहे. दरम्यान, शुभमन गिल आणि सारा अली खान काही काळापासून डेट करत असल्याचं कळतंय.

डेटिंगच्या अफवा : गेल्या वर्षी ऑक्टोबरमध्ये त्यांच्या डेटिंगच्या अफवा पसरल्या होत्या जेव्हा ते दोघे एकाच हॉटेलमधून बाहेर पडत असताना पापाराझींनी त्यांना पकडले होते. त्यानंतर एकदा दोघे फ्लाइटमध्ये स्पॉट झाले होते. शुभमनची अनेकदा साराच्या नावाने छेड काढली जाते.आता शुभमन गिल फिल्मी दुनियेत सामील होऊ शकतो असे चित्र यावेळी दिसत आहे. 'स्पायडर-मॅन: अक्रॉस द स्पायडर-व्हर्स'मध्ये चित्रपटात पवित्रा प्रभाकर भारतीय-स्पायडरमॅनच्या भूमिकेत दिसणार आहे. या चित्रपटाच्या निर्मात्यांनी सोमवारी याची घोषणा केली. सोनी पिक्चर इंन्टरमेंट इंडियाद्वारे देशभरात हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. हा चित्रपट किती बॉक्स ऑफिसवर कमाई करणार हे येणाऱ्या काळात समजेल. मात्र संध्याला या चित्रपटाचे प्रमोशन फार जोरदार होत आहे.

हेही वाचा : Ali Fazal in Hollywood : अली फजल हॉलिवूड चित्रपट कंदाहारसाठी सज्ज, दाखवला राकट आणि रांगडा लूक

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.