मुंबई : शाहरुख खानच्या बहुप्रतिक्षित अॅक्शन-थ्रिलर 'जवान' चित्रपटची वाट चाहते फार आतुरतेने पाहात आहेत. हा चित्रपट येत्या सप्टेंबर महिन्यात रूपेरी पडद्यावर प्रदर्शित होणार आहे. याआधी 'जवान' चित्रपटाचा प्रीव्ह्यू प्रदर्शित झाला होता. या प्रीव्ह्यूला प्रेक्षकांनी पसंत केले आहे. 'जवान' या चित्रपटाच्या प्रीव्ह्यूमध्ये शाहरुख खान हा मल्टीपल लूकमध्ये झळकला आहे. त्याचबरोबर या चित्रपट साऊथ अभिनेता विजय सेतुपती, प्रियामणी आणि नयनतारा देखील डॅशिंग लूकमध्ये दिसले आहेत.
जवान चित्रपट : दरम्यान या चित्रपटात 'दंगल गर्ल' सान्या मल्होत्राही ही देखील दिसणार आहे, तसेच चित्रपटाच्या प्रीव्ह्यूमध्ये दीपिका पदुकोणची देखील झलक दाखविण्यात आली आहे. या चित्रपटामध्ये संजय दत्तही महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहे. हा चित्रपट फार जास्त धमाकेदार असणार असे दिसत आहे, कारण या चित्रपटात अनेक कलाकार झळकत आहेत. दरम्यान आता एक बातमी ऐकण्यात येत आहे की, या चित्रपटात अभिनेत्री कियारा अडवाणीची एन्ट्री होणार असल्याचे बोलले जात आहे. कियारा ही चित्रपटात कॅमिओ करताना दिसणार असल्याचे बोलले जात आहे. जवान हा चित्रपट पठाण प्रमाणेच बॉक्स ऑफिसवर फार कमाई करेल, असे दिसून येत आहे.
- " class="align-text-top noRightClick twitterSection" data="">
जवान चित्रपटात कियारा अडवाणीची भूमिका काय असेल? : मीडिया रिपोर्ट्सनुसार, कियाराने 'जवान' चित्रपटात तिच्या कॅमिओ रोलसाठीचे शूट केले आहे. या चित्रपटातील एका गाण्यात ती कॅमिओ करताना दिसणार असल्याचे बोलले जात आहे. असे झाल्यास शाहरुखसोबत कियारा पहिल्यांदाच रूपेरी पडद्यावर एकत्र दिसणार आहे, मात्र या बातमीवर जवानच्या निर्मात्यांकडून कोणतेही अधिकृत माहिती समोर आलेली नाही. मात्र या वृत्ताचे खंडनही करता येणार नाही. कियारा आणि कार्तिक आर्यनचा चित्रपट सध्या रूपेरी पडद्यावर सुरू आहे. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर हिट ठरला आहे. याशिवाय या चित्रपटाने १०० कोटी क्लबमध्ये प्रवेश केला आहे. 'सत्यप्रेम की कथा' २९ जून रोजी प्रदर्शित झाला असून 'जवान' हा चित्रपट ७ सप्टेंबर रोजी प्रदर्शित होणार आहे.
हेही वाचा :