ETV Bharat / entertainment

Dunki teaser hype : 'डंकी'च्या टीझरमुळे इंटरनेटवर वादळ, शाहरुखच्या चाहत्यांसाठी गगन ठेंगणे ! - शाहरुख खान 58 वा वाढदिवस

रोमान्स किंग शाहरुख खानच्या वाढदिवसानिमित्त त्याच्या आगामी 'डंकी' चित्रपटाच्या बहुप्रतिक्षित टीझर रिलीज झाला आणि त्याच्या चाहत्यांचा आनंद गगनाला भिडला. राजकुमार हिराणी दिग्दर्शित 'डंकी' हा चित्रपट 22 डिसेंबरला प्रेक्षकांच्या भेटीस येतोय. पण त्याच्या ब्लॉकबस्टर असण्याची खात्री टीझर रिलीजनंतर त्याचे चाहते देत आहेत.

Dunki teaser hype
'डंकी'च्या टीझरमुळे इंटरनेटवर वादळ
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Nov 2, 2023, 4:22 PM IST

मुंबई - 2 नोव्हेंबर हा दिवस देशभरातील शाहरुखच्या चाहत्यांसाठी खूप खास आहे. एक म्हणजे आज 'किंग खान'चा वाढदिवस आहे आणि त्यामुळं उत्साहाचं एक वेगळं वारं फॅन्समध्ये संचारणं हे एखाद्या सणाच्या आनंदाइतकंच आहे. त्यावर सोने पे सुहागा म्हणजे त्याच्या राजकुमार हिराणीसोबतच्या पहिल्या 'डंकी' चित्रपटाच्या टीझरही रिलीज झालाय. हा चित्रपट 22 डिसेंबर रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. 'डंकी'मध्ये शाहरुख खान व्यतिरिक्त 'डंकी'त तापसी पन्नू, विकी कौशल, बोमन इराणी, सतीश शाह आणि धर्मेंद्र यांच्या प्रमुख भूमिका आहेत.

राजकुमार हिराणी दिग्दर्शित शाहरुख खानचा आगामी 'डंकी' या चित्रपटाच्या पहिल्या झलकेची चाहत्यांनी आतुरतेने वाट पाहिलीय. हे वर्ष शाहरुखच्या चाहत्यांसाठी एक रोमांचक प्रवास ठरलंय. कारण चार वर्षांच्या प्रदीर्घ प्रतिक्षेनंतर किंग खाननं एकाच वर्षात दोन सर्वकालीन ब्लॉकबस्टर चित्रपट दिलेत. ख्रिसमसच्या दिवशी 22 डिसेंबर रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणाऱ्या 'डंकी' चित्रपटचा आज टीझर रिलीज झाला आणि चाहत्यांना वेड लागणं बाकी राहिलंय.

'डंकी'च्या टीझर नंतर शाहरुखच्या चाहत्यांच्या आनंदाला सीमा राहिलेली नाही. 'तुम्ही एकवेळ बॉलिवूडला दुर्लक्षित करु शकता पंरतु शाहरुख आणि राजकुमार हिराणीच्या प्रतिभेला नाही', असं एकानं म्हटलंय. 'शाहरुख खान पूर्णपणे आपल्या भावनांशी निगडीत आहे आणि ही काही सोपी गोष्ट नाही.. आपल्या आई-वडिलांच्या काळापासून ते आता आपल्या हृदयावर राज्य करत आहे..तो सम्राट आहे..आमच्या हृदयाचा राजा जो गेली अनेक दशके आपले मनोरंजन करत आहे.', असं एका नव्या पिढीच्या चाहत्यानं म्हटलंय.

  • It’s unbelievable that so many of u come & wish me late at night. I am but a mere actor. Nothing makes me happier, than, the fact that I can entertain u a bit. I live in a dream of your love. Thank u for allowing me to entertain you all. C u in the morning…on the screen & off it

    — Shah Rukh Khan (@iamsrk) November 1, 2023 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

'एक अनिवासी भारतीय या नात्याने, तुमच्या चित्रपटांनी माझी ओळख निर्माण करण्यात आणि माझा भारतीय वारसा अभिमानाने व्यक्त करण्यास मला मदत केली आहे. एखाद्याला शाहरुख खानचे चित्रपट सुचवणं हे प्रेम, अभिमान आणि माझ्या सांस्कृतिक मुळांशी जोडलेले प्रतीक देण्यासारखं आहे.', असे एका एनआरआय चाहत्यानं लिहिलंय.

  • " class="align-text-top noRightClick twitterSection" data="">

'गेल्या काही वर्षांपासून बॉलिवूडमध्ये याच गोष्टीची उणीव जाणवत होती. सोनू निगम पुन्हा एकदा सोबत आलाय... योग्य कथा आणि चांगली गाणी असलेली हलकीफुलकी कॉमेडी फक्त छान आहे!! मला आशा आहे की राजू हिराणी आणि शाहरुख खान हे अजिंक्य होण्यासाठीची युती आहे', असंही एकानं म्हटलंय.

हेही वाचा -

  1. Shah Rukh Khan's Birthday:'जवान' दिग्दर्शक अ‍ॅटलीनं शाहरुख खानला वाढदिवसानिमित्त दिल्या शुभेच्छा; म्हटलं लव्ह यू सर...

2. Varun And Lavanya Marriage : चिरंजीवी आणि नागा बाबू यांनी सोशल मीडियावर वरुण तेज आणि लावण्याच्या लग्नाची फोटो केली शेअर

3. Happy Birthday Srk : शाहरुखचा थक्क करणारा अष्टपैलू प्रवास, रोमान्स किंग बनला अ‍ॅक्शन स्टार

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.