मुंबई - Dunki Success Party : बॉलिवूड सुपरस्टार शाहरुख खान स्टारर वर्ष 2023 चा 'डंकी'चा डंका अजूनही बॉक्स ऑफिसवर वाजत आहे. या चित्रपटाला रिलीज होऊन दोन आठवड्यांहून अधिक काळ लोटला आहे. हा चित्रपट 21 डिसेंबर रोजी रुपेरी पडद्यावर जगभरात प्रदर्शित झाला. 'डंकी'नं बॉक्स ऑफिसवर आतापर्यंत 400 कोटींचा टप्पा ओलांडला आहे. शाहरुख खानचे लागोपाठ तीन चित्रपट हिट झाले आहेत. आता या चित्रपटाच्या सक्सेस पार्टीचे काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल समोर आले आहेत. या फोटोंमध्ये शाहरुख खान अनिल ग्रोव्हर 'डंकी' चित्रपटाचा दिग्दर्शक राजकुमार हिराणी दिसत आहे.
-
Thank You each and everyone of you for showering your immense love to the film #Dunki and making it a Blockbuster Success ❤️
— Raj Kumaar Hirani (@RajKumaarHirani) January 5, 2024 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
Here are the some memorable captures from #DunkiSuccessParty ❤️#Dunki running successfully in cinemas near you, Book your tickets right away.… pic.twitter.com/fZIdQhSH6V
">Thank You each and everyone of you for showering your immense love to the film #Dunki and making it a Blockbuster Success ❤️
— Raj Kumaar Hirani (@RajKumaarHirani) January 5, 2024
Here are the some memorable captures from #DunkiSuccessParty ❤️#Dunki running successfully in cinemas near you, Book your tickets right away.… pic.twitter.com/fZIdQhSH6VThank You each and everyone of you for showering your immense love to the film #Dunki and making it a Blockbuster Success ❤️
— Raj Kumaar Hirani (@RajKumaarHirani) January 5, 2024
Here are the some memorable captures from #DunkiSuccessParty ❤️#Dunki running successfully in cinemas near you, Book your tickets right away.… pic.twitter.com/fZIdQhSH6V
'डंकी' चित्रपटाची सक्सेस पार्टी : बॉलिवूड अभिनेता सुनील ग्रोव्हरचा भाऊ अनिल ग्रोव्हरनं त्याच्या इंस्टाग्रामवर शाहरुख खान आणि चित्रपटाचे दिग्दर्शक राजकुमार हिराणी यांच्यासोबतचे काही फोटो शेअर केले आहेत. अनिलनं या फोटोसोबत एक लांबलचक नोट लिहिली आहे. या पोस्टमध्ये त्यानं शाहरुख खान आणि दिग्दर्शकासह सर्व स्टारकास्ट, चाहते आणि त्याच्या मित्रांचे आभार मानले आहेत. या फोटोमध्ये 'किंग खान'नं काळ्या रंगाचा शर्ट आणि क्रीम कलरची पॅन्ट घातली आहे. तर दुसरीकडे अनिलनं पांढऱ्या कुर्त्यासह निळ्या रंगाचा जीन्स परिधान केला आहे. याशिवाय राजकुमार हिराणी यांनी ग्रे शर्ट घातला आहे.
'डंकी'चं कलेक्शन : 'डंकी'नं आज 6 जानेवारी रोजी रिलीजच्या 16व्या दिवसात प्रवेश केला आहे. या चित्रपटानं देशांतर्गत बॉक्स ऑफिसवर 200 कोटींचा टप्पा पार केला आहे. याशिवाय जगभरात या चित्रपटानं 422.90 कोटींचा व्यवसाय केला आहे. 'डंकी' चित्रपटामध्ये शाहरुख खान आणि अनिल ग्रोव्हर व्यतिरिक्त तापसी पन्नू , विक्की कौशल, सतीश शाह, बोमन इराणी आणि इतर कलाकार आहेत. शाहरुख हा चित्रपट त्याच्या चाहत्यांना खूप आवडला आहे. या चित्रपटामध्ये किंग खानचा हटके अंदाज चाहत्याना पाहायला मिळाला आहे. आता काही दिवसानंतर हा चित्रपट 500 कोटीचा आकडा बॉक्स ऑफिसवर पार करेल, असा अंदाज व्यक्त केला जात आहे.
हेही वाचा :