ETV Bharat / entertainment

किंग खानची सद्दी संपली? देशांतर्गत 'डंकी'चं अ‍ॅडव्हान्स बुकिंग सुरू, धक्कादायक अहवाल आला समोर

Dunki Advance booking : अभिनेता शाहरुख खान अभिनीत 'डंकी'चं आगाऊ बुकिंग सुरू झालं असून आता या चित्रपटाचा धक्कादायक रिपोर्ट समोर आला आहे. या चित्रपटाची एका दिवसात आतापर्यंत फक्त 14 तिकिटं विकली गेली आहेत.

Dunki Advance booking
डंकीचं अ‍ॅडव्हान्स बुकिंग
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Dec 16, 2023, 2:42 PM IST

Updated : Dec 16, 2023, 4:33 PM IST

मुंबई - Dunki Advance booking : अभिनेता शाहरुख खान स्टारर 'डंकी' हा चित्रपट सध्या खूप चर्चेत आहे. या चित्रपटामध्ये किंग खान व्यतिरिक्त तापसी पन्नू, विकी कौशल, सतीश शाह, बोमन इराणी आणि इतर कलाकार दिसणार आहेत. 'डंकी' हा शाहरुख खानचा या वर्षातील शेवटचा चित्रपट आहे. या चित्रपटाकडून चाहत्यांना खूप अपेक्षा आहेत. 'डंकी' रुपेरी पडद्यावर 21 डिसेंबर रोजी प्रदर्शित होणार आहे. बॉक्स ऑफिसवर या चित्रपटाला आता साऊथचा सुपरस्टार प्रभास स्टारर 'सालार पार्ट 1 ' टक्कर देताना दिसेल. दरम्यान या दोन्ही चित्रपटांची आगाऊ बुकिंग सुरू झाली आहे.

'डंकी' चित्रपटाचे आगाऊ बुकिंग : 'डंकी' या चित्रपटाच्या आगाऊ बुकिंगचे आकडे खूप धक्कादायक आहेत. 16 डिसेंबरपासून देशांतर्गत 'डंकी'चं अ‍ॅडव्हान्स बुकिंग सुरू झालं आहे. किंग खाननं 2023 वर्षात 'पठाण' आणि 'जवान' चित्रपट सुपर हिट दिले आहेत. 'सॅकनिल'च्या रिपोर्टनुसार 'डंकी'च्या अ‍ॅडव्हान्स बुकिंगमध्ये पहिल्या दिवशी आतापर्यंत फक्त 14 तिकिटे विकली गेली आहेत, त्यामुळं या चित्रपटानं 2320 रुपयांची कमाई केली असल्याचं समजत आहे. आगाऊ बुकिंगचे आकडे अगदी प्राथमिक स्वरूपाचे आहे. दुपारी 2 पर्यत 'डंकी'ची 14 तिकिटे विकली गेल्यानं, या चित्रपटाची कमाई येणाऱ्या काळात किती होईल हे पाहण लक्षणीय ठरणार आहे. दुसरीकडे ४ वाजेपर्यंत या चित्रपटानं आणखी फक्त 9 तिकिटे विक्री केली आहे. यासह या चित्रपटाची दुपारी सव्वाचार पर्यंत 23 तिकिटे विक्री झाली आहेत. 'डंकी' हा चित्रपट 'पठाण' आणि 'जवान' प्रमाणेचं कमाई करेल अशी सध्या अपेक्षा केली जात आहे. तर दुसरीकडे 'सालार'नं तेलुगूत 17022 , मल्याळम 4680 आणि तामिळमध्ये 415 तिकिटे विक्री केली आहे. यासह या चित्रपटाची देशांतर्गत एकूण तिकिट 22117 विकली गेली आहे. या चित्रपटानं आतापर्यत रिलीजपूर्वी एकूण 49.35 लाखाची कमाई केली आहे.

पदेशात 'डंकी'ला चांगला प्रतिसाद : 'डंकी'चं परदेशात बुकिंग गेल्या आठवड्यात सुरू झालं होतं. प्री-सेल्समध्ये या चित्रपटाला चांगला प्रतिसाद मिळाला. दरम्यान 'डंकी'ची जगभरातील अ‍ॅडव्हान्स बुकिंग लक्षात घेता, 2.50 दशलक्ष यूएस डॉलर्स किंवा त्याहूनही मोठी ओपनिंग मिळण्याची शक्यता सध्या वर्तवली जात आहे. 'डंकी' चित्रपटाच्या ट्रेलरला खूप चांगला प्रतिसाद मिळाला आहे. त्यामुळं हा चित्रपट खूप झपाट्यानं बॉक्स ऑफिसवर कमाई करेल असं म्हटलं जात आहे. या चित्रपटाचं दिग्दर्शन राजकुमार हिराणीनं केलं आहे. हा चित्रपट 120 कोटीच्या बजेटमध्ये तयार झाला आहे. 'डंकी' हा चित्रपट जिओ स्टुडिओ, रेड चिलीज एंटरटेनमेंट आणि राजकुमार हिरानी फिल्म्सची निर्मिती आहे.

हेही वाचा :

  1. ऐश्वर्या रायची बच्चनची मुलगी आराध्यानं शाळेच्या वार्षिक कार्यक्रमात दिला जबरदस्त परफॉर्मन्स
  2. अभिनेत्री रिया चक्रवर्तीला परदेशात जाण्यात अडथळा कायम, दिलासा देण्यास न्यायालयाचा नकार
  3. अभिषेक-ऐश्वर्या विभक्त झाले? या व्हिडिओतून खरं काय ते उघडकीस

Last Updated : Dec 16, 2023, 4:33 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.