ETV Bharat / entertainment

Drishyam 2 : अजय देवगणच्या दृष्यम २ पोस्टरने उत्कंठा वाढवली, टीझरची प्रतीक्षा सुरू - Ajay devgan Drishyam 2

अजय देवगणने चाहत्यांची प्रतीक्षा संपवत 'दृश्यम 2'चे पोस्टर रिलीज केले आहे. या चित्रपटाचा टीझर २९ सप्टेंबर रोजी रिलीज होणार आहे. त्यामुळे आता या टीझरची प्रतीक्षा चाहते करत आहेत. आज हा टीझर प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.

Etv Bharat
दृष्यम २ पोस्टरने उत्कंठा वाढवली
author img

By

Published : Sep 29, 2022, 9:23 AM IST

मुंबई - अजय देवगणने चाहत्यांची प्रतीक्षा संपवत 'दृश्यम 2'चे पोस्टर रिलीज केले आहे. चित्रपटाचे पोस्टर रिलीज करताना अजय देवगणने टीझरच्या रिलीजची तारीख उघड केली आहे. चित्रपट कोणत्या दिवशी प्रदर्शित होणार हे देखील सांगण्यात आले आहे. यासोबतच अजयने रिलीज केलेले चित्रपटाचे पोस्टरही अतिशय प्रेक्षणीय आहे.

अजयने त्याच्या इंस्टाग्राम अकाऊंटवर 'दृश्यम-2' चित्रपटाचे पोस्टर रिलीज केले आणि लिहिले, '2 आणि 3 ऑक्टोबरला काय झाले ते आठवते, बरोबर? विजय साळगावकर पुन्हा एकदा कुटुंबासह परतला आहे. यासोबतच अजयने सांगितले की, चित्रपटाचा टीझर २९ सप्टेंबर रोजी रिलीज होणार आहे. त्यामुळे आता या टीझरची प्रतीक्षा चाहते करत आहेत. आज दुपारी १२ वाजता हा टीझर प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.

अजयने रिलीज केलेल्या चित्रपटाच्या पोस्टरमध्ये तो त्याच्या कुटुंबासोबत उभा आहे. अजयच्या हातात फावडे, अजयच्या पत्नीच्या भूमिकेत साउथ अभिनेत्री श्रिया सरन खांद्यावर बॅग घेऊन उभी आहे. अजयच्या मोठ्या मुलीच्या हातात लोखंडी रॉड आणि धाकट्या मुलीच्या हातात सीडी ड्राईव्ह आहे. हे सर्वजण स्वामी चिन्मयानंदजींच्या आश्रमाच्या पंडालकडे तोंड करून उभे आहेत. पोस्टरच्या डाव्या बाजूला चित्रपटाची रिलीज डेट 18 नोव्हेंबर 2022 लिहिलेली आहे.

अजयच्या आगामी 'दृश्यम-2' या चित्रपटांशिवाय अजय देवगण 'भोला' आणि 'थँक गॉड' या चित्रपटांमुळेही चर्चेत आहे. भोला साऊथ चित्रपट प्रिजनरचा अधिकृत हिंदी रिमेक असल्याचे सांगितले जात आहे. त्याच वेळी, थँक गॉड हा एक रोमँटिक, ड्रामा आणि कॉमेडी चित्रपट आहे, ज्यामध्ये अजय देवगण चित्रगुप्ताची भूमिका साकारत आहे. थँक गॉड या चित्रपटात सिद्धार्थ मल्होत्रा ​​आणि रकुल प्रीत सिंग मुख्य भूमिकेत आहेत.

हेही वाचा - रिचा चढ्ढा आणि अली फजलचा दिल्लीत रंगणार शाश्वत विवाह सोहळा

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.