मुंबई : आयुष्मान खुराना आणि अनन्या पांडे यांचा चित्रपट 'ड्रीम गर्ल २' थिएटरमध्ये प्रदर्शित होण्यासाठी सज्ज आहे. हा चित्रपट २५ ऑगस्ट रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित होईल. या चित्रपटाची प्रेक्षक खूप आतुरतेने वाट पाहत होते. हा चित्रपट 'ड्रीम गर्ल'चा सीक्वल आहे, ज्यामध्ये आयुष्मान खुरानासोबत नुसरत भरुचा मुख्य भूमिकेत दिसली होती. 'ड्रीम गर्ल २'च्या ट्रेलरला खूप चांगला प्रतिसाद मिळाला आहे. त्यामुळे हा चित्रपट चांगला कलेक्शन करू शकेल असे दिसतंय. या चित्रपटाच्या ट्रेलरला मिळालेल्या सकारात्मक प्रतिसादाचा परिणाम अॅडव्हान्स बुकिंगवर होताना दिसत आहे. आयुष्मान खुराना आणि अनन्या पांडे सध्या चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहेत. या चित्रपटाचे प्रमोशन खूप जबरदस्त केल्याने त्याचा फायदा अॅडव्हान्स बुकिंगवर होत आहे. रिलीजच्या दोन दिवस आधीपर्यंत चित्रपटासाठी किती आगाऊ बुकिंग झाले आहे, हा अहवाल समोर आला आहे.
'ड्रीम गर्ल २'चं आगाऊ बुकिंग : मीडिया रिपोर्टनुसार, 'ड्रीम गर्ल २'ने २२ ऑगस्टपर्यंत चांगली बुकिंग केली आहे. 'ड्रीम गर्ल २'ने पीविआर (PVR), आयनोक्स (INOX) आणि कीनेपोलीस (Cinepolis)मध्ये १४ हजार तिकिटे विकली आहेत. हे कलेक्शन चित्रपट रिलीज होण्याच्या दोन दिवस आधीचं आहे. सध्या 'ड्रीम गर्ल २' ट्रेंडिंग चित्रपट आहे. मीडिया रिपोर्टनुसार, हा चित्रपट रिलीजच्या दिवसापर्यंत ६० हजार तिकिटांची विक्री करेल. 'ड्रीम गर्ल २' चं ओपनिंग डे कलेक्शन जवळपास ९ कोटी असेल असा अंदाज अॅडव्हान्स बुकिंगवर लावला जात आहे. हे आकडे 'ड्रीम गर्ल'च्या तुलनेत कमी आहेत. 'ड्रीम गर्ल' या चित्रपटाने पहिल्या दिवशी बॉक्स ऑफिसवर १०.०५ कोटींची कमाई केली होती.
- 'गदर २'चा प्रभाव असेल : सनी देओलचा 'गदर २' अजूनही बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालतोय. या चित्रपटाचा तिसरा आठवडा सुरू होणार आहे . 'गदर २' हा ४०० कोटींच्या क्लबमध्ये दाखल झालाय. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर खूप कमाई करत आहे. अशा परिस्थितीत 'ड्रीम गर्ल २'ला बॉक्स ऑफिसवर टिकून राहण्याची वाट थोडी खडतर ठरु शकते.
हेही वाचा :