ETV Bharat / entertainment

Divya khosla kumars Mother Passed Away : दिव्या खोसला कुमारच्या आईचे निधन, फोटोसह शेअर केली दु:खद बातमी

बॉलिवूडची सुप्रसिद्ध अभिनेत्री, निर्माती आणि दिग्दर्शिका दिव्या खोसला कुमारची आई अनिता खोसला यांचे निधन झाले आहे. दिव्याने तिच्या आईचे काही फोटो शेअर करून त्यांना श्रद्धांजली वाहली आहे.

Divya khosla
दिव्या खोसला
author img

By

Published : Jul 6, 2023, 5:45 PM IST

मुंबई : टी-सीरीजची मालक-अभिनेत्री दिव्या खोसला कुमार यांच्यावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. दिव्याच्या आईचे निधन झाले आहे. तिने सोशल मीडियाच्या माध्यमातून ही माहिती दिली आहे. दिव्याने तिच्या आईचे अनेक सुंदर फोटो इंस्टाग्रामवर शेअर करत एक भावनिक चिठ्ठी लिहिली आहे. मात्र, दिव्याच्या आईचा मृत्यू कशामुळे झाला याची माहिती अद्याप मिळालेली नाही. तिने या चिठ्ठीत असेही सांगितले की, काही दिवसापूर्वी तिच्या आईचे निधन झाले.

दिव्याने पोस्टमध्ये काय लिहले : , 'मी काही काळापूर्वी माझी आई गमावली आणि आता माझ्या हृदयात कायमची पोकळी निर्माण झाली आहे. तुझ्या अपार प्रेम आणि नैतिक मूल्ये मी माझ्यासोबत घेऊन चालेल. तुझ्या पोटी मी जन्म घेतल्याचा अभिमान मला आहे. आई माझे तुझ्यावर खूप प्रेम आहे. ओम शांती.'

दिव्याने आठवणी शेअर केल्या : दिव्याने तिच्या आईसोबतचे तिचे जुने फोटोही शेअर केले आहेत, ज्यात ती आईच्या कडेवर आहे. हे फोटो दिव्याचे बालपणीचे आहे. शिवाय काही फोटोंमध्ये दिव्यांचा मुलगाही तिच्या आईसोबत मस्ती करताना दिसत आहे. तर एका फोटोत तिचे आई- बाबा दिसत आहेत. याशिवाय या पोस्टमधील एका फोटो दिव्याच्या आईच्या कॉलचा फोटो आहे. या फोटोमध्ये दिव्या 53 मिनिटे 29 सेकंद आपल्या आईशी बोललेली आहे.

सेलिब्रिटींनी श्रद्धांजली वाहिली : दिव्याची ही पोस्ट समोर आल्यानंतर सर्वसामान्यांव्यतिरिक्त अनेक सेलिब्रिटींनीही श्रद्धांजली वाहण्यास सुरुवात केली आहे. अभिनेत्री माही विजने लिहिले, 'आरआयपी आंटी.' अभिनेता पुलकित सम्राटने लिहिले, 'दिव्या तुझ्यासाठी प्रार्थना आणि धैर्य. त्यांच्या आत्म्याला शांती लाभो.' गौतम गुलाटीने लिहिले, 'ओम शांती.' याशिवाय गुरमीत चौधरी, मोनालिसा आणि कनिका कपूर यांनीही कमेंटमध्ये श्रद्धांजली वाहिली आहे.

वर्क फ्रंट : दिव्या खोसला कुमार बद्दल सांगायचे तर, या इंडस्ट्रीतील एक प्रसिद्ध निर्माती आणि दिग्दर्शिका आहे. दिव्या ही टी-सीरीजचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक भूषण कुमारची पत्नी आहे. दिव्याने 2004 साली 'लव्ह टुडे' या तेलुगू चित्रपटातून तिच्या अभिनय कारकिर्दीला सुरुवात केली. 'यानंतर ती 'अब तुम्हारे हवाले वतन साथियो', 'बुलबुल', 'सत्यमेव जयते 2' सारख्या चित्रपटांमध्ये दिसली. तिने 'यारियां' आणि 'सनम रे' या चित्रपटांचे दिग्दर्शनही केले आहे. याशिवाय दिव्या काही म्युझिक अल्बममध्येही दिसली आहे.

हेही वाचा :

  1. SRKs Jawan trailer : शाहरुखच्या जवान ट्रेलरवर रोखल्या सर्व नजरा, तुम्हीही आहात का सज्ज?
  2. 'It's Rocky Day : रणवीर सिंगच्या वाढदिवशी दिग्दर्शकने शेअर केले 'रॉकी रानी की प्रेम कहानी'तील सर्वोत्कृष्ट फोटो
  3. Ranveer Singh birthday : रणवीर सिंगच्या वाढदिवसानिमित्य दीपिकाने शेअर केला क्रिस्पी केक, करण जोहरनेही दिल्या शुभेच्छा

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.