ETV Bharat / entertainment

Adipurush producers dispute : आदिपुरुष निर्मात्यांमध्ये वाद, प्रदर्शन स्थगितीसाठी हायकोर्टमध्ये धाव - Adipurush producers dispute

आदीपुरुषचे निर्माते त्रिशूल मीडिया एंटरटेनमेंट आणि व्हिएफएक्स स्टुडिओमधील वाद उच्च न्यायालयापर्यंत पोहोचला आहे. उच्च न्यायालयाच्या खंडपीठाने त्रिशूल मीडिया एंटरटेनमेंटला नुकसान भरपाई बाबत आज कोणताही दिलासा देण्यास नकार दिला. टी सिरीज ही कंपनीही एक निर्माता असल्यामुळे त्यांची बाजू ऐकून घ्यावी असा युक्तीवाद करण्यात आला. यासंदर्भातील पुढील सुनावणी १७ जुलै रोजी न्यायमूर्ती आर छागला यांनी निश्चित केली आहे.

Adipurush producers dispute
आदिपुरुष निर्मात्यांमध्ये वाद
author img

By

Published : Jun 16, 2023, 1:31 PM IST

मुंबई - दक्षिण भारतातील तगडा कलाकार प्रभास आणि बॉलिवूड मधील अभिनेत्री क्रीती सेनॉन यांच्या जबरदस्त अभियानाचा चित्रपट आदी पुरुष प्रदर्शनापूर्वीच गाजत आहे. मात्र या चित्रपटासाठी सहभागी असणाऱ्या दोन कंपन्यांमधील वाद मुंबई उच्च न्यायालयात दाखल झाला. त्रिशूल एंटरटेनमेंट मीडिया कंपनी तसेच व्हिएफएक्स कंपनी यांच्यामधील वादावर मुंबई उच्च न्यायालयात सुनावणी झाली. उच्च न्यायालयाच्या खंडपीठाने त्रिशूल मीडिया एंटरटेनमेंटला नुकसान भरपाई बाबत आज कोणताही दिलासा देण्यास नकार दिला.

आदिपुरुष हा चित्रपट बहुभाषिक आहे म्हणजे भारतातील पाच ते सात पेक्षा अधिक भाषांमधून तो तयार झालेला आहे. रामायणावर आधारित हा चित्रपट आहे. आणि प्रदर्शनाच्या आधीच लोकांची उत्सुकता शिगेला पोहोचली होती. परंतु या चित्रपटाच्या साठी जे निर्माता कंपन्या होत्या त्यांच्यामध्ये वाद निर्माण झालेला आहे. यासंदर्भात त्रिशूल मीडिया एंटरटेनमेंट यांनी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केलेली आहे. त्यांची मागणी अशी होती की 'या चित्रपटाच्या आधी व्हीएफएक्स स्टुडिओसोबत आमचा करार झालेला होता. त्यामुळे त्रिशूल मीडियाला त्यांच्या हक्काचे नुकसान भरपाईचे चार कोटी 77 लाख 31 हजार रुपये थकबाकी आहे ते दिले पाहिजे. अन्यथा या चित्रपटाबाबत वाद वाढत जाईल व अडथळा येईल. मुंबई उच्च न्यायालयाच्या न्यायमूर्ती आर छागला यांच्या खंडपीठासमोर ही सुनावणी झाली.

त्रिशूल मीडिया एंटरटेनमेंट यांच्या वतीने बाजू मांडणारे वकील अभिनव चंद्रचूड यांनी नमूद केले की, चित्रपट आता प्रदर्शित होण्याच्या मार्गावर आहे. त्यासंदर्भात कोणताही अडथळा आणण्याचा विचार त्रिशूल मीडिया एंटरटेनमेंटचा नाही. परंतु त्यांच्या हक्काचे आणि त्यांचे थकबाकीचे चार कोटी ७७ लाख ३१ हजार ३२१ रुपये हे व्हीएफएक्स स्टुडिओने ठरल्याप्रमाणे द्यायला पाहिजे.

तर या संदर्भात सहनिर्माता असलेली भारतातील प्रख्यात ध्वनिमुद्रण कंपनी टी सिरीज अर्थात सुपर कॅसेट प्रायव्हेट लिमिटेड हे देखील आदीपुरुष चित्रपटाशी संबंधित आहे. त्यामुळे या याचिकेमध्ये त्यांना देखील पक्षकार केल्याशिवाय या खटल्यातील सर्व बाजू समोर येऊ शकत नाही. त्यामुळे न्यायालयाने टी सिरीज यांची पण बाजू ऐकून घेतली पाहिजे, असे टी सिरीजच्या वतीने अधिवक्ता मयूर खांडेकर यांनी बाजू मांडली.

यासंदर्भात याचिका करणारे संकेत सिंग आणि गंधार रायकर यांनी न्यायालया समोर नमूद केले की, आदी पुरुष चित्रपट निर्मितीच्या पुरता तेवढ्या काळासाठीच कंपनीची स्थापना करण्यात आलेली आहे. चित्रपट प्रदर्शित झाल्यावर ती कंपनी संपुष्टात येणार आहे. त्यामुळे थकबाकी भरण्यासंदर्भात रेट्रोफिल्स त्रिशूल मीडिया एंटरटेनमेंट कंपनीला कोणतेही क्रेडिट कसे काय देऊ शकते? तर त्रिशूल मीडिया एंटरटेनमेंट यांच्याकडून दावा मांडण्यात आला की प्रदर्शित झाल्यानंतर कंपनीचा विलय होईल मग आम्हाला थकबाकी मिळणारच नाही. त्यामुळेच हा वाद समोर आलेला आहे.

उच्च न्यायालयापुढे त्रिशूल मीडिया एंटरटेनमेंट कंपनीने रेट्रोफिल्स चित्रपटातील बीएफ स्टुडिओला आदिपुरुष संदर्भात जे काही त्याचे क्रेडिट आहे, त्याचे श्रेय आहे द्यायला हवे आणि असा आदेश न्यायालयाने पारित करावा. परंतु एवढ्यासाठी आम्ही केवळ चित्रपटाच्या प्रदर्शनाला स्थगिती देण्याची मागणी देखील करत आहोत, अशी या संदर्भातील बाजू मांडणारे ज्येष्ठ वकील आशिष कामत यांनी म्हटले.

न्यायालयाने सर्व पक्षकारांचे मुद्दे ऐकल्यानंतर यासंदर्भात सहनिर्माता असलेले टी सिरीज यांनी आपले म्हणणे मांडावे. तसेच यासंदर्भातील पुढील सुनावणी १७ जुलै रोजी न्यायमूर्ती आर छागला यांनी निश्चित केली आहे.

हेही वाचा -

१. Adipurush Movie : थिएटरच्या झरोक्यातून माकडाने पाहिला 'आदिपुरुष' !

२. Adipurush Seat Reserved : आरक्षित खुर्चीवरुन बजरंगी बलीने पाहिला आदिपुरुष, थिएटरमधील व्हिडिओ व्हायरल

३. Adipurush Releases On 10 K Screens : आदिपुरुष १० हजार स्क्रिन्सवर रिलीज, बॉक्स ऑफिसवर त्सुनामी

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.