ETV Bharat / entertainment

'कलावती' चित्रपटासाठी दिग्दर्शक संजय जाधव पुन्हा वळले सिनेमाटोग्राफीकेडे - Sanjay Jadhav movies of different genres

'कलावती' या चित्रपटाद्वारे संजय जाधव पुन्हा सिनेमाटोग्राफी करणार आहेत. मुंबईत आजीवासन स्टुडिओत चित्रपटाचा मुहूर्त सोहळा संपन्न झाला.

kalawati
संग्रहित छायचित्र
author img

By

Published : Mar 2, 2023, 5:56 PM IST

मुंबई - 'दुनियादारी', 'प्यारवाली लव्हस्टोरी',' तू ही रे', 'लकी', 'चेकमेट', 'खारी बिस्किट', 'ये रे ये रे पैसा', 'तमाशा लाइव्ह' सारखे वैविध्यपूर्ण चित्रपट देणारे दिग्दर्शक संजय जाधव एक नवीन चित्रपट घेऊन येताहेत. 'कलावती' असे नाव असलेल्या या चित्रपटाचा मुहूर्त नुकताच पार पडला. महत्त्वाचं म्हणजे या चित्रपटाद्वारे संजय जाधव पुन्हा सिनेमाटोग्राफी करणार आहेत. मुंबईत आजीवासन स्टुडिओत चित्रपटाचा मुहूर्त सोहळा संपन्न झाला.

सध्या मराठी चित्रपट प्रेक्षक-पाठिंबा मिळविताना दिसताहेत. आशयघन आणि वेगळ्या वाटेवरील कथानकं असलेल्या मराठी चित्रपट बॉक्स ऑफिसवर चांगला गल्ला कमवताना दिसताहेत. थोडक्यात इतर भाषिक चित्रपट चालत नसताना गेल्या काही दिवसांत बॉक्सऑफिसवर मराठी चित्रपटांचा बोलबाला दिसून आला. 'कलावती' हा वेगळ्या वाटेवरचा चित्रपट असणार असल्याचे संजय जाधव यांनी नमूद केले आहे.

उत्कृष्ट कलाकारांची टीम असलेल्या रोमँटिक चित्रपटांसाठी प्रसिद्ध असलेले संजय जाधव पहिल्यांदाच हॉरर कॉमेडी जॉनरचा चित्रपट घेऊन येत आहेत. सुप्रसिद्ध संगीतकार, गायक, निर्माते आणि दिग्दर्शक अवधूत गूप्ते प्रमुख पाहुणे म्हणून या मुहूर्त सोहळ्यास उपस्थित होते. त्याचप्रमाणे या चित्रपटातील कलाकारांसोबत इतर टीमदेखील चित्रपटाच्या मुहूर्तावेळी उपस्थित होते. यावेळी सुप्रसिद्ध गायक आदर्श शिंदे यांच्या आवाजात चित्रपटातील पहिलं गाणं देखील रेकॉर्ड करण्यात आलं.

आतापर्यंत संजय जाधव यांनी वेगवेगळ्या जॉनरचे चित्रपट केले असून प्रेक्षकांचे मनोरंजन होईल यावर भर दिला होता. आता ते पहिल्यांदाच 'कलावती' मधून हॉरर कॉमेडी जॉनर घेऊन येत असल्यामुळे निश्चितच उत्सुकता आहे. या चित्रपटात अमृता खानविलकर, संजय नार्वेकर, तेजस्विनी लोणारी, अभिजित चव्हाण, हरीश दुधाडे, ओंकार भोजने, दिप्ती धोत्रे, संजय शेजवळ, नील साळेकर हे कलाकार महत्त्वपूर्ण भूमिकांत दिसणार आहे.
अमेय खोपकर एंटरटेन्मेंट, के.एफ. फिल्म्स लिमिटेड, ताहेर सिने टेक्निक्स आणि स्वाती खोपकर प्रस्तुत 'कलावती' ची निर्मिती करताहेत प्रजय कामत आणि सह-निर्माते म्हणून निनाद नंदकुमार बत्तिन, तबरेज पटेल, परीन मेहता, निश्चय मेहता, नवीन कोहली यांनी जबाबदारी उचलली आहे. कार्यकारी निर्माता वैशाली तुथिका आणि सावित्री धामी असून मराठीतील प्रसिद्ध लेखक अभिजित गुरुनं चित्रपटाची पटकथा लिहिली आहे. चित्रपटाची कथा निशांत भुसे आणि अनुजा कर्णिक यांची असून चित्रपटाचे संगीतकार पंकज पडघन आहेत.

दिग्दर्शनाची जबाबदारी उचलण्यासोबतच संजय जाधव हे 'कलावती' चित्रपटाचे 'डीओपी' म्हणूनही काम पाहणार आहेत.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.