ETV Bharat / entertainment

Diana Penty pens note : डायना पेंटीने सांगितला बिग बीसोबत काम करण्याचा रोमांचक अनुभव - निम्रत कौर आणि अभिषेक बॅनर्जी

अभिनेत्री डायना पेंटीने तिच्या सेक्शन 84 या चित्रपटाचे चित्रीकरण पूर्ण केल्यानंतर एक चिठ्ठी नोट लिहिली. अमिताभ बच्चन यांच्यासोबत स्क्रीन स्पेस शेअर करण्याचा पहिला रोमांचक अनुभव तिने कथन केलाय.

Diana Penty pens note
डायना पेंटीने सांगितला बिग बीसोबत काम करण्याचा रोमांचक अनुभव
author img

By

Published : Jun 15, 2023, 7:16 PM IST

मुंबई - अभिनेत्री डायना पेंटीने गुरुवारी तिचा आगामी सेक्शन 84 या कोर्टरूम ड्रामा चित्रपटाचे शूटिंग पूर्ण करताना एक चिठ्ठी लिहिली आहे. रिभू दासगुप्ता दिग्दर्शित, या चित्रपटात अमिताभ बच्चन, डायना पेंटी, निम्रत कौर आणि अभिषेक बॅनर्जी यांच्या प्रमुख भूमिका आहेत.

इंस्टाग्रामवर डायनाने फोटो आणि व्हिडिओंची एक स्ट्रिंग शेअर केली. 'सेक्शन 84 चित्रपटाचे शुटिंग संपले असून माझ्यासाठी हा एक विस्मयकारक अनुभव होता. याचे शुटिंग सुरू करण्यापूर्वी मी अमिताभ बच्चन सारांसोबत काम करण्यास उत्सुक होते. पहिल्यांदा खूप चिंता वाटत होती. पण आता आम्ही एका चित्रपटातन एकत्र आलो आहोत, आणि मी म्हणू शकतो की, माझ्या कारकिर्दीतील हा सर्वात समृद्ध अनुभवांपैकी एक आहे. एक अभिनेत्री म्हणून, मला शेवटी कळते की ते काय आहे? म्हणजे एखाद्या सीनमध्ये 'बीई' करणे. मिस्टर बच्चन तुम्हाला ते करण्याची परवानगी देतात आणि तुम्हाला आणखी बरेच काही करण्यासाठी मुभा देतात. त्यांना पाहणे आणि त्यांचे निरीक्षण करणे हे एखाद्या मास्टरक्लासचे साक्षीदार असल्यासारखे आहे.' असे तिने लिहिलंय.

पहिल्या फोटोत ती दिग्गज अभिनेते अमिताभ बच्चन यांच्यासोबत क्लॅपबोर्ड धरून पोज देताना दिसत आहे. इतर फोटोमध्ये, ती तिच्या सहकलाकार निम्रत कौर आणि अभिषेक बॅनर्जीसोबत पोझ देताना दिसते. 'अखेर निम्रत कौर आणि अभिषेक बॅनर्जीसोबत सेटवर हँग आउट करायला मिळाले. आम्ही प्रत्यक्षात एकाच चित्रपटात आहोत याचा पुरावा रिभू दास गुप्ता आहेत. हे सर्व गोष्टी इतक्या सुंदरपणे एकत्र आणल्याबद्दल त्यांना धन्यवाद'., असे तिने पुढे लिहिलंय.

इतर पोस्टमधील फोटोत ती तिच्या व्हॅनिटी व्हॅनमध्ये दिसत आहे. सेक्शन 84 ची अधिकृत रिलीज तारीख अद्याप प्रतीक्षेत आहे. 2014 मधील टीव्ही मिनी-सिरीज युध आणि 2015 मधील थ्रिलर चित्रपट Te3n नंतर अमिताभ आणि रिभू दास गुप्ता यांचा हा तिसरा एकत्रीत चित्रपट आहे. दरम्यान, डायना अलीकडेच शाहिद कपूरसोबत ब्लडी डॅडी या अॅक्शन थ्रिलर चित्रपटात दिसली होती. अली अब्बास जफर दिग्दर्शित हा चित्रपट ओटीटी प्लॅटफॉर्म जिओ सिनेमावर प्रदर्शित झाला आहे.

हेही वाचा -

१. Vitthal Maja Sobti : वारकऱ्याच्या भेटी विठ्ठल तो आला, भक्तीमय रंजक कथा 'विठ्ठल माझा सोबती'

२. Tamannaah broke no kissing policy : विजय वर्मासाठी तमन्ना भाटियाने बासनात गुंडाळली 'नो किंसींग' पॉलिसी

३. Vicky Kaushal and Katrina : 'पॉवर कपल' विकी आणि कॅटरिना सहलीसाठी रवाना

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.