मुंबई -Dhootha Trailer Release : साऊथ अभिनेता नागा चैतन्य आज 23 नोव्हेंबरला त्याचा 37 वा वाढदिवस साजरा करत आहे. नागानं त्याच्या वाढदिवसाच्या दिवशी चाहत्यांना एक जबरदस्त भेट दिली आहे. आता त्याच्या आगामी 'धूथा' वेब सीरिजचा ट्रेलर रिलीज करण्यात आला आहे. ही एक जबरदस्त सस्पेन्स थ्रिलर वेब सीरिज असणार आहे. 1 डिसेंबर रोजी त्याची 'धूथा' वेब सीरिज अॅमेझॉन प्राईमवर प्रदर्शित होणार आहे. सोशल मीडियावर ट्रेलर रिलीज करताना नागानं त्याच्या पोस्टमध्ये लिहलं, 'खूप अनेक रहस्ये आणि सत्याच्या शोधात एक माणूस'. या वेब सीरिजचा ट्रेलर खूप दमदार आहे. हा ट्रेलर पाहिल्यानंतर चाहते खूपच उत्सुक झाले आहेत.
'धूथा'मध्ये नागा चैतन्यनं पत्रकाराची भूमिका साकारली : साऊथ चित्रपटांमध्ये धुमाकूळ घातल्यानंतर नागा चैतन्य आता ओटीटीवर पदार्पण करणार आहे. ट्रेलरमध्ये नागा चैतन्य पत्रकाराच्या भूमिकेत दिसत आहे. 'धूथा'मध्ये सागर (नागा चैतन्य)एक महत्त्वाकांक्षी आणि यशस्वी पत्रकार आहे, जो स्वतःला भयानक घटनांनी वेढलेला, अनेक रहस्यमय आणि भीषण मृत्यूंशी जोडलेला आहे. प्राइम व्हिडिओचा आगामी तेलुगू 'धूथा' हा सस्पेन्स-थ्रिलरनं परीपूर्ण आहे. विक्रम के कुमार दिग्दर्शित आणि नॉर्थस्टार एंटरटेनमेंट प्रायव्हेट लिमिटेडच्या बॅनरखाली शरथ मारर निर्मित, 'धूथा' वेब सीरिज ही खूप दिवसापासून चर्चेत होती.
नागा चैतन्य ओटीटी पदार्पणासाठी उत्साहित : आठ भागांच्या या वेब सीरिजमध्ये पार्वती थिरुवोथू, प्रिया भवानी शंकर आणि प्राची देसाई यांच्याही महत्त्वाच्या भूमिका आहेत. नागा ओटीटी पदार्पणाबद्दल बोलताना, त्यानं सांगितलं की, मी रोमांचित आणि उत्साहित आहे. पुढं त्यानं म्हटलं, एवढ्या हृदयस्पर्शी कहाणीत सागर सारख्या बहुस्तरीय व्यक्तिरेखेसह, मला वाटले की मी माझ्या कम्फर्ट झोनमधून बाहेर पडेन आणि स्वतःला असे आव्हान देईन जे मी यापूर्वी केलं नव्हतं. जरी ही एक काल्पनिक कहाणी असली तरी, 'धूथा' वेब सीरिज विचार करायला लावणारी आहे. माझ्या चाहत्यांना तसेच थ्रिलर शैलीच्या रसिकांना प्राइम व्हिडिओवर ही मालिका पाहणे आवडेल'.
हेही वाचा :