ETV Bharat / entertainment

Deepika Padukone returns to Mumbai : ऑस्करमध्ये कामगिरी केल्यानंतर दीपिका पदुकोण मुंबईत परतली - बॉलिवूड स्टार दीपिकाने लेटेक्स पॅंट

दीपिका पदुकोण ९५ व्या ऑस्कर पुरस्कार सोहळ्यात भाग घेतल्यानंतर शुक्रवारी रात्री मुंबई विमानतळावर परतली. यावेळी पापाराझींनी तिला आपल्या कॅमेऱ्यात कैद केले. तिचे अभिनंदन करणाऱ्या सर्वांचे तिने आभार मानले.

दीपिका पदुकोण मुंबईत परतली
दीपिका पदुकोण मुंबईत परतली
author img

By

Published : Mar 18, 2023, 3:01 PM IST

मुंबई - लॉस एंजेलिसमधील ऑस्कर सोहळ्यात भारताचे प्रतिनिधित्व केल्यानंतर बॉलिवूड स्टार दीपिका पदुकोण शुक्रवारी रात्री भारतात परतली आहे. मुंबई विमानतळावर दीपिका अवतरताच पापाराझींनी तिला घेरले आणि आपल्या कॅमेऱ्यात कैद केले. काळ्या रंगाचा पोशाख परिधान केलेली दीपिका अर्थातच सुंदर दिसत होती. दीपिकाच्या चाहत्यांनी 12 मार्च रोजी 95 व्या अकादमी पुरस्कार सोहळ्याला हजेरी लावल्यानंतर दीपिका पदुकोण मुबंई शहरात पहिल्यांदाच सार्वजनिकपणे दिसली.

बॉलिवूड स्टार दीपिकाने लेटेक्स पॅंट आणि बूटसह काळा टर्टलनेक स्वेटशर्ट घातला होता. काळी पिशवी घेऊन जाताना तिने सनग्लासेसच्या जोडीने तिचा लूक पूर्ण केला. कारकडे जाण्यापूर्वी दीपिकाने फोटोसाठी थोडक्यात पोज दिल्या. पापाराझीने सोशल मीडियावर शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये दीपिका उबर-स्टाईलिश दिसत होती.

दीपिका व्हिडिओमध्ये पापाराझींकडे पाताना ल्माइल देत होती. ऑस्कर 2023 मध्ये पुरस्कार प्रदान केल्याबद्दल आणि जागतिक मंचावर भारताचे प्रतिनिधित्व केल्याबद्दल पापाराझींनी दीपिकाचे अभिनंदन केले. त्यानंतर तिने पापाराझींचे आभार मानले. इन्स्टाग्रामवर व्हिडिओ पोस्ट होताच चाहत्यांनी तिच्या पोशाख आणि आत्मविश्वासाची प्रशंसा कमेंट सेक्शनमध्ये केली आहे. एका चाहत्याने लिहिले, 'बॉलिवूडमधील सर्वात सुंदर मुलगी, दिपू, तुमचे परत स्वागत आहे.' 'ती प्रवास करते तेव्हा मला तिचे कपडे आवडतात', अले दुसऱ्याने कमेंटमध्ये लिहिलंय.

ऑस्कर 2023 मध्ये सादरकर्त्यांपैकी एक म्हणून, दीपिकाने काळ्या लुई व्हिटॉन ऑफ-शोल्डर गाउनमध्ये नेत्रदीपक रेड कार्पेट प्रवेश केला. आरआरआर चित्रपटाचे नाटू नाटू हे गाणे जेव्हा ऑस्कर पुरस्कार सोहळ्यात लाइव्ह सादर झाले त्याचे प्रेझेन्टेशन दीपिकाने केले होते. या गाण्याची ओळख तिने उपस्थितांना करुन दिली. या गाण्याला जेव्हा पुरस्कार मिळाला तेव्हा ती खूप आनंदित झाली होती. चित्रपटाच्या आघाडीवर, अभिनेत्रीदीपिका अलीकडेच सिद्धार्थ आनंदच्या पठाणमध्ये दिसली होती, ज्यामध्ये शाहरुख खान आणि जॉन अब्राहम यांच्या प्रमुख भूमिका होत्या. आगामी सिद्धार्थ आनंद दिग्दर्शित फायटर या चित्रपटात ती दिसणार आहे. याच ती हृतिक रोशनसोबत पहिल्यांदाच ऑन-स्क्रीन झळकणार आहे.

हेही वाचा - हरीहरन आणि साधना जेजुरीकर यांची नवीन गझल 'दूरीयां...' प्रेक्षकांच्या भेटीला

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.