ETV Bharat / entertainment

kajol and DDLJ : 'दिलवाले दुल्हनिया ले जायेंगे' चित्रपटाला 28 वर्षे पूर्ण, काजोलनं शेअर केली पोस्ट - काजोलनं शेअर केली पोस्ट

kajol and DDLJ: 'दिलवाले दुल्हनिया ले जायेंगे' या ब्लॉकबस्टर चित्रपटाला नुकतीच 28 वर्षे पूर्ण झाली आहेत. या खास दिवशी काजोलनं एक व्हिडिओ आणि काही फोटो शेअर केली आहेत.

kajol and DDLJ
काजोल आणि दिलवाले दुल्हनिया ले जायेंगे
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Oct 21, 2023, 4:06 PM IST

मुंबई - kajol and DDLJ : आदित्य चोप्राचा पहिला चित्रपट 'दिलवाले दुल्हनिया ले जायेंगे' च्या प्रदर्शनाला 28 वर्षे पूर्ण झाली आहेत. यशराज फिल्म्सच्या बॅनरखाली बनलेल्या हा चित्रपट रुपेरी पडद्यावर हिट ठरला होता. दरम्यान या खास प्रसंगी काजोलनं तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर 'दिलवाले दुल्हनिया ले जायेंगे'या चित्रपटातील तिच्या लूकमधील एक क्लिप शेअर केली आहे. याशिवाय तिनं दोन फोटो देखील चाहत्यांसोबत शेअर केले. या चित्रपटामध्ये काजोलसोबत शाहरुख खान होता. पडद्यावर ही जोडी जबरदस्त हिट झाली होती. यानंतरच यांची जोडी ही हिंदी चित्रपटसृष्टीतील सर्वात रोमँटिक ऑनस्क्रीन जोडप्यांपैकी एक ठरली होती. या चित्रपटामध्ये सिमरनच्या भूमिकेत काजोलला प्रेक्षकांनी खूप पसंत केले होते.

काजोलनं शेअर केली पोस्ट : या चित्रपटाला 28 वर्षे पूर्ण झाल्याचा आनंद साजरा करताना काजोलनं तिच्या पोस्टवर लिहलं, 'अजूनही हिरवा रंग घातला आहे, परंतु कदाचित तो शेड नसेल. 28 वर्षांनंतरही,'डीडीएवजे' तुमचा आहे मित्रांनो. आमच्या सर्व चाहत्यांनी याला खास बनवले आहे, ज्याची आम्ही कधीही कल्पना केली नव्हती. तुम्हा सर्वांना सलाम. काजोलनं या पोस्टमध्ये संपूर्ण कलाकारांना टॅग केले आहे. काजोलच्या या पोस्टवर अनेकजण कमेंट करून तिच्यावर प्रेमाचा वर्षाव करत आहे. याशिवाय तिनं एक इंस्टाग्राम स्टोरीवर एक फोटो शेअर केला आहे, ज्यामध्ये ती किंग खानसोबत आहे. या फोटोमध्ये शाहरुख तिच्यावर एक फुलाद्वारे पाणी उडविताना दिसत आहे. हा चित्रपट 20 ऑक्टोबर 1995 मध्ये रिलीज झाला होता. या चित्रपटाची निर्मिती यश चोप्रा यांनी केली होती. याशिवाय करण जोहरनं या चित्रपटातून अभिनय क्षेत्रात पदार्पण केले होते.

काजोल आणि शाहरुख खानची ऑन-स्क्रीन केमिस्ट्री : या चित्रपटामधील गाणी देखील खूप हिट झाली होती. आजही हा चित्रपट चाहते खूप आवडीने पाहतात. या चित्रपटाची कहाणी शाहरुख (राज) आणि काजोल (सिमरन) यांच्याभोवती फिरते, जे युरोपच्या प्रवासादरम्यान भेटतात आणि प्रेमात पडतात. या चित्रपटाचं शुटिंग भारत, लंडन आणि स्वित्झर्लंडमध्ये झालं आहे. हा चित्रपट हिंदी चित्रपटसृष्टीतील सर्वात यशस्वी भारतीय चित्रपटांपैकी एक आहे.

काजोल वर्कफ्रंट : सध्या काजोल तिच्या आगामी 'दो पत्ती' या चित्रपटासाठी चर्चेत आहे, ज्यामध्ये ती एका महिला पोलीस अधिकाऱ्याची भूमिका साकारणार आहे. याशिवाय ती रेवती दिग्दर्शित 'सलाम वेंकी' चित्रपटात दिसणार आहे. या चित्रपटामध्ये तिच्यासोबत आमिर खान, रेवती मेनन, प्रकाश राज, सनी सिंग, आहाना कुमरा, राहुल बोस आणि राजीव खंडेलवाल दिसणार आहेत. हा चित्रपट 9 डिसेंबरला सिनेमागृहात प्रदर्शित होणार आहे.

हेही वाचा :

  1. Ganapath & Yaariyan 2 BO day 2 : 'गणपथ' आणि 'यारियां 2' चित्रपटांची बॉक्स ऑफिसवर थंड कमाई
  2. Aamir Khan moving to chennai : आमिर खान आईसह चेन्नईला शिफ्ट होणार, वाचा कारण
  3. Leo Box Office Collection Day 3: विजय 'थलपथीच्या 'लिओ'नं बॉक्स ऑफिसवर केलं वादळ निर्माण...

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.