ETV Bharat / entertainment

DDLJ in Valentine week : दिलवाले दुल्हनिया ले जायेंगे 37 शहरांमध्ये पुन्हा रिलीज

author img

By

Published : Feb 10, 2023, 12:51 PM IST

यशराज फिल्म्सचा रोमँटिक ब्लॉकबस्टर दिलवाले दुल्हनिया ले जायेंगे 10 फेब्रुवारी रोजी भारतातील 37 शहरांमध्ये प्रदर्शित झाला आहे. निर्मात्यांनी 2023 च्या व्हॅलेंटाईन डे निमित्त शाहरुख खान आणि काजोल याची भूमिका असलेला डीडीएलजे चित्रपट प्रदर्शित केला आहे.

DDLJ in Valentine week
DDLJ in Valentine week

मुंबई - शाहरुख खान आणि काजोल यांना सुपरस्टार बनवणारा आदित्य चोप्राचा दिलवाले दुल्हनिया ले जायेंगे हा चित्रपट पुन्हा प्रदर्शित करण्यात आला आहे. या चित्रपटाच्या पुन्हा रिलीजमुळे भारतभरातील चाहत्यांना आता राज आणि सिमरनला पुन्हा मोठ्या पडद्यावर पाहण्याची संधी आहे. यशराज फिल्म्सने गुरुवारी सांगितले की, व्हॅलेंटाईन डे 2023 च्या निमित्ताने हा चित्रपट मोठ्या भारतीय शहरांमध्ये पुन्हा प्रदर्शित होईल.

एक रोमँटिक ब्लॉकबस्टर, दिलवाले दुल्हनिया ले जायेंगे हा भारतीय चित्रपटाच्या इतिहासातील सर्वात जास्त काळ चालणारा चित्रपट आहे. मुंबईच्या मराठा मंदिर थिएटरमध्ये २५ वर्षे सलग चालल्यांतर पुन्हा हा चित्रपट झळकला आहे. दिलवाले दुल्हनिया ले जायेंगे (DDLJ), सिनेमाच्या इतिहासातील सर्वात जास्त काळ चालणारा चित्रपट, ऐतिहासिक रिलीज झाल्यापासून भारतीयांसाठी पिढ्यानपिढ्या रोमान्सचा समानार्थी बनला आहे.

आम्हाला चित्रपटाच्या व्यापक प्रदर्शनासाठी वर्षभर प्रेक्षक आणि चाहत्यांनी सतत विनंती केली आहे, जेणेकरून ते पुन्हा-पुन्हा, हा मैलाचा दगड ठरणारा चित्रपट त्यांच्या मित्र आणि कुटुंबासह थिएटरमध्ये पाहू शकतील! यावर्षी, व्हॅलेंटाईन डेच्या निमित्ताने, आम्ही त्यांची इच्छा पूर्ण करत आहोत. DDLJ 10 फेब्रुवारीपासून संपूर्ण भारतात प्रदर्शित होईल, फक्त एक आठवड्यासाठी!, असे यशाराज फिल्म्सचे उपाध्यक्ष व वितरक रोहन मल्होत्रा म्हणाले.

1995 चा चित्रपट मुंबई, पुणे, अहमदाबाद, सुरत, वडोदरा, गुडगाव, फरिदाबाद, लखनौ, नोएडा, डेहराडून, दिल्ली, चंदीगड, त्रिवेंद्रम, कोलकाता, गुवाहाटी, बेंगळुरू, हैदराबाद, इंदूर, चेन्नई, वेल्लोर यासह भारतातील 37 शहरांमध्ये प्रदर्शित होणार आहे.

There's no romantic song then this ❤
Come Fall In Love All Over Again 💕 #ValentinesWeek #ValentinesDay @iamsrk #DDLJ pic.twitter.com/mEqKGY53fw

— Miss_Mystique007 (@MissMystique007) February 9, 2023 ">

दिलवाले दुल्हनिया ले जायेंगे हा रोमँटिक ड्रामा चित्रपट 4 कोटी रुपयांच्या बजेटमध्ये बनवला गेला होता. एक ब्लॉकबस्टर चित्रपट अशी वेगळी ओळख म्हणून हा उदयास आला, 1995 मध्ये रिलीज झाल्यावर जगभरात 102.50 कोटी रुपये जमा केले. त्यावेळी १०० कोटी बॉक्स ऑफिसवर कमाई ही मोठी आश्चर्याची गोष्ट होती.

त्याच्या रिलीजला २५ वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त, दिलवाले दुल्हनिया ले जायेंगे जर्मनी, UAE, सौदी अरेबिया, कतार, यूएस, यूके, कॅनडा, मॉरिशस, दक्षिण आफ्रिका, ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड, फिजी, नॉर्वे, स्वीडन, स्पेन, स्वित्झर्लंड, एस्टोनिया आणि फिनलंड. यांसारख्या देशांमध्ये पुन्हा प्रदर्शित करण्यात आला होता.

व्हॅलेंटाईन डेच्या कालावधीत, सुपरस्टारचे वेगवेगळे अवतार असलेले दोन चित्रपट चित्रपटगृहांमध्ये शाहरुख खानला राज आणि पठाण या दोघांच्या भूमिकेत पाहण्याचा पर्याय आता चाहत्यांना आहे. DDLJ 10 फेब्रुवारीला थिएटरमध्ये दाखल झाला. (एजन्सी इनपुटसह)

हेही वाचा - Rules For Film Ott Release : थिएटर रिलीजच्या ४२ दिवसानंतरच चित्रपट ओटीटीवर दिसेल, केरळ फिल्म चेंबर ऑफ कॉमर्सचा नियम

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.