ETV Bharat / entertainment

दाऊदच्या माणसांनी ठिकाणा कळू नये म्हणून गाडी फिरवून-फिरवून नेली होती त्याच्या घरी, ऋषी कपूर यांनी सांगितला होता दाऊद भेटीचा किस्सा - Dawood Ibrahim ill

Rishi Kapoor and Dawood meet in Dubai : दुबई दौऱ्यावर असताना ऋषी कपूरला अचानक दाऊद इब्राहिमचा फोन आला होता आणि त्यानं भेटीसाठी बोलावलं होतं. सुमारे चार तासाच्या भेटीत दोघांनी अनेक विषयावर चर्चा केल्याचा खुलासा ऋषी कपूर यांनी त्यांच्या आत्मचरित्रात केला आहे. एका मुलाखतीतही त्यांनी या भेटीचं सविस्तर वर्णन केलं होतं.

Rishi Kapoor and Dawood meet in Dubai :
दाऊद इब्राहिम आणि ऋषी कपूरची दुबईत झाली होती भेट
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Dec 19, 2023, 4:12 PM IST

Updated : Dec 20, 2023, 4:10 PM IST

मुंबई - Rishi Kapoor and Dawood meet in Dubai : अलिकडे दाऊद इब्राहिम आजारी असल्याच्या, त्याच्यावर विषप्रयोग झाल्याच्या, रुग्णालयात बंदोबस्तात असल्याच्या अनेक बातम्या झळकल्या आहेत. अशावेळी त्याचे बॉलिवूड कनेक्शनचीही चर्चा अनेक बातम्यांचा विषय बनला आहे. अशातच दिवंगत अभिनेता ऋषी कपूरने त्याच्या आत्मचरित्रात दाऊदला भेटल्याचा किस्सा लिहिला होता. त्यानंतर काही वाहिन्यांवर ऋषी कपूर यांनी दाऊदशी झालेल्या भेटीचे वर्णनही केले होते. त्या मुलाखतीत त्यांनी व्यक्त केलेल्या भावना पुढील प्रमाणे आहेत.

"मार्च 1988 मध्ये ऋषी कपूर आणि दाऊची दुबईत भेट झाली होती. हे कसं जमून आलं होतं?, कशी भेट झाली आणि काय चर्चा झाली?", असा प्रश्न विचारण्यात आला. त्यावेळी ऋषी कपूर म्हणाले, "मी दुबईला एका शोसाठी गेलो होतो. यामध्ये आरडी बर्मन, आशा भोसले यांचा कार्यक्रम होता. एअरपोर्टवर कुणीतरी माझ्या हातात फोन दिला आणि म्हटलं की, भाई तुमच्याशी बोलणार आहेत. पाहतो तर तो दाऊदचा फोन होता. तो म्हणाला, 'मला भेटायचं आहे चहासाठी येशील का?' मी म्हटलं हॉटेलवर चेकइन केल्यानंतर कळवतो. तर अशा प्रकारे मी त्याच्या भेटीस गेलो."

"तुम्हाला माहिती होतं का की दाऊद कोण आहे?", असे विचारताच ऋषी कपूर म्हणाले की, "हो मला माहिती होतं. त्यावेळी मुंबई बॉम्बस्फोट झाला नव्हता. त्यावेळी त्याला गँगस्टर म्हटलं जायचं आणि तो समाजात उघडपणे फिरत होता. तो काही जेलमध्ये नव्हता. आणि तिथंही जर असता तर आम्ही अशा माणसांकडून काही अभिनयाच्या गोष्टी शिकत असतो. त्यामुळे अशा लोकांना आम्ही भेटत असतो. त्यामुळे मी भेटायला गेलो. त्यांनी माझं चांगलं आदरातिथ्य केलं."

"दाऊदला ही शंका होती की त्याला घराचा पत्ता कळू नये म्हणून त्यानं गाडी फिरवून फिरवून त्याच्या घराकडे घेऊन जात होते, हे खरं आहे का?" या प्रश्नाचं उत्तर देताना ऋषी म्हणाले, "मला कछी भाषा येत नाही पण माझा जो मित्र होता त्याला ती येत होती. त्यांची चर्चा अशी होती की थोडावेळ सर्कल वगैरेवर फिरत राहा आणि जेव्हा फोन येईल तेव्हाच घराकडे जायचं. त्यामुळे पत्ता कळू नये म्हणून असं होतंय असं मला वाटलं होतं. तर मी त्याच्या घरी गेलो, चहापान झालं, तेव्हा तो म्हणाला की, 'खरंतर संध्याकाळीच बोलवणार होतो, पण मी दारु पीत नाहीत्यामुळे बोलवलं नाही.' त्यावेळी दाऊद म्हणाला की, त्याला माझं 'तवायफ' चित्रपटातील काम आवडलं होतं. तवायफ होणाऱ्या मुलींना वाचवण्याचं काम हिरो करतो आणि पुन्हा तिला समजात आणतो. तो सिनेमा महिला सक्षमीकरणावर होता. यामध्ये माझ्या पात्राचं नाव दाऊद होतं. त्याला हे पात्र आवडलं होतं. तो म्हणाला की पहिल्यांदाच दाऊद हे पात्र काही सकारात्मक काम करतानं दिसल्यामुळे तो माझ्या कामावर खूश होता."

"तर यामुळे दाऊदला ऋषी कपूर आवडायचा का?", या प्रश्नला उत्तर देताना ऋषी कपूर म्हणाले, "तसं मला सांगण्यात आलं. त्याला कपूर घराण्यातील कलाकारांबद्दल आदर होता. त्याने अनेक चित्रपट पाहिले होते. त्यामुळे मला भेटताना त्याला आनंद झाला होता. त्यावेळी राजकपूर हयात होते. त्यांच्यबद्दल अनेक चांगल्या गोष्टी त्यानं सांगितल्या."

"चार तासाच्या भेटीमध्ये दाऊद इब्राहिमचे कोणते किस्से आले?", असा प्रश्न मुलाखतकाराने विचारला असता ऋषी कपूर म्हणाले, "मी त्याला म्हटलं की मुंबईला का परत येत नाहीस. परत येऊन स्वतःला कायद्याच्या हवाली कर. तर तो म्हणाला, की मला न्याय मिळणार नाही. मी अनेक लोकांच्या विरोधात गेलोय आणि त्यामुळे त्यांना मला मारायचं असू शकतं, मला न्याय मिळणार नाही. त्यामुळे मी परत येऊ शकणार नाही. तो म्हणाला की, 'मी चूकीचं काम केलं आहे पण मी स्वतः कुणालाही मारलेलं नाही. मी इतरांकडून मारायला भाग पाडलंय. त्या लोकांना अल्लाहच्या नावावर चूकीच्या गोष्टी केल्या होत्या त्यामुळे मला तसं करावं लागलं होतं." ऋषी कपूर यांनी पुढे सांगितलं, "आता या गोष्टीला खूप वर्ष झालीत. बऱ्याच गोष्टी मला आठवत नाहीत पण त्या भेटीत मी काही लकबी आणि इतर गोष्टी शिकलो. ज्याचा उपयोग मी 'डी- डे' चित्रपटामध्ये केला होता. यात मी दाऊदची भूमिका केली होती. जर मी त्याला भेटलो नसतो तर मी 'डी- डे' चित्रपटात तसे काम करु शकलो नसतो."

"दाऊद इब्राहिम ऋषी कपूरला इम्प्रेस करण्याचा प्रयत्न करत होता का ?" याचं उत्तर देताना ऋषी कपूर म्हणाले, "इम्प्रेस करण्याची काय गरज होती. मी काही त्याच्याकडून तोहफा घेतला नाही. ना काही मी मागितलं, किंवा मी त्याच्याकडून काही फेव्हर घेतलं. हे इंटरेस्टींग व्यक्तीमत्व आहे म्हणून मी त्याला भेटलो होतो. असं एखादं कॅरेक्टर मला मिळेल ज्याचा उपयोग मी करेन इतकंच मला भेटताना वाटलं होतं. त्याचा उपयोग मला 'डी- डे' करताना झाला. त्यावेळी तो फक्त क्रिमिनील होता. पण जेव्हा तो माझ्या देशाच्या विरोधात गेला तेव्हा मला खूप वाईट वाटलं."

"मग पुन्हा कधी संपर्क झाला का? हा सिलसिला कधी संपला?" असे विचारल्यानंतर ऋषी कपूर यांनी पुन्हा दाऊदशी संपर्क झाला नसल्याचं सांगितलं होतं. राज कपूर यांचा मृत्यू झाल्यानंतर त्यानं श्रद्धांजलीचा संदेश एका खास व्यक्तीसोबत दुबईहून पाठवला होता. त्यानंतर पुन्हा कधीही भेट अथवा संपर्क झाला नाही, असे ऋषी कपूर यांनी सांगितलं होतं.

हेही वाचा -

1. 'डंकी'च्या हार्ड हिटिंग डायलॉगवर चाहते झाले फिदा

2. 'फायटर'च्या शूटिंग सेटवरील हृतिक रोशनचा व्हिडिओ व्हायरल ; पाहा व्हिडिओ

3. मुनावर फारुकी 'बाईलवेडा' असल्याचा एक्स गर्लफ्रेंड नाझिला सिताशीने केला आरोप

Last Updated : Dec 20, 2023, 4:10 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.