मुंबई : बॉलिवूड स्टार सुनील शेट्टीची मुलगी अथिया शेट्टी (Athiya Shetty) लवकरच भारतीय क्रिकेटर केएल राहुलसोबत (Cricketer KL rahul) लग्नबंधनात अडकणार (KL Rahul Athiya Shetty Wedding) आहे. सध्या सोशल मीडियावर यांच्या लग्नाची बरीच चर्चा सुरू आहे. हे स्टार कपल बऱ्याच दिवसांपासून एकमेकांना डेट करत आहे. त्यामुळे सुनील शेट्टीची (Suniel Shetty) मुलगी अथिया शेट्टीच्या लग्नाच्या बातम्या बऱ्याच दिवसांपासून चर्चेत आहेत. या महिन्यात त्यांचे भव्य लग्न होणार आहे. ज्याची जय्यत तयारी सुरू झाली आहे. आता या भव्य लग्नासाठी स्थळही निश्चित करण्यात आल्याची बातमी आहे. होय, मीडिया रिपोर्ट्सवर विश्वास ठेवला तर, केएल राहुल आणि अथिया शेट्टीचे भव्य लग्न मुंबईजवळील खंडाळ्यात (Khandala) होणार आहे. जिथे दोन्ही कुटुंबातील जवळचे नातेवाईक आणि जवळचे मित्रच सहभागी होतील.
सुनील शेट्टीच्या बंगल्यात शाही थाटात होणार लग्न : रिपोर्टनुसार, अभिनेत्री अथिया शेट्टी तिचे वडील सुनील शेट्टी यांच्या खंडाळा येथील बंगल्यावर लग्न करणार आहे. सुनील शेट्टी यांचा खंडाळ्यातील हिल परिसरात खूप मोठा आणि आलिशान बंगला आहे. जेथे केएल राहुल आणि अथिया शेट्टीचे खंडाळ्यात मोठ्या थाटात लग्न होणार आहे. वृत्तांवर विश्वास ठेवला तर लग्नासाठी फक्त जवळचे नातेवाईक आणि जवळच्या मित्रांना आमंत्रित केले जाईल.
20 जानेवारीला लग्न होण्याचाी शक्यता : केएल राहुल आणि अथिया शेट्टी यांच्या लग्नाचे रिसेप्शन अद्याप निश्चित झालेले नाही. पण मीडिया रिपोर्ट्सवर विश्वास ठेवला तर या स्टार कपलचे लग्न (KL Rahul Athiya Shetty Wedding Date) या महिन्यात 20 जानेवारीच्या आसपास होऊ शकते. 20 जानेवारीच्या तारखेची अधिकृतपणे कोणीही पुष्टी केलेली नाही. लग्नाच्या तारखा अद्याप अधिकृतपणे निश्चित झालेल्या नाहीत. सोशल मीडियावर सुरू असलेल्या चर्चांनुसार, लग्नानंतर मुंबईत रिसेप्शनची योजना आखली जात आहे, ज्यामध्ये बॉलिवूड सेलिब्रिटींसोबतच स्टार क्रिकेटर्सनाही आमंत्रित करण्यात येणार आहे. सुनील शेट्टीच्या कुटुंबाकडून किंवा क्रिकेटपटूच्या कुटुंबाकडून कोणतीही माहिती समोर आलेली नाही.
अथिया-केएल घेणार ब्रेक : सोशल मीडियावर अथिया शेट्टी आणि केएल राहुलच्या लग्नाची चर्चा अनेक दिवसांपासून रंगली आहे. गेल्या तीन वर्षांपासून ते एकमेकांना डेट करत आहेत. आता लग्नासाठी दोघेही आपापल्या कामांमधून खास ब्रेक घेणार आहेत. अथिया शेट्टीने 2015 साली 'हिरो' या सिनेमातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले.