ETV Bharat / entertainment

ऋषी सुनक ब्रिटनचे पंतप्रधान झाल्याने चिरंजीवी, प्रणिता रोमांचित - Pranita Subhash

भारतीय वंशाचा व्यक्ती यूकेचा पंतप्रधान बनल्याचा आनंद आणि अभिमान जगभरातील असंख्य भारतीय व्यक्त करत असताना त्याच्यामध्ये तेलुगू सुपरस्टार चिरंजीवी आणि कन्नड अभिनेत्री प्रणिता सुभाष हेदेखील सामील झाले आहेत.

ऋषी सुनक ब्रिटनचे पंतप्रधान झाल्याने चिरंजीवी, प्रणिता रोमांचित

author img

By

Published : Oct 25, 2022, 12:38 PM IST

चेन्नई - भारतीय वंशाचा व्यक्ती यूकेचा पंतप्रधान बनल्याचा आनंद आणि अभिमान जगभरातील असंख्य भारतीय व्यक्त करत असताना त्याच्यामध्ये तेलुगू सुपरस्टार चिरंजीवी आणि कन्नड अभिनेत्री प्रणिता सुभाष हेदेखील सामील झाले आहेत. ऋषी सुनक हे ब्रिटनचे पुढचे पंतप्रधान असतील अशी बातमी आल्यानंतर लगेचच जल्लोष झाला.

मंगळवारी ट्विटरवर तेलुगू सुपरस्टार चिरंजीवी यांनी लिहिले की, "भारत जेव्हा ब्रिटीशांपासून स्वातंत्र्याची ७५ वर्षे साजरी करत आहे तेव्हा कोणी विचार तरी केला असेल की, ब्रिटीशांना भारतीय वंशाचा पंतप्रधान मिळेल, पहिला हिंदू पंतप्रधान."

  • Who would have thought when India celebrates 75 years of Independence from the British, the British will get a Prime Minister of Indian origin, a first ever Hindu PM #RishiSunak #LifeComesFullCircle #India

    — Chiranjeevi Konidela (@KChiruTweets) October 25, 2022 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

अभिनेत्री प्रणिता सुभाषलाही तिचा उत्साह आवरता आला नाही. तिने ट्विट केले की, "अभिमान आहे की (एक) भारतीय आता ब्रिटीशांचे पंतप्रधान ऋषी ​​सुनक आहेत, तुम्ही भारतीयांचा आणि हिंदूंचा अभिमान वाढवला."

तिने पुढे असेही म्हटले की, "ब्रिटनचे निवडून आलेले पंतप्रधान आणि कर्नाटकचे जावई ऋषी सुनक यांना त्यांच्या कार्यकाळासाठी खूप खूप शुभेच्छा! एक भारतीय म्हणून आणि हिंदू म्हणून मला अभिमान वाटतो की एक भारतीय हे ब्रिटनचे पंतप्रधान आहेत."

हेही वाचा - Anushka Sharma Post: 'दिवाळीपूर्वी तू आज लाखो लोकांच्या आयुष्यात आनंद घेऊन आला', कोहलीच्या खेळीनंतर अनुष्काची पोस्ट

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.