ETV Bharat / entertainment

चिरंजीवी आणि सलमान खानच्या गॉड फादर चित्रपटाचा धमाकेदार टीझर रिलीज

साऊथचा सुपरस्टार चिरंजीवी (Chiranjeevi) आणि बॉलिवूडचा सुपरस्टार सलमान खानचा (Salman Khan) आगामी चित्रपट 'गॉडफादर'चा टीझर ( Godfather Teaser ) रिलीज झाला आहे.

चिरंजीवी आणि सलमान
चिरंजीवी आणि सलमान
author img

By

Published : Aug 23, 2022, 2:01 PM IST

हैदराबाद - टॉलिवूड सुपरस्टार चिरंजीवी (Chiranjeevi) आणि बॉलिवूड सुपरस्टार सलमान खान (Salman Khan) यांच्या आगामी 'गॉड फादर' ' (GodFather) या चित्रपटाचा टीझर रिलीज झाला आहे. चिरंजीवीच्या 67 व्या वाढदिवसानिमित्त हा टीझर रिलीज करण्यात आला आहे. टीझरमध्ये सलमान आणि चिरंजीवी अॅक्शन करताना दिसत आहेत. चित्रपटात चिरंजीवी आणि सलमानशिवाय साऊथची सुपरहिट अभिनेत्री नयनताराही मुख्य भूमिकेत असणार आहे. टीझरमध्ये अभिनेत्रीची जबरदस्त झलक पाहायला मिळत आहे.

  • " class="align-text-top noRightClick twitterSection" data="">

कसा आहे टीझर? 'गॉडफादर' चित्रपटाच्या टीझर जबरदस्त अॅक्शनने भरलेला आहे. या चित्रपटात सलमान खान चिरंजीवीला सपोर्ट करताना आणि संकटांपासून वाचवताना दिसणार असल्याचे टीझरवरून स्पष्ट झाले आहे. टीझरमध्ये नयनताराचे पात्र दिसत आहे. 'कोण आला तरी फरक पडत नाही, पण त्याने येऊ नये' असे म्हणत ती टीझरमध्ये कोणाचा तरी उल्लेख करत आहे.

नयनताराच्या या वाक्यानंतर चिरंजीवीची एन्ट्री होते, ज्याला पाहून लोकांच्या आनंदाला भरती येते. टीझरमध्ये चिरंजीवी त्याच्या अॅक्शन मोडमध्ये दिसत आहे. यानंतर सलमान खान आपले डायलॉग्स बोलून टीझरमध्ये दमदार एन्ट्री करतो, जो गुंडांशी लढताना दिसत आहे.

टीझर पाहून असे दिसते की, पुन्हा एकदा साऊथचा चित्रपट बॉलीवूडला जड जाणार आहे. हा चित्रपट किती हिट ठरू शकतो याची कल्पनाही करता येणार नाही. चित्रपटाच्या रिलीजबद्दल बोलायचे झाले तर 'गॉड फादर' 5 ऑक्टोबर 2022 रोजी रिलीज होणार आहे.

या चित्रपटाचे दिग्दर्शन मोहन राजा यांनी केले आहे. सलमानच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचे झाले तर भाईजान लवकरच 'टायगर 3' आणि 'कभी ईद कभी दिवाली'मध्ये दिसणार आहे.

हेही वाचा - सोनाली फोगटची शेवटची इन्स्टा पोस्ट पाहून चाहत्यांना अश्रू अनावर

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.