मुंबई : बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमारचा चित्रपट 'ओ माय गॉड २'ने दुसऱ्या दिवशी बॉक्स ऑफिसवर चांगली झेप घेतली आहे. बॉक्स ऑफिसवर अक्षय कुमारचा 'ओ माय गॉड २' चित्रपट हिट होणे आवश्यक असून हा चित्रपट चांगली कमाई करेल असे दिसत आहे. या चित्रपटाचे बजट वसूल होईपर्यंत हा चित्रपट हिट की फ्लॉप हे सांगणे कठीण आहे. दरम्यान आता या चित्रपटाची दुसऱ्या दिवशीची कमाई समोर आली आहे. 'ओ माय गॉड २' चित्रपटाने दोन दिवसांत बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई केली आहे. आज रविवारी 'ओ माय गॉड २' चित्रपट आणखी चांगली कमाई करेल अशी अपेक्षा केली जात आहे.
'ओ माय गॉड २' चित्रपटाची कमाई : अमित राय दिग्दर्शित 'ओ माय गॉड २' हा चित्रपट 'गदर २' पेक्षा कमी कमाई करत आहे. मात्र तरीही हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर चांगले कलेक्शन करत आहे. इंडस्ट्री ट्रॅकर सॅकनिल्कनुसार 'ओ माय गॉड २' चित्रपटाने रिलीजच्या दुसऱ्या दिवशी १५.३० कोटीची कमाई केली आहे. या चित्रपटाने आतापर्यंत एकूण २५.५६ कोटींचा व्यवसाय बॉक्स ऑफिसवर केला आहे. हा चित्रपट 'ओह माय गॉड'चा सीक्वल आहे. या चित्रपटाच्या पहिल्या भागात परेश रावल आणि अक्षय कुमारने प्रेक्षकांची मने जिंकली होती.
'ओ माय गॉड २' चित्रपटाचे बजेट १५० कोटी : ११ ऑगस्ट २०२३ रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित झालेल्या, 'ओ माय गॉड २' चित्रपटामध्ये अक्षय कुमार व्यतिरिक्त यामी गौतम आणि पंकज त्रिपाठी यांच्या प्रमुख भूमिका आहेत. आता सध्या अक्षय कुमारच्या 'ओ माय गॉड २'ला बॉक्स ऑफिसवर संघर्ष करावा लागणार आहे. कारण 'गदर २' हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर खूप मोठ झेप घेत असल्याचे दिसत आहे. दरम्यान अक्षय कुमारचा चित्रपट सध्या चांगली कामगिरी करत आहे. 'ओ माय गॉड २' चित्रपटाचे बजेट १५० कोटी रुपये असल्याचे सांगण्यात आले आहे. हा चित्रपट या कमाईपासून खूप दूर आहे, मात्र तरीही ओ माय गॉड २' लवकरच १५० आकडा पार करेल अशी शक्यता वर्तवली जात आहे. दरम्यान १५ ऑगस्ट रोजी चित्रपटाच्या कमाईत आणखी वाढ होईल असे सध्या दिसत आहे.
हेही वाचा :
- Sridevi 60th Birthday : श्रीदेवीच्या ६०व्या वाढदिवसाची गुगलकडून खास आठवण, डुडलमध्ये दाखविला चित्रपटसृष्टीतील प्रवास
- Gadar 2 box office Collection Day 2 : 'गदर २'चा बॉक्स ऑफिसवर दबदबा; सनी देओलच्या सिनेमाची आजवरची सर्वात मोठी कमाई
- Sridevi's 60th Birthday : श्रीदेवीच्या वाढदिवसानिमित्त पती बोनी कपूर आणि मुलगी खुशी कपूर, जान्हवी कपूरने थ्रोबॅक फोटो केला शेअर...