ETV Bharat / entertainment

Akshay Kumar Birthday: वाढदिवसानिमित्त बॉलीवूड स्टार अक्षय कुमारनं लावली महाकालेश्वर मंदिरात हजेरी....

Akshay Kumar Birthday: अक्षय कुमार आज त्याचा वाढदिवस साजरा करत आहे. वाढदिवसानिमित्त अक्षय हा मध्य प्रदेशातील उज्जैन इथं महाकालेश्वर मंदिरात दर्शनासाठी गेला. त्यावेळी त्याच्यासोबत त्याची बहीण, भाची आणि मुलगा हे देखील उपस्थित होते.

author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Sep 9, 2023, 12:31 PM IST

Akshay Kumar Birthday
अक्षय कुमारचा वाढदिवस...

मुंबई Akshay Kumar Birthday: बॉलिवूड खिलाडी अक्षय कुमार आज त्याचा 56 वा वाढदिवस साजरा करत आहे. अक्षय कुमारचा जन्म 9 सप्टेंबर 1967 रोजी अमृतसर, पंजाब इथं झाला. अक्षयचं खरे नाव राजीव भाटिया आहे. चित्रपटसृष्टीत आल्यानंतर त्यानं त्याचं नाव बदललं. अक्षयच्या वडिलांचं नाव हरी ओम भाटिया असून ते सैन्यात अधिकारी होते. अभिनेता अक्षय कुमार देखील मार्शल आर्टमध्ये पारंगत आहे. चित्रपटसृष्टीत येण्यापूर्वी तो मुलांना मार्शल आर्ट शिकवत होता. अक्षय हा असा अभिनेता आहे, जो दरवर्षी 3-4 चित्रपटांमध्ये मुख्य कलाकार म्हणून काम करतो. अक्षय कुमारनं 1991 मध्ये 'सौगंध' चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं होतं. या चित्रपटात त्याच्यासोबत राखी आणि शांतीप्रिया मुख्य भूमिकेत होत्या. अक्षय कुमार नुकत्याच प्रदर्शित झालेल्या 'ओएमजी 2' या चित्रपटाच्या यशामुळे चर्चेत आहे. आता अक्षय हा त्याच्या आगामी 'मिशन राणीगंज' या चित्रपटाच्या यशासाठी प्रार्थना करत आहे.

अक्षय कुमार महाकालेश्वर मंदिरात दर्शनासाठी पोहचला : दरम्यान आज त्याच्या वाढदिवसानिमित्त अक्षय हा मध्य प्रदेशातील उज्जैन इथं महाकालेश्वर मंदिरात दर्शनासाठी गेला आहे. अक्षय कुमारसोबत त्याची बहीण, भाची आणि मुलगा देखील यावेळी उपस्थित असल्याचं दिसत आहेत. अक्षय कुमारनं भस्म आरतीमध्ये सहभाग घेतला होता. यावेळी अक्षय कुमारनं मंदिराच्या परंपरेनुसार भगव्या रंगाचं धोतर आणि सोला परिधान केला आहे. प्रसारमाध्यमांशी बोलताना त्यानं, 'आपल्या देशाचा विकास होत राहावा आणि बाबांचा आशीर्वाद कायम राहावा'. असं त्यानं म्हटलं.

शिखर धवन आणि सायना नेहवाल दर्शनासाठी मंदिरात पोहोचले : अक्षय कुमारशिवाय भारतीय संघाचा सलामीवीर फलंदाज शिखर धवन देखील आज महाकालेश्वर मंदिरात प्रार्थना करताना दिसला. या पूजेदरम्यान शिखरचं कुटुंबीयही उपस्थित होतं. याशिवाय शिखर धवन हा सुद्धा भस्म आरतीमध्ये सहभागी झाला होता. नंदी हॉलमध्ये बसून धवननं महादेवाची पूजाही केली. यावेळी धवननं पांढरा कुर्ता पायजमा आणि टॉवेल परिधान केलेला दिसला. शिखर धवन आणि अक्षय कुमार विमानतळावरुन थेट महाकालच्या दरबारात पोहोचले होते. त्यानंतर बॅडमिंटनपटू सायना नेहवालही महाकाल मंदिरात पोहोचली. सायना ही भोग आरतीमध्ये सहभागी होताना दिसली.

हेही वाचा :

  1. Mahesh Babu reviews Jawan : साउथ सुपरस्टार महेश बाबूनं पाहिला 'जवान'; शाहरुखचं केलं कौतुक...
  2. G Marimuthus death : 'जेलर' अभिनेत्याच्या मृत्यूनं रजनीकांतला धक्का; मरिमुथुच्या छातीत दुखत असल्याचा व्हिडिओ व्हायरल
  3. Asha Bhosle Birthday : चिरतरुण आवाजाच्या सदाबहार गायिका आशा भोसलेंचा वाढदिवस; गाण्यांच्या जादूनं जिंकलं जग...

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.