ETV Bharat / entertainment

Kangana Ranaut : बॉलिवूड क्वीन पोहोचली कामाख्या देवीच्या दर्शनाला... - शक्तीपीठ कामाख्या देवी

बॉलिवूड अभिनेत्री कंगना राणौत सध्याला चर्चेत आली आहे. कंगना नुकतीच आसाममधील शक्तीपीठ कामाख्या देवीच्या मंदिरात दर्शनासाठी गेली होती. कंगनाने तिच्या इंस्टाग्राम अकाउंटवर एक व्हिडिओ शेअर केला आहे, ज्यात ती कामाख्या मातेचा आशिर्वाद घेत आहे.

Kangana Ranaut
कंगना राणौत
author img

By

Published : Jun 28, 2023, 7:42 PM IST

मुंबई : बॉलिवूडची 'क्वीन' कंगना राणौत नुकतीच आसाममधील शक्तीपीठ कामाख्या देवीच्या मंदिरात दर्शनासाठी गेली आहे, ज्याचा व्हिडिओ तिने आपल्या सोशल मीडियावर शेअर केला आहे. यादरम्यान तिने मंदिरात पोहोचून मातेचे दर्शन घेतले आणि इन्स्टाग्रामवर व्हिडिओ शेअर करताना कॅप्शन लिहिले की, 'आज कामाख्या मातेच्या मंदिराला भेट दिली... या मंदिरात जगाच्या मातेची योनीच्या रूपात पूजा केली जाते. .. ही आई. आणि हे पवित्र स्थान शक्तीचे विशाल रूप आहे..हे एक शक्तीपीठ आहे.. जिथे शक्तीचा अद्भुत संचार आहे.

कंगना गेली मां कामाख्या देवाच्या मंदिरात : कंगनाच्या या व्हिडिओवर अनेक कमेंट्स आल्या, एका यूजरने 'सनातनी क्वीन' अशी कमेंट केली. तर एकाने 'जय माता दी मां कामाख्याचे आशीर्वाद' अशी कमेंट केली. नुकताच कंगना राणौत निर्मित 'टिकू वेड्स शेरू' हा रोमँटिक-कॉमेडी चित्रपट अमेझॉन प्राईमवर प्रदर्शित झाला आहे. यात नवाजुद्दीन आणि अवनीत कौर मुख्य भूमिकेत होते, हा चित्रपट २३ जून रोजी प्रदर्शित झाला होता.

'इमर्जन्सी' चित्रपट : कंगनाच्या आगामी चित्रपटाबद्दल बोलायचे झाले तर ती लवकरच 'इमर्जन्सी'मध्ये दिसणार आहे. कंगना या चित्रपटाची दिग्दर्शक निर्माती आहे. या चित्रपटात कंगना व्यतिरिक्त अनुपम खेर, महिमा चौधरी, श्रेयस तळपदे, भूमिका चावला, सतीश कौशिक, मिलिंद सोमण हे कलाकार देखील अभिनय करताना दिसणार आहेत. हा चित्रपट लवकरच रूपेरी पडद्यावर प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाकडून कंगनाला फार जास्त अपेक्षा आहे. कारण कंगानाचे मागील काही वर्षापासून अनेक चित्रपट फ्लॉप होत आहे. या चित्रपटामध्ये मणिकर्णिका झाशीची राणी, जजमेंटल है क्या, पंगा, थलायवी अशा अनेक चित्रपटाचा समावेश आहे.

कंगना वादग्रस्त बोलण्यामुळे चर्चेत : कंगना अनेकदा तिच्या वादग्रस्त बोलण्यामुळे चर्चेत राहते. तसेच ती अनेकदा बॉलिवूडमधील नेपोटिज़्मवर बोलत असते. त्यामुळे तिचे बॉलिवूडमध्ये फार शुत्रू निर्माण झाले आहे. गेल्या काही दिवसापासून कंगनाचा एक चित्रपट रूपेरी पडद्यावर प्रदर्शित झाला नाही त्यामुळे कंगनाचा 'इमर्जन्सी' हा चित्रपट किती प्रेक्षकांना आवडेल हे येणाऱ्या काळात समजेल.

हेही वाचा :

  1. 72 Hoorain Trailer OUT : दहशतवाद्यांच्या जगाची काळीकुट्ट बाजू दाखवणारा 72 हुरैनचा ट्रेलर आऊट
  2. Satyaprem Ki Katha advance booking : सत्यप्रेम की कथाच्या आगाऊ बुकींगला चांगला प्रतिसाद
  3. Asin breaks silence on divorce: घटस्फोटाची चर्चा काल्पनिक आणि निराधार असल्याचा असिनचा दावा

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.