मुंबई - Kartik Aaryan Birthday: अभिनेता कार्तिक आर्यननं स्वत:ची चित्रपटसृष्टीत एक वेगळीच ओळख निर्माण केली आहे. कुठल्याही मदतीशिवाय त्यानं इंडस्ट्रीत आपली एक जागा निर्माण केली आहे. आता अनेक बड्या दिग्दर्शकांना त्याला त्यांच्या चित्रपटात कास्ट करायचे आहे. 22 नोव्हेंबर रोजी बॉलिवूडचा शहादाजा आपला 33वा वाढदिवस साजरा करत आहे. या खास प्रसंगी कार्तिकनं त्याच्या इंस्टाग्राम अकाऊंटवर एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये तो आपल्या पाळीव श्वानबरोबर त्याचा वाढदिवस साजरा करताना दिसत आहे. केक कापण्यापूर्वी तो हात जोडून आशीर्वाद मागताना दिसत आहे.
कार्तिक आर्यनने त्याचा वाढदिवस साजरा केला : फोटोमध्ये कार्तिकचा कुत्रा हा केककडे पाहत आहे. कार्तिकनं शेअर केलेली पोस्ट सोशल मीडियावर चांगलीच व्हायरल होत आहे. हा सुंदर फोटो शेअर करताना त्यानं कॅप्शनमध्ये लिहलं की, 'तुमच्या प्रेमासाठी सर्वांचे आभार' याशिवाय त्यानं केक आणि हार्टचा इमोजी पोस्टवर पोस्ट केला आहे. त्याच्या या पोस्टवर त्याचे अनेक चाहते आणि सेलिब्रिटी कमेंट करून त्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा देत आहेत. एका चाहत्यानं कमेंटमध्ये लिहलं, 'तू आणि तूझा पपी खूप खास दिसत आहेत ' त्यानंतर दुसऱ्या एका चाहत्यानं लिहलं, 'वाढदिवसाच्या शुभेच्छा कार्तिक' त्यानंतर आणखी एकानं लिहलं, 'फोटो खूप सुंदर आहे' अशा अनेक कमेंट या पोस्टवर येत आहेत. याशिवाय काहीजण या पोस्टवर हार्ट आणि फायर इमोजी पोस्ट करत आहे.
सेलिब्रिटींनी दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा : टायगर श्रॉफनं पोस्टवर कमेंट करत लिहलं, 'वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा भावा' या पोस्टवर वाणी कपूरनं लिहलं, 'वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा'. याशिवाय आयुषमान खुरानानं लिहलं, 'वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा कार्तिक' यासोबत त्यानं एक हार्ट इमोजी पोस्ट केला आहे. अनेक सेलिब्रिटी कार्तिकला सध्या शुभेच्छा देताना दिसत आहेत. कार्तिकच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झाल, तर सध्या तो त्याच्या आगामी 'चंदू चॅम्पियन' चित्रपटामुळं चर्चेत आहे. या चित्रपटाद्वारे तो बॉक्स ऑफिसवर दमदार कमबॅक करण्याच्या तयारीत आहे. कार्तिकला या चित्रपटाकडून खूप अपेक्षा आहेत. चंदू चॅम्पियन' चित्रपटासाठी त्यानं खूप मेहनत घेतली आहे.
हेही वाचा :