ETV Bharat / entertainment

Bigg Boss 17: 'बिग बॉस 17'मधील सलमानच्या फ्लर्टिंगवरून कंगनाचं मोठ व्यक्तव्य; म्हणाली... - कंगना राणौतने केला गरबा

Bigg Boss 17: 'बिग बॉस 17'च्या वीकेंड का वॉरमध्ये कंगना रणौत आणि सलमान खानमध्ये जबरदस्त केमिस्ट्री पाहायला मिळणार आहे. या शोचा प्रोमो हा रिलीज झाला आहे.

Bigg Boss 17
बिग बॉस 17
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Oct 22, 2023, 5:39 PM IST

मुंबई - Bigg Boss 17 : बॉलीवूडचा सुपरस्टार सलमान खानचा रिअ‍ॅलिटी शो 'बिग बॉस'च्या 17व्या सीझनचा पहिला वीकेंड खूपच धमाकेदार असणार आहे. 'बिग बॉस'च्या 17व्या सीझनमध्ये अनेक सेलेब्रिटी सध्या हजेरी लावत आहेत. दरम्यान आता सोशल मीडियावर सलमान खान आणि कंगना राणौतचा एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे. हा व्हिडिओ चाहत्यांना खूप आवडत आहे. या व्हिडिओमध्ये सलमान कंगनासोबत फ्लर्ट करताना दिसत आहे. याशिवाय व्हिडिओमध्ये कंगना रणौत सलमान खानला त्यांचे फ्लर्टिंग कौशल्य दाखविण्यास सांगताना दिसत आहे .'बिग बॉस 17' मध्ये कंगाना ही आगामी 'तेजस' चित्रपटाचे प्रमोशन करताना दिसेल. कंगाना राणौत ही वीकेंड का वारमध्ये सलमान खानसोबत खूप धमाल करताना दिसणार आहे.

सलमान खान-कंगना राणौतची अप्रतिम केमिस्ट्री : 'बिग बॉस 17'च्या नवीन प्रोमोमध्ये सलमान खान आणि कंगना रणौत यांच्यात जबरदस्त केमिस्ट्रीची झलक पाहायला मिळत आहे. सलमाननं कंगनाला प्रश्न केला की, 'तुमचा को-स्टार तुमच्यासोबत फ्लर्ट करत असेल तर , त्यानंतर कंगना यावर म्हटलं. जर तो तुमच्यासारखा देखणा असेल तर ती मनापासून विचार करेल.' यानंतर कंगनाही सलमानला तिच्यासोबत फ्लर्ट करण्यास सांगते. सलमान हा तिच्यासोबत फ्लर्ट करतो. त्यानंतर तो म्हणतो, 'तू खूप सुंदर दिसत आहेस, पुढची 10 वर्ष तू काय करणार आहे? त्यानंतर दोघेही हसतात. या शो दरम्यान सलमान आणि कंगना खूप मस्ती केली.

सलमान खान-कंगना राणौतने केला गरबा : कंगना राणौत आणि सलमान हे दोघेही दीपिका पदुकोणच्या गरबा गाण्यात 'नगाडा संग ढोल'वर दांडिया खेळतात. त्यानंतर 'किसी का भाई किसी की जान' या चित्रपटातील गाण्यावर ते डान्स करतात. या शोमध्ये कंगना ही मुनावर फारुकीसोबत मस्ती करताना दिसणार आहे. याआधी मुनावरला कंगनाच्या शो 'लॉकअप'मध्ये पाहिल्या गेले होते.

कंगना राणौतचा वर्क फ्रंट : 'चंद्रमुखी 2' चित्रपटानंतर कंगना राणौत आता 'तेजस' आणि 'इमर्जन्सी'मध्ये दिसणार आहे. कंगना राणौतचा 'तेजस' हा चित्रपट सत्यकथेवर आधारित आहे. या चित्रपटात ती भारतीय वायुसेनेच्या पायलटची भूमिका साकारताना दिसणार आहे. 'तेजस'मध्ये ती तेजस गिलची भूमिकेत दिसेल. हा चित्रपट 27 ऑक्टोबरला थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे. 'तेजस'नंतर कंगना राणौत लवकरच 'इमर्जन्सी'मध्ये दिसणार आहे. या मोस्ट अवेटेड चित्रपटात कंगना माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांची भूमिका साकारताना दिसणार आहे.

हेही वाचा :

  1. The Girlfriend First Look: साऊथ अभिनेत्री रश्मिका मंदान्नाचं 'द गर्लफ्रेंड'मधील फर्स्ट लूक प्रदर्शित; पहा व्हिडिओ...
  2. Dalip Tahil : दलीप ताहिलला दोन महिन्याची शिक्षा न्यायालयानं सुनावली; हिट अँड रन प्रकरणात दोषी
  3. Ganapath Box Office Collection Day 3 : टायगर श्रॉफ आणि क्रिती सेनॉन स्टारर 'गणपथ' करत आहे बॉक्स ऑफिसवर मंद गतीनं कमाई...

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.