मुंबई - Bigg Boss 17: 'बिग बॉस 17' हा शो सध्या खूप चर्चेत आहे. सर्व स्पर्धक प्रेक्षकांचं भरपूर मनोरंजन करत आहेत. या शोमधील स्पर्धक आपले सर्वोत्तम देण्याचा प्रयत्न करत आहेत. गुरुवारच्या एपिसोडमध्ये करवा चौथ स्पेशल दाखवण्यात येणार आहे. अंकिता लोखंडे आणि ऐश्वर्या शर्मा आपल्या पतीसाठी करवा चौथचा उपवास करणार आहेत. दरम्यान अभिनेत्री मन्नारा चोप्राचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हिडिओमध्ये मन्नारा रडताना दिसत आहे. घरातील सर्व सदस्य तिला गप्प करण्याचा प्रयत्न करत आहेत. या व्हिडिओमध्ये घरातील सर्व सदस्य तिला समजवत आहेत.
मन्नारा चोप्रा का दुखावली? : व्हिडिओमध्ये मन्नारा म्हणते की, 'बिग बॉस मला कन्फेशन रूममध्ये यावे लागेल आणि मला या शोमधून बाहेर पडावे लागेल. यावेळी ती खूपच भावूक दिसत आहे. हा व्हिडिओ शेअर करताना कलर्स पेजवर लिहलं गेलं, 'मन्नाराचे डोळे भरून आले आहेत, तिला कोणी दुखावले?' मन्नाराबद्दल बोलायचं झालं तर तिनं साऊथ चित्रपटांमध्ये काम केलं आहे. ती अभिनेत्री प्रियांका चोप्रा आणि परिणीती चोप्राची चुलत बहीण आहे. जेव्हापासून मन्नारानं बिग बॉसच्या घरात एंट्री केला आहे, तेव्हापासून ती तिच्या बबली शैलीनं चाहत्यांचे भरपूर मनोरंजन करत आहे. या शोमध्ये मन्नारा आणि मुनावर यांच्यात चांगली बॉन्डिंग पाहायला मिळत आहे.
'बिग बॉस'च्या घरात झाला वाद : 'बिग बॉस 17'मध्ये अंकिता लोखंडेसोबतही मन्नाराचं भांडण झालं होतं. बिग बॉसच्या घराबद्दल बोलायचं झालं तर, गेल्या एपिसोडमध्ये रेशन टास्क होता. यावेळी बिग बॉस सर्व स्पर्धकांवर नाराज झाले होते. बिग बॉसमध्ये टास्कदरम्यानही बराच गोंधळ पाहायला मिळाला. त्यामुळे बिग बॉसनं हा टास्क मध्येच थांबवला होता. त्यानंतर खोली क्रमांक 1 आणि 3 मध्ये फक्त मूलभूत रेशन मिळाले. त्यामुळे घरात अनेक भांडणं होत होती. याव्यतिरिक्त, एक प्रोमो व्हायरल झाला आहे, ज्यामध्ये ईशा मालवीय आणि समर्थ जुरेल यांच्यात जोरदार वाद होताना दिसत आहे. त्यानंतर ईशाच्या एक्स बॉयफ्रेंड अभिषेक कुमारनं त्यांची भांडणे पाहिली आणि समर्थला पाठिंबा दिला.
-
Inside & outside bas #MunAra hi chal raha hai 🤩 #MunawarFaruqui gave flower to#MannaraChopra best moment of day.
— #BiggBoss17_Tak (@BiggBoss17_Tak) October 23, 2023 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
Repost & ❤️ if you like them.#BiggBoss17pic.twitter.com/WdfGIpFslX
">Inside & outside bas #MunAra hi chal raha hai 🤩 #MunawarFaruqui gave flower to#MannaraChopra best moment of day.
— #BiggBoss17_Tak (@BiggBoss17_Tak) October 23, 2023
Repost & ❤️ if you like them.#BiggBoss17pic.twitter.com/WdfGIpFslXInside & outside bas #MunAra hi chal raha hai 🤩 #MunawarFaruqui gave flower to#MannaraChopra best moment of day.
— #BiggBoss17_Tak (@BiggBoss17_Tak) October 23, 2023
Repost & ❤️ if you like them.#BiggBoss17pic.twitter.com/WdfGIpFslX
हेही वाचा :
- 12th Fail vs Tejas box office day 7: विक्रांत मॅसीचा '12th Fail' नं ओलांडला 10 कोटीचा टप्पा, कंगनाचा 'तेजस' घुटमळला
- Dunki vs Salaar : शाहरुख खान आणि प्रभासच्या चाहत्यांमध्ये झाला वाद ; 'डंकी' आणि 'सालार' होणार एकाच दिवशी प्रदर्शित
- Nick and Priyanka : निक जोनासनं प्रियांका चोप्राचा फोटो शेअर करत 'जस्ट लुकिंग लाइक अ व्वा' ट्रेंड केला फॉलो