मुंबई - Munawar Faruqui cries after in bigg boss : बिग बॉस 17मध्ये वाइल्डकार्ड एन्ट्री झालेली स्पर्धक आयेशा खान आणि मुनावर फारुकी यांच्यात झालेल्या कडाक्याच्या भांडणामुळे दोघेही चर्चेत आहेत. आयेशानं मुनावरच्या नातेसंबंधावर चर्चा केल्यानं तो दुखावल्याचं दिसला. त्यानंतर तो भावना विवश होऊन रडतानाही प्रोमोमध्ये दिसत आहे.
-
#MunawarFaruqui breakdown after #AyeshaKhan entry pic.twitter.com/wLzcEdSY0J
— The Khabri (@TheKhabriTweets) December 17, 2023 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">#MunawarFaruqui breakdown after #AyeshaKhan entry pic.twitter.com/wLzcEdSY0J
— The Khabri (@TheKhabriTweets) December 17, 2023#MunawarFaruqui breakdown after #AyeshaKhan entry pic.twitter.com/wLzcEdSY0J
— The Khabri (@TheKhabriTweets) December 17, 2023
शोमधील व्हायरल झालेल्या या क्लिपमध्ये मुनावर त्यांच्या नातेसंबंधाबद्दल आयेशाने केलेल्या वादामुळे निराश झाल्याचं दिसतो. रडताना तो पश्चाताप व्यक्त करतानाही दिसत आहे. त्यानं मनं दुखावल्याचं कबूल केलं आणि तो आपल्या भावना खऱ्या असल्याचं म्हणाला. "तुम्ही लोकांनी मला नऊ आठवड्यांपासून पाहिले आहे. मी खोटा नाही," असं तो म्हणत होता.
-
Promo #BiggBoss17 #MunawarFaruqui crying, Ayesha Khan ke ilzaamu me ghirr pic.twitter.com/dXIvvlSJeC
— The Khabri (@TheKhabriTweets) December 18, 2023 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">Promo #BiggBoss17 #MunawarFaruqui crying, Ayesha Khan ke ilzaamu me ghirr pic.twitter.com/dXIvvlSJeC
— The Khabri (@TheKhabriTweets) December 18, 2023Promo #BiggBoss17 #MunawarFaruqui crying, Ayesha Khan ke ilzaamu me ghirr pic.twitter.com/dXIvvlSJeC
— The Khabri (@TheKhabriTweets) December 18, 2023
मुनावर भावूक झाला असताना त्याच्या जवळच्या मैत्रिणी मन्नारा चोप्रा, समर्थ जुरेल आणि अंकिता लोखंडे यांनी त्याला धीर देण्याचा व सांत्वन करण्याचा प्रयत्न केला. बिग बॉस 17 मधील सर्वात प्रबळ स्पर्धक म्हणून ओळखला जात असतानाही, मुनावरने संधी मिळाल्यास शो सोडून बाहेर जाण्याचा विचार यावेळी बोलून दाखवला.
पूर्व प्रेयसीसोबत ब्रेकअप झाल्याचा दावा करूनही आयेशाने मुनावरला अनेक महिलांसोबतच्या तो संपर्कात राहतो याचा जाब विचारला. तिने त्याच्यावर प्रेमाचा दावा केल्याचा आणि इतर महिलांशी संवाद साधताना क्वालिटी टाईम मागितल्याचा आरोपही केला. आयेशाला हा विश्वासघात असल्याचं वाटलं आणि मुनावरच्या सार्वजनिक जीवनातील इमेजचा त्यांच्या नाते संबंधावर कसा परिणाम झाला याबद्दलही भाष्य केलं. हा मुद्दा आता वैयक्तिक बाबींच्या पलीकडचा असल्याचं ती म्हणाली.
आयेशाने यावर जोर दिला की मुनवरची बदनामी करणे हा तिचा कधीच उद्देश नव्हता, तर शो जिंकणे हेच तिचं ध्येय आहे. तिच्याशी भावनिक नाते ठेवून मुनावरने इतर महिलांशीही संबंध ठेवल्यानं तिचा त्याच्यावरचा विश्वास उडाल्याचं ती म्हणाली. तिनं शोमधील मुनावरच्या वर्तनावरही टीका केली.
आयेशा खान बिग बॉस 17 मध्ये वाईल्ड कार्ड एन्ट्री
आयेशा खानची बिग बॉसमध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री झाल्यामुळे घरात स्फोटक घडामोडी घडून शकतात हा निर्मात्यांचा अंदाज खरा ठरतोय. खान भारतातील एक जबरदस्त मॉडेल आणि अभिनेत्री असलेली आयेशा खान ही कॉमेडियन मुनावर फारुकीची एक्स गर्लफ्रेंड आहे.
हेही वाचा -
1. 'डंकी' चित्रपटाच्या प्रमोशनसाठी शाहरुख खाननं गाठलं दुबई ; चाहत्यांकरिता दिली सिग्नेचर पोझ