ETV Bharat / entertainment

Bigg Boss 17 : बिग बॉसचा 17वा सीझन प्रेक्षकांसाठी सज्ज; पाहा सलमान खानचा बिग बॉस कधी होणार प्रसारित... - बिग बॉसचा 17वा सीझन

Bigg Boss 17 : सलमान खानचा शो 'बिग बॉसचा 17वा सीझन प्रदर्शनासाठी सज्ज झाला आहे. या सीझनसाठी चाहते खूप उत्सुक आहेत. या शोमध्ये स्पर्धक म्हणून कोण झळकेल हे जाणून घेण्यासाठी वाचा...

Bigg Boss 17
बिग बॉस 17
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Oct 12, 2023, 6:27 PM IST

मुंबई Bigg Boss 17 : सलमान खान होस्ट करत असलेला बिग बॉसचा 17वा सीझन लवकरच सुरू होणार आहे. प्रत्येकजण या सीझनसाठी उत्सुक आहेत. प्रत्येकाला या शोबद्दलचे सर्व अपडेट्स जाणून घ्यायला आवडतं. या शोमध्ये कोणते सेलेब्स येणार आहेत हे चाहत्यांना सध्या जाणून घ्यायचं आहे. 'बिग बॉस 17' हा शो कलर्स वाहिनीवर १५ ऑक्टोबरपासून सुरू होणार आहे. 'बिग बॉस 17' शो सोमवार ते शुक्रवार रात्री १० वाजता आणि शनिवार-रविवार रात्री ९ वाजता प्रसारित होईल. शनिवार-रविवारी 'वीकेंड का वार' प्रेक्षकांना पाहायला मिळेल. या दिवशी सलमान खान सर्व स्पर्धकांची क्लासेस घेईल याशिवाय, हा शो जीओ सिनेमा ( Jio Cinema) अ‍ॅपवर देखील स्ट्रीम केला जाईल. हा शो 24 तास लाइव्ह स्ट्रीमिंग असेल.

थीम काय आहे : यावेळी शोची थीम खूपच वेगळी असणार आहे. यावेळी सर्व स्पर्धकांना 3 भागात विभागले जाईल. या शोचा प्रोमो हा रिलीज करण्यात आला आहे. याशिवाय यावेळी शोमध्ये कपल्स आणि सिंगल्स येणार आहेत. 'बिग बॉस 17' शोमध्ये अनेक लोकप्रिय जोडपी स्पर्धक म्हणून येत आहेत. या जोडप्यांना हार्ट विभागात ठेवण्यात येणार असल्याचं बोललं जात आहे. जे अविवाहित आहेत ते ब्रेनडी विभागात असतील. तर डमवालेमध्ये असे स्पर्धक असतील ज्यांच्याकडे विशेष अधिकार असतील. यावेळी बिग बॉस स्पर्धकांमध्ये भेदभाव करताना दिसणार आहे.

स्पर्धक कोण असू शकतात : आतापर्यंत, ज्यांची नावे या शोमध्ये स्पर्धक म्हणून पुढे येत आहेत ती म्हणजे अंकिता लोखंडे आणि विकी जैन, यूट्यूबर अरमान मलिक आणि पायल मलिक, यूके रायडर, कीर्ती मेहरा, मुन्नावर फारुकी, ममता कुलकर्णी. सध्या निर्मात्यांनी अद्याप याबद्दल पुष्टी केलेली नाही. कंगना राणौतचा टीव्ही शो लॉक अप सीझन 1 ची विजेता आणि वादग्रस्त कॉमेडियन मुन्नावर फारुकीचे नाव बिग बॉस 17 शी जोडले गेले आहे. याशिवाय प्रियांका चोप्रा आणि परिणीती चोप्राची चुलत बहीण आणि अभिनेत्री मनारा चोप्रा देखील बिग बॉस 17 मध्ये येत आहे. बिग बॉस ओटीटी 2 विजेता एल्विश यादवची एक्स गर्लफ्रेंड शोमध्ये येणार असल्याचं बोललं जात आहे.

हेही वाचा :

  1. Jawan And The Vaccine War : ब्लॉकबस्टर 'जवान' प्रेक्षकांना 99 रुपयांमध्ये पाहता येणार, किंग खानची चाहत्यांना भेट
  2. Koffee With Karan Season 8: ग्लॅमरस तारे तारकांसह कॉफीच्या गरम सिझनसाठी करण जोहर सज्ज
  3. Kartik Aaryan : कार्तिक आर्यननं 'चंदू चॅम्पियन' चित्रपटामधील फोटो केला शेअर; संधी दिल्याबद्दल दिग्दर्शकाचे मानले आभार...

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.