ETV Bharat / entertainment

'बिग बॉस 17'मध्ये अंकितासह विकी जैनला ज्योतिषींनी दिला 'हा' सल्ला - विकी आणि अंकिताचं भविष्य

Bigg Boss 17: 'बिग बॉस 17'मध्ये अंकिता लोखंडेसह घरातील राहण्याऱ्या सर्व सदस्याचं भविष्य ज्योतिषीनं सांगितलं. अंकिताला कुठल्याही निर्णय घेण्याच्या आधी विचार करण्याचा सल्ला दिला आहे.

Bigg Boss 17
बिग बॉस 17
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Jan 14, 2024, 2:04 PM IST

मुंबई - Bigg Boss 17: 'बिग बॉस 17' शेवटच्या टप्प्यात असून या शोमध्ये या आठवड्यात फॅमिली वीक दरम्यान ज्योतिषीनेही बिग बॉसमध्ये प्रवेश केला. शनिवारच्या एपिसोडमध्ये घराघरात पोहोचलेल्या ज्योतिषानं घरात उपस्थित स्पर्धकांच्या भविष्याबद्दल सांगितलं. अनेकांना सावधपणे चालण्याचा सल्ला यावेळी देण्यात आला आहे. ज्योतिषानं अंकिता आणि विक्कीबाबतही भविष्यवाणी केली. अंकिताबद्दल ज्योतिषीनं सांगितलं, ''2001 नंतरचा तुझा काळ खूप छान गेला आहे. तुम्ही यश मिळवले तसेच प्रसिद्धी मिळवली आहे. चांगले जीवन जगले आहे. तुमच्या भविष्यात आणखी चांगले क्षण येणार आहेत.'' ज्योतिषीनं पुढं सांगितलं, तू आणखी यशस्वी होणार आहे. काही मोठे निर्णय होतील. प्रत्येक गोष्ट विचार करूनच करावी लागेल. एप्रिलपूर्वी तुम्हाला कोणत्याही मोठ्या निर्णयापासून दूर राहावे लागेल.''

विकी आणि अभिषेकचं भविष्य : यानंतर विकीच्या बाबतही भविष्यवाणी केली. विकीला यावेळी सांगितलं, ''तू भावनिक असून प्रत्येक परिस्थितीत समोरच्या व्यक्तीकडून समान प्रतिसादाची अपेक्षा करतो. पण नेहमी तुला प्रतिसाद मिळेल असं होत नाही. तुला कोणाकडून काही अपेक्षा ठेवण्याची गरज नाही.'' यानंतर अभिषेकबाबत ज्योतिषीनं म्हटलं, ''तू खूप भावूक व्यक्ती आहे. सध्या तुम्ही फक्त तुमच्या कामावर लक्ष केंद्रीत केलं पाहिजे. तुमचं पण नाव मोठं होईल. तू तुझ्या रागावर नियंत्रण ठेव. रागचं तुमच्यासाठी अडथळा आहे.'' अभिषेकनं प्रेमाबद्दल विचारले असता, ज्योतिषींनी त्याला करिअरवर लक्ष केंद्रत करण्याचा सल्ला दिला.

मुनावर फारुकी आणि मनारा चोप्राचं भविष्य : मुनावर यांनी स्वत:बद्दल भविष्य विचारण्यास नकार दिला. त्यानं म्हटलं, ''मला माझे भविष्य जाणून घेण्याची परवानगी नाही.'' मात्र, ज्योतिषानं सांगितलं की, ''सध्या तू वैयक्तिक वादात पडू नये. तुला लवकरच काहीतरी मोठे मिळणार आहे. जे आजपर्यंत कोणालाही मिळालेले नाही. तू आंतरराष्ट्रीय स्तरावर जाऊ शकतो.'' मनाराबद्दल सांगताना ज्योतिषीनं म्हटलं, ''तू स्वनिर्मित व्यक्ती आहे. तू स्वतःच सर्व काही करतो. तू स्वतः घरात आणि बाहेर संघर्ष केला आहे. तुम्ही शुद्ध आहात, तुम्ही तोंडावर बोलता.''

ईशा मालवीय आणि समर्थ जुरेल : ईशा आणि समर्थ यांच्याबाबतही भविष्यवाणी केली. या दोघांनाही करिअरवर लक्ष केंद्रित करण्यास सांगितले. ईशाबाबत ज्योतिषीनं म्हटलं की, पुढचा एक वर्ष तुझ्यासाठी महत्त्वाचं असेल. 2025 मध्ये तुमच्यासाठी एक मोठी संधी येईल. तुम्ही तुमच्या करिअरमध्ये खूप प्रगती कराल. या काळात वैयक्तिक निर्णयही घ्यावे लागतील.'' बीग बॉसचा हा एपिसोड खूप मनोरंजक होता.

हेही वाचा :

  1. नवीन वर्षात कोणत्या वेबसीरीज पाहाव्यात? 'या' कलाकारांचे सिनेमा झाले आहेत प्रदर्शित
  2. आयरा खानच्या वेडिंग रिसेप्शनला लावली हजेरी, शाहरुख खानसह 'या' सेलिब्रिटींनी लावली हजेरी
  3. प्रवाशांसह मुंबई विमानतळावर एरोब्रिजमध्ये तासंतास अडकली राधिका आपटे, वाचा काय घडलं

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.