ETV Bharat / entertainment

Thank You For Coming Movie : भूमी पेडणेकर आणि शहनाज गिल स्टारर 'थँक यू फॉर कमिंग'चे पोस्टर प्रदर्शित... - थँक यू फॉर कमिंग पोस्टर रिलीज

भूमि पेडणेकर -शहनाज गिल स्टारर 'थँक यू फॉर कमिंग'चे पोस्टर प्रदर्शित झाले आहे. या चित्रपटाचे पोस्टर खूप हॉट असल्याने पोस्टरवर यूजर खूप कमेंट करत आहेत.

Thank You For Coming Movie
थँक यू फॉर कमिंग चित्रपट
author img

By

Published : Aug 10, 2023, 3:53 PM IST

मुंबई : एकता कपूरने आगामी चित्रपट 'थँक यू फॉर कमिंग'ची घोषणा केली आहे. याशिवाय एकताने या चित्रपटाचे एक पोस्टरही सोशल मीडियावर शेअर केले. चित्रपटाच्या या पोस्टरमध्ये अभिनेत्री स्वत:चा टी-शर्ट काढताना दिसत आहे. ही अभिनेत्री कोण आहे, याचा खुलासा आतापर्यत झालेला नाही. या चित्रपटाचे पोस्टर शेअर करून एकताने आता स्टारकास्टचा खुलासा केला आहे. 'थँक यू फॉर कमिंग' या चित्रपटात भूमी पेडणेकर, शहनाज गिल, डॉली सिंग, कुशा कपिला, शिबानी बेदी असे कलाकार एकत्र झळकणार आहे. 'थँक यू फॉर कमिंग' चित्रपटाचे निर्माते एकता कपूर आणि करण बलुनी आहेत.

'थँक्स फॉर कमिंग'चे पोस्टर प्रदर्शित : दरम्यान या चित्रपटाची निर्मिती अनिल कपूरचे प्रोडक्शन हाऊस अनिल कपूर फिल्म अँड कम्युनिकेशन नेटवर्क करत आहे. करण बलुनी या चित्रपटाद्वारे दिग्दर्शनात पदार्पण करणार असल्याचे बोलले जात आहे. प्रदर्शित झालेल्या या पोस्टरवर खूप कमेंट्स येत आहे. आता या चित्रपटाच्या पोस्टरमध्ये आहे तरी कोण हे जाणून घेण्यासाठी चाहते, या चित्रपटाच्या निर्मात्यांना काही प्रश्न विचारत आहे. या चित्रपटाच्या पोस्टरमध्ये शहनाज आहे की भूमी पेडणेकर यामध्ये सध्या कन्फ्यूजन आहे. दरम्यान बरेच वापरकर्ते या फोटोवर अश्लील कमेंट्स देखील करत आहेत. आता या चित्रपटाबाबत प्रेक्षक खूप आतुर आहेत.

भूमी पेडणेकर आणि शहनाज गिलचे वर्कफ्रंट : भूमी पेडणेकरच्या कामाबद्दल बोलायचे झाले तर ती, नुकतीच नवाजुद्दीन सिद्दीकीसोबत सुधीर मिश्रा यांच्या 'अफवाह' चित्रपटात दिसली होती. पुढे ती 'तख्त' आणि 'भक्षक' चित्रपटामध्ये दिसणार आहे. दरम्यान शहनाज गिलच्या कामाबद्दल बोलायचे झाले तर शेवटी ती 'किसी का भाई किसी की जान' चित्रपटामध्ये सलमान खानसोबत झळकली होती. या चित्रपटामध्ये तिच्यासोबत पलक तिवारी, राघव जुयाल, पुजा हेगडे देखील होते. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर फ्लॉप झाला होता. शहनाज हा चित्रपट फ्लॉप झाल्यानंतर ती कुठल्याच चित्रपटामध्ये झळकली नाही.

हेही वाचा :

  1. Gadar 2 Low Budget Movie : 'गदर २' चित्रपटासाठी सनी देओलने घेतली कमी फी ; अनिल शर्माने केला खुलासा...
  2. Seema And Sachin Love Story : 'कराची टू नोएडा' चित्रपटाची घोषणा, सीमा हैदर आणि सचिनची प्रेमकथा येणार पडद्यावर
  3. Rajinikanth's Jailer Releases today : 'जेलर' जगभरात ४००० स्क्रीन्सवर रिलीज, जपानी जोडपे चित्रपट पाहण्यासाठी चेन्नईत दाखल

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.