ETV Bharat / entertainment

trailer of Chhatrapati : छत्रपती चित्रपटाचा ट्रेलर रिलीज, बेल्लमकोंडा श्रीनिवासची धमाकेदार बॉलिवूड एन्ट्री - साऊथ इंडियन मालमसाला असलेला ट्रेलर

साऊथ स्टार बेल्लमकोंडा श्रीनिवासची धमाकेदार बॉलिवूड एन्ट्री असलेला छत्रपती चित्रपटाचा ट्रेलर रिलीज करण्यात आला आहे. धमाकेदार अ‍ॅक्शन असलेल्या या चित्रपटात अभिनेत्री नुसरत भरुचासह भाग्यश्री, शरद केळकर, करण सिंग छाबरा यांच्याही भूमिका आहेत.

बेल्लमकोंडा श्रीनिवासची धमाकेदार बॉलिवूड एन्ट्री

author img

By

Published : May 2, 2023, 5:41 PM IST

हैदराबाद - बेल्लमकोंडा श्रीनिवास आणि नुसरत भरुचा प्रमुख भूमिका असलेल्या 'छत्रपती' या चित्रपटाचा ट्रेलर आज रिलीज झाला आहे. चित्रपटाचे दिग्दर्शन व्ही.व्ही. विनायक यांनी केले आहे. बेल्लमकोंडा आणि नुसरतशिवाय या चित्रपटात भाग्यश्री, शरद केळकर, करण सिंग छाबरा यांच्याही भूमिका आहेत. हा चित्रपट 12 मे 2023 रोजी रिलीज होणार आहे.

छत्रपती ट्रेलर रिलीज - 'छत्रपती'चा हिंदी रिमेक गेल्या काही काळापासून सतत चर्चेत आहे. निर्मात्यांनी मंगळवारी 'छत्रपती'च्या हिंदी रिमेकचा ट्रेलर रिलीज केला. साऊथ फिल्म इंडस्ट्रीतील प्रसिद्ध अभिनेता बेल्लमकोंडा साई श्रीनवास या चित्रपटाद्वारे बॉलिवूडमध्ये पाऊल ठेवणार आहे.

  • " class="align-text-top noRightClick twitterSection" data="">

साऊथ इंडियन मालमसाला असलेला ट्रेलर - छत्रपतीचा ट्रेलर हा टिपीकल साऊथ इंडिया चित्रपटाचा मालमसाला भरपूर वापरलेला अ‍ॅक्शन चित्रपट आहे. साऊथ स्टार बेल्लमकोंडा साई श्रीनवास याचे पदार्पण या चित्रपटातून होणार असल्यामुळे निर्मात्यांना मोठ्या अपेक्षा आहेत. मात्र ट्रेलर पाहता कथानका फार वेगळे काही असेल असे सध्यातरी दिसत नाही. अभिनेत्री नुसरत भरुचा तिच्या लौकिकाला शोभेल अशीच ट्रेलरमध्ये दिसत आहे. तिच्या वाट्याला एक ग्लॅमरस भूमिका आली असून यात ती कमाल दाखवताना दिसत आहे.

चित्रपटाचे शीर्षक - शरद केळकरचा धमाका अ‍ॅक्शन आपण यापूर्वी अनेकदा पाहिली आहे. त्यामुळे यात तो काही वेगळे करताना दिसत नाही. राहता राहिले चित्रपटाचे शीर्षक, तर एका डायलॉगमध्ये आपण ऐकतो की, जो स्वतःचा स्वार्थ न पाहता दुसऱ्यासाठी जगतो त्याला छत्रपती म्हणतात. या संवादातून आपण इतकेच समजून घेऊ शकतो की चित्रपटात लढताना दिसणारा बेल्लमकोंडा साई श्रीनवास या शीर्षकाला शोभावे असे काम करत असावा. कथानकात असेही दिसते की नायक आपल्या आईचा शोध घेत आहे आणि यासाठी तो अनेकांना बडवत आहे. अखेरीस त्याची अखेरच्या सीनमध्ये प्रकट होते आणि तिच्या हातातील पिस्तुलाने ती चक्क मुलावरच गोळी झाडते. आता तिने ही गोळी का झाडली याची कथा छत्रपतीत दिसणार आहे. तर असा हा ट्रेलर पाहून काहीजणांना उत्सुकता वाढली असेल तर निर्मात्याचा त्यात फायदाच आहे.

छत्रपती या तेलुगु चित्रपटाचा हिंदी रिमेक असलेला छत्रपती हा चित्रपट येत्या १२ म पासून देशभर रिलीज होणार आहे.

हेही वाचा - Met Gala 2023 : मेटॅलिक गाऊनमध्ये नताशा पूनावालाचा लूक; शेअर केली लूकची झलक

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.