मुंबई : आयुष्मान खुराना आणि अनन्या पांडे-स्टार कॉमेडी 'ड्रीम गर्ल 2'ला बॉक्स ऑफिसवर जबरदस्त प्रतिसाद मिळत आहे. पहिल्या रविवारी या चित्रपटाने भारतीय बॉक्स ऑफिसवर 40 कोटींचा आकडा पार केला. आयुष्मान खुरानाच्या 'ड्रीम गर्ल 2'ने पहिल्या दिवशी 10.69 कोटी रुपये आणि पहिल्या शनिवारी 14.02 कोटी रुपये आणि पहिल्या रविवारी सुमारे 16 कोटी रुपयांचा व्यवसाय केला. यासह या चित्रपटाचे एकूण कलेक्शन 40.71 पोहचले आहे. चित्रपटाच्या आगाऊ बुकिंगच्या तिसऱ्या दिवशी सुमारे 1.50 लाख तिकिटे विकली गेली. हा चित्रपट 30 ऑगस्ट रोजी होणाऱ्या रक्षाबंधनाच्या सुट्टीमुळे जास्त कमाई करू शकतो, असा अंदाज व्यक्त केला जात आहे.
'ड्रीम गर्ल 2'ची जादू : 'ड्रीम गर्ल 2' चित्रपटात आयुष्मान खुराना व्यतिरिक्त अनन्या पांडे, अन्नू कपूर, परेश रावल, विजय राज, राजपाल यादव, असरानी, सीमा पाहवा, मनोज जोशी, मनजोत सिंग, अभिषेक बॅनर्जी आणि रंजन राज यांनी महत्त्वाची भूमिका बजावली आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन राज शांडिल्य यांनी केले आहे. 'ड्रीम गर्ल 2' चे तीन दिवसांचे कलेक्शन छान झाले आहे. आयुष्मानला बऱ्याच दिवसांनी बॉक्स ऑफिसवर चांगले यश मिळत आहे. हा चित्रपट आता लवकरच 50 कोटींचा टप्पा पार करण्याच्या दिशेने वाटचाल करत आहे. 'ड्रीम गर्ल 2' चित्रपट सोमवारी आणि मंगळवारपर्यंत 50 कोटाचा टप्पा पार करेल असे सध्या दिसत आहे.
'ड्रीम गर्ल 2' चे कलेक्शन
पहिल्या दिवस 10.69 कोटी
दुसरा दिवस 14.02 कोटी
तिसरा दिवस 16 कोटी
'ड्रीम गर्ल 2'चे एकूण कलेक्शन 40.71
ड्रीम गर्ल'चा सीक्वल : प्रेक्षकांना हा चित्रपट खूप आवडला असून या चित्रपटाला समीक्षकांकडूनही भरभरून दाद मिळत आहे. 'ड्रीम गर्ल 2' हा आयुष्मानच्या 2019 मध्ये रिलीज झालेल्या 'ड्रीम गर्ल'चा सीक्वल आहे. हा चित्रपट बालाजी मोशन पिक्चर्स अंतर्गत एकता कपूर आणि शोभा कपूर निर्मित आहे. 'ड्रीम गर्ल 2' मध्ये आयुष्मान खुराना पुन्हा एकदा पूजाच्या भूमिकेत आहे. पहिल्या भागाप्रमाणेच या चित्रपटालाही प्रेक्षक भरभरून प्रेम देत आहे. हा चित्रपट पाहण्यासाठी अनेक प्रेक्षक चित्रपटगृहात पोहोचत आहेत.
हेही वाचा :
- Gadar २ vs OMG २ box office collection day १७ : 'गदर 2' बाहुबलीचा रेकॉर्ड मोडणार? जाणून घ्या कमाईची आकडेवारी
- Actor Shahrukh Khan : 'गॅम्बलिंग अॅप्सचा प्रचार बंद करा', शाहरुख खानच्या बंगल्याबाहेर निदर्शने, आंदोलकांना पोलिसांनी घेतले ताब्यात
- Yash And Radhika pandit : साऊथ स्टार यशची पत्नी राधिका पंडितने मुलांसह 'वरमहालक्ष्मी'चा उत्सव केला साजरा....