ETV Bharat / entertainment

Brahmastra part 2 dev : अयान मुखर्जी लवकरच घेऊन येणार 'ब्रह्मास्त्र पार्ट 2 - देव'; सोशल मीडियावर पोस्ट केली शेअर... - Ayan Mukerji

Brahmastra part 2 dev : अयान मुखर्जीच्या 'ब्रह्मास्त्र पार्ट 1 - शिवा' या चित्रपटाला आज एक वर्ष पूर्ण झालं आहे. या खास प्रसंगी दिग्दर्शक अयाननं एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये त्यानं 'ब्रह्मास्त्र पार्ट 2 - देव'बद्दल एक मोठे अपडेट दिली आहे.

Brahmastra part 2 dev
ब्रह्मास्त्र पार्ट 2 देव
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Sep 9, 2023, 4:09 PM IST

मुंबई - Brahmastra part 2 dev: अयान मुखर्जीनं शनिवारी रणबीर कपूर आणि आलिया भट्ट अभिनीत त्याच्या 2022 च्या ब्लॉकबस्टर 'ब्रह्मास्त्र'चा पहिला वर्धापन दिन साजरा केला आहे. ९ सप्टेंबर रोजी या चित्रपटाला एक वर्ष पूर्ण झाला. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर सुपरहिट ठरला होता. 'ब्रह्मास्त्र'ला एक वर्ष पूर्ण झाल्याबद्दल आनंद व्यक्त करत दिग्दर्शक अयान मुखर्जीनं सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली. या पोस्टमध्ये अयाननं लिहिलं, 'पहिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा, ब्रह्मास्त्र. पुढं त्यानं लिहिलं, 'मी लवकरच ब्रह्मास्त्र यात्रेच्या पुढील भागाच्या काही गोष्टी शेअर करीन. याशिवाय त्यानं चित्रपटाशी संबंधित कलाकृतीचा व्हिडिओ देखील शेअर केला आहे.

अयान मुखर्जी लवकरच ' 'ब्रह्मास्त्र' पार्ट 2' घेऊन येणार : अयान मुखर्जीनं 2026 आणि 2027 मध्ये प्रदर्शित होणार्‍या दोन भागाची आधीच घोषणा केली आहे. 'ब्रह्मास्त्र पार्ट 1 - शिवा' चित्रपटामध्ये आलिया भट्ट आणि रणबीर कपूर व्यतिरिक्त अमिताभ बच्चन आणि मौनी रॉय हे देखील कलाकार मुख्य भूमिकेत होते. करण जोहरच्या धर्मा प्रॉडक्शनद्वारे निर्मित, शाहरुख खान आणि नागार्जुन यांच्या विशेष उपस्थितीसह, जगभरातील बॉक्स ऑफिसवर 400 कोटींहून अधिक कमाई करणारा हा चित्रपट, कोविड-19 महामारीच्या काळात हिंदी चित्रपट उद्योगासाठी मोठ्या व्यावसायिक यशांपैकी एक होता. 'ब्रह्मास्त्र पार्ट 1' प्रेक्षकांना खूप आवडला होता. आता अयान लवकरच 'ब्रह्मास्त्र पार्ट 2' येऊन येणार आहे. चाहते 'ब्रह्मास्त्र पार्ट 2' ची मागणी सातत्याने करत होते.

अयानच्या पोस्टवर येत आहे कमेंट : अयानच्या या पोस्टवर कमेंट करताना एका यूजरने लिहिले की, 'फ्रेंचायझीच्या पुढील दोन भागासाठी आतुरतेने वाट पाहत आहे'. अयानला शुभेच्छा करताना दुसऱ्यानं लिहिलं, 'अभिनंदन अयान मुखर्जी'. आणखी एका युजरनं लिहिलं 'दुसरा भाग हा खूप विशेष असेल'. अशा अनेक कमेंट या पोस्टवर येत आहेत. अयान हा यशराज फिल्म्ससाठी हृतिक रोशन आणि ज्युनियर एनटीआर अभिनीत 'वॉर 2'चे दिग्दर्शन केल्यानंतर तो ब्रह्मास्त्र फ्रँचायझीमध्ये परतणार आहेत. 'ब्रह्मास्त्र पार्ट 2'साठी प्रेक्षक खूप आतुर आहेत. पहिल्या 'ब्रह्मास्त्र पार्ट 1' प्रमाणेच 'ब्रह्मास्त्र पार्ट 2'मध्ये प्रेक्षकांना अ‍ॅक्शन पाहायला मिळणार आहे.

हेही वाचा :

  1. Shahrukh Khan And Anand Mahindra : नैसर्गिक संसाधन घोषित केल्याबद्दल शाहरुख खानने उद्योगपती आनंद महिंद्रा यांचे मानले आभार...
  2. Jawan Box Office Collection Day 3 : शाहरुख खानचा 'जवान' चित्रपट तिन दिवसात बॉक्स ऑफिसवर छापणार 200 कोटी...
  3. Akshay Kumar Birthday: वाढदिवसानिमित्त बॉलीवूड स्टार अक्षय कुमारनं लावली महाकालेश्वर मंदिरात हजेरी....

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.