मुंबई - Asin Share pics and video : गजनी' फेम अभिनेत्री असिन ही पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. तिनं इंस्टाग्रामवर एक वर्षानंतर पोस्ट शेअर केली आहे. असिननं पॅरिसमध्ये मुलगी अरिनचा सहावा वाढदिवस साजरा केला आहे. तिनं वाढदिवसाचे काही खास फोटो आणि व्हिडिओ इंस्टाग्राम शेअर केले आहेत. या पोस्टमध्ये तिनं लिहलं की, ती पती राहुल शर्मा अरिनला सहावा वाढदिवस साजरा करण्यासाठी पॅरिसला घेऊन गेले होते. असिनची मुलगी, अरिन 24 ऑक्टोबर रोजी सहा वर्षांची झाली आहे. असिन ही क्वचितच इन्स्टाग्रामवर पोस्ट करत असते.
असिन शेअर केला फोटो : शेअर केलेल्या फोटोमध्ये तिनं कॅप्शनमध्ये लिहलं, राजकुमारी अरिन वाढदिवसाच्या शुभेच्छा. त्यानंतर दुसऱ्या पोस्टमध्ये तिनं कॅप्शनमध्ये लिहलं, '6व्या वाढदिवसाच्या शुभेच्छा, प्रिय अरिन! तू तुझ्या अविश्वसनीय आईप्रमाणेच एक अद्भुत, दयाळू आत्मा आहेस. आयुष्याच्या या नवीन वर्षाची सुरुवात करताना, जगातील प्रत्येक टप्प्यावर तुला यश मिळो हीच माझी इच्छा आहे. तुमच्या मार्गात येणाऱ्या कोणत्याही आव्हानांना तोंड देण्याचे धैर्य देव तुला देवो. मी तुझ्या प्रत्येक उल्लेखनीय पावलाची साक्षीदार आहे. माझ्या मनाच्या तळापासून, मी तुला आयुष्यातील सर्व यश आणि आनंदासाठी शुभेच्छा देते'. तिच्या या पोस्टवर अनेकजण अरिनला वाढदिवसाच्या शुभेच्छा देत आहेl.
मुलगी अरिनला दिल्या आसिननं शुभेच्छा : असिननं तिच्या इन्स्टाग्राम स्टोरीवर दोन फोटो शेअर केले आहेत, यामध्ये अरिन वाढदिवस साजरा करताना दिसत आहे. असिनचा पती राहुल शर्मा एका कौटुंबिक मित्रासोबत या फोटोमध्ये दिसत आहे. याशिवाय असिननं एक व्हिडिओ इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये तिची मुलगी अरिन ही वडील राहुलच्या मिठीत आहे आणि ती आयफेल टॉवर उजळताना पाहत आहे. या व्हिडिओमध्ये हे जोडपे आपल्या मुलीला वाढदिवसाच्या शुभेच्छा देत आहे. असिननं 2016 मध्ये मायक्रोमॅक्सचे सह-संस्थापक राहुल शर्माशी लग्न केले. त्यानंतर तिनं अभिनय सोडला. ती शेवटची 2015 च्या कॉमेडी 'ऑल इज वेल' मध्ये दिसली होती, ज्यात तिच्यासोबत अभिषेक बच्चन, ऋषी कपूर आणि सुप्रिया पाठक हे कलाकार होते. ती 'बोल बच्चन', 'रेडी' आणि इतर अनेक चित्रपटांचा भाग आहे.
हेही वाचा :
- Battalion 50 : 'बटालियन 50'मधून दिसणार सीमेवरील शूरवीरांची गाथा; लवकरच मोठ्या पडद्यावर होणार प्रदर्शित....
- Junaid Khans Debut Film Shoot Wrapped : आमिरचा मुलगा जुनैद खानच्या पहिल्या चित्रपटाचं शुटिंग पूर्ण, शालिनी पांडेनं सांगितला सेटवरील अनुभव
- Ranbir Kapoor break from films : आयुष्यातल्या सर्वात महत्त्वाच्या व्यक्तीसाठी रणबीर कपूर घेतोय सहा महिन्यांचा ब्रेक