मुंबई - सिद्धार्थ मल्होत्रा ( Sidharth Malhotra ) आणि कियारा अडवाणी ( Kiara Advani ) यांची भूमिका असलेल्या शेरशाह ( Shershaah ) चित्रपटाला शुक्रवारी १ वर्ष पूर्ण झाले. या प्रसंगी, कियाराने तिच्या सोशल मीडिया हँडलवर एक अनाकलनीय पोस्ट शेअर केली आणि तिच्या कथित प्रियकराला टॅग केले आणि त्याच्यावर 'आऊट ऑफ साईट, ऑफ माइंड' प्रकार असल्याचा आरोप केला.
सोशल मीडियावर कियाराची नवीन पोस्ट अभिनेत्रीने शेअर केल्यानंतर काही मिनिटांतच व्हायरल झाली आहे. इंस्टाग्राम स्टोरीजवरील तिच्या छोट्या पण वेधक कमेंटने चाहत्यांना आश्चर्य वाटले आहे की या जोडप्यामध्ये सर्व काही ठीक आहे की नाही. एका क्रिप्टिक नोटमध्ये कियाराने लिहिले आहे की, "सिद्धार्थ मल्होत्रा तू बातें तो बडी बडी करता था, लेकीन तू भी 'आऊट ऑफ साईट, ऑफ माइंड' टाइप का बंदा निकला."
तिच्या या शब्दप्रयोगाने चाहत्यांना संभ्रमात टाकले आहे की हा पब्लिसिटी स्टंट आहे की कियारा तिच्या नात्याला राम राम ठोकत असल्याचे संकेत देत आहे. तिच्या स्टोरीला सिद्धार्थने उत्तर दिल्यानंतर चाहत्यांनी सुटकेचा नि:श्वास सोडला. सिध्दार्थने लिहिले, "ओये सरदारनी, मुझे ना सब याद है, भूल ही नई सकता. आज 6 बाजे मिलने आजाऊंगा."
गेल्या वर्षी डिजीटल रिलीझ झाल्यावर चित्रपटाला मिळालेल्या प्रचंड यशाचा आनंद साजरा करताना, कियाराने लिहिले, "एक चित्रपट, एक वर्ष, प्रचंड प्रेम! जगभरातील भावनांना उधाण आणणारी, हृदये आणि पुरस्कार जिंकणारी आणि आयुष्यभराचा प्रभाव सोडणारी कथा. #1YearOfShershaah, "ये दिल मांगे मोर!"🇮🇳."
विष्णुवर्धन दिग्दर्शित शेरशाह हा परमवीर चक्र पुरस्कार विजेते विक्रम बत्रा यांच्या जीवनावर आधारित चित्रपट आहे, ज्यांनी 1999 मध्ये कारगिल युद्धादरम्यान पाकिस्तानी घुसखोरांकडून भारतीय भूभाग परत मिळवताना देशाच्या सेवेत आपले प्राण अर्पण केले होते. हा चित्रपट ओटीटीवर प्रदर्शित झाला होता. अॅमेझॉन प्राइम व्हिडिओवर सर्वांनी या चित्रपटाचे स्वागत केले. सिद्धार्थ-कियाराची केमिस्ट्री असो किंवा गाणी, शेरशाह अनेक कारणांमुळे हिट ठरला.