मुंबई : बुधवार २ ऑगस्ट या दिवसाची सुरुवात नितीन देसाईंच्या निधनाच्या धक्कादायक बातमीने झाले. त्यांनी उभा केलेल्या भव्य स्टुडिओच्या परिसारातच त्यांनी आपले जीवन संपवले. नितीन देसाई यांच्या मृत्यूची बातमी समोर येताच सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला आहे. यामुळे सिनेविश्वात शांतता पसरली आहे. दिग्दर्शक आणि कला दिग्दर्शक म्हणून त्यांनी फिल्म इंडस्ट्रीत २० वर्षे घालवली. विधू विनोद चोप्रा, राजकुमार इराणी, संजय लीला भन्साळी ते आशुतोष गोवारीकर यांच्यासोबत काम केले आहे. नितीन देसाई हे अभिनेता आणि दिग्दर्शकही होते.
नितीन देसाई यांच्या निधनाने अनेक स्टार्सना धक्का बसला : नितीन देसाई यांच्या निधनाने चाहते आणि सेलिब्रिटींना मोठा धक्का बसला आहे. सर्वजण ओल्या डोळ्यांनी त्यांची आठवण काढत आहेत. नितीन यांच्या मृत्यूने आशुतोष गोवारीकर यांनाही धक्का बसला आहे. नितीन यांच्या निधनावर शोक व्यक्त करताना त्यांनी लिहिले, मला धक्का बसला आहे, माझ्याकडे शब्द नाहीत. मी एनडी स्टुडिओत जात आहे.
परिणीती चोप्राचे सोशल मीडियावर केले दु;ख व्यक्त : परिणीती चोप्रानेही नितीन देसाई यांच्या निधनावर शोक व्यक्त केला आहे. तिने पोस्टमध्ये लिहिले, नितीन सरांबद्दल ऐकून मन दुःखी झाले. त्यांचे अखंड काम आणि कला सदैव स्मरणात राहील.
रितेश देशमुख केले दु;ख व्यक्त : नितीन यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त करताना रितेश देशमुखने लिहिले, भारतीय चित्रपटसृष्टीच्या विकासात मोलाचे योगदान देणारे महान प्रोडक्शन डिझायनर नितीन देसाई आता राहिले नाहीत हे जाणून खूप धक्का बसला. त्यांच्या कुटुंबियांना आणि प्रियजनांप्रती माझ्या हार्दिक संवेदना.
हेमा मालिनी केले दु;ख व्यक्त : नितीन देसाई यांच्या निधनाने हेमा मालिनी यांनाही मोठा धक्का बसला आहे. त्यांनी लिहिले - आज सकाळी धक्कादायक बातमी मिळाली की कला दिग्दर्शक नितीन देसाई राहिले नाहीत. तो एक चांगला माणूस होता. माझ्या अनेक प्रोजेक्ट्सशी त्यांचा संबंध होता. त्यांच्या जाण्याने चित्रपटसृष्टीचे मोठे नुकसान झाले आहे.
नितीन देसाई यांची शेवटची पोस्ट : नितीन देसाई हे सोशल मीडियावर फार कमी सक्रिय असायचे. त्याची शेवटची इंस्टाग्राम पोस्ट १६ जुलैची आहे. त्यांनी '१९४२: अ लव्ह स्टोरी' या चित्रपटाचे पोस्टर शेअर केले आहे. यामध्ये चित्रपटात अनिल कपूर आणि मनीषा कोईराला हे कलाकार होते. १९९४ मध्ये आलेला हा चित्रपट सुपरहिट ठरला होता. याचे दिग्दर्शन विधू विनोद चोप्रा यांनी केले होते. या चित्रपटाला २९ वर्षे पूर्ण झाल्याबद्दल नितीन यांनी ही पोस्ट केली होती.
हेही वाचा :