ETV Bharat / entertainment

AR Ameen son Accident : झुंबरसह संपूर्ण ट्रस कोसळला, एआर रहमानचा मुलगा एआर अमीन थोडक्यात बचावला

संगीतकार एआर रहमान यांचा मुलगा एआर अमीन एका मोठ्या अपघातातून थोडक्यात वाचला आहे. गाण्याचे शुटिंग सुरू असताना सेटवर अडकवलेला ट्रस झुंबरसह स्टेजवर कोसळला. गायक अमिन सेंटरला उभा असल्यामुळे बचावला असला तरी हा त्यासह रहमान कुटुंबासाठी मोठा धक्का बसला आहे.

एआर रहमानचा मुलगा एआर अमीन थोडक्यात बचावला

author img

By

Published : Mar 6, 2023, 10:19 AM IST

मुंबई - संगीतकार एआर रहमान यांचा मुलगा एआर अमीन नुकताच सेटवर एका गाण्यासाठी शूटिंग करत असताना झालेल्या धक्कादायक अपघातातून बचावला. रविवारी, एका लांबलचक इंस्टाग्राम कॅप्शनमध्ये, त्याने अत्यंत वेदनादायक खुलासा केला की, गाण्याच्या चित्रीकरणादरम्यान, सेटवरील क्रेनला लटकवलेले झुंबर जमिनीवर कोसळले आणि जवळजवळ त्याचा चुराडा झाला. अमीनला कोणतीही दुखापत झाली नसली तरी, तो म्हणाला की त्याला या घटनेमुळे धक्का बसला आहे.

'माझे पालक, कुटुंब, हितचिंतक, माझे आध्यात्मिक गुरू आणि सर्वशक्तीमान यांचे आभार मानतो की मी आज सुरक्षित आणि जिवंत आहे. फक्त तीन रात्रींपूर्वी, मी एका गाण्यासाठी शूटिंग करत होतो आणि मी अभियांत्रिकी आणि सुरक्षेची काळजी याबाबतीत माय क्यूकीच्या टीमवर विश्वास ठेवला. मी कॅमेऱ्यासमोर परफॉर्म करण्यावर लक्ष केंद्रित करत होतो. एका क्रेनला लटकलेले संपूर्ण ट्रस आणि झुंबर मी जागेच्या अगदी मध्यभागी असताना खाली कोसळले. ते काही सेकंद आधी किंवा नंतर, काही इंच इकडे-तिकडे पडले असते तर संपूर्ण रिग आमच्या डोक्यावर पडली असती. माझी टीम आणि मी शॉक-शॉक झालो आहोत आणि आघातातून सावरू शकलेलो नाही', असे एआर अमीनने शेअर केले. त्याने खराब झालेल्या स्टेजचे काही फोटोही शेअर केले आहेत.

आम्ही सर्वच हादरलो आहोत आता रहमानने एक निवेदन जारी करून भारतीय चित्रपट उद्योगाला सेट आणि लोकेशन्सवर उत्तम सुरक्षा मानके सुलभ करण्याचे आवाहन केले आहे. त्यांनी लिहिलंय, 'काही दिवसांपूर्वी माझा मुलगा एआर अमीन आणि त्याची स्टाइलिंग टीम संभाव्य घातक आपत्तीतून बचावली होती. चमत्कारिकपणे सर्वशक्तीमानाच्या कृपेने फिल्मसिटी, मुंबई येथे अपघातानंतर कोणतीही दुखापत झाली नाही. आम्ही आमचा उद्योग वाढवत असताना, भारतीय सेट्स आणि लोकेशन्सवर जागतिक दर्जाच्या सुरक्षिततेच्या निकषांच्या दिशेने एक हालचाल करणे आवश्यक आहे. आम्ही सर्वच हादरलो आहोत आणि विमा कंपनीच्या व तसेच गुडफेलास स्टुडिओची निर्मिती कंपनीच्या घटनेच्या तपासाच्या निकालाची वाट पाहत आहोत.'

रहमान कुटुंबीयांना धक्का बसला घटनेचा धक्का रहमान कुटुंबीयांना बसला आहे. याबाबत रमीनची बहीण खतिजा रहमानने लिहिले, हार्ट ब्रेकिंग अमीन. 'हे कसे वाटले असेल याची मी कल्पना करू शकत नाही. आमच्या प्रार्थना आणि प्रेम नेहमीच तुझ्यासोबत आहेत. काळजी घे. अमीनने पार्श्वगायक म्हणून 2015 मध्ये आलेल्या ओ कादल कानमानी या तमिळ चित्रपटाद्वारे पदार्पण केले. त्यानंतर त्यांनी विविध भाषांमध्ये गाणी गायली आहेत, त्यातील नवीनत गाणी म्हणजे 'सूरवल्ली पोन्नू' हे आहे. विशेष म्हणजे त्याने सचिन तेंडूलकरवर बनलेल्या बायोपिकसाठी मर्द मराठा हे गाणे गायले होते.

हेही वाचा - Javed Akhtar Defamation Case : जावेद अख्तर कंगना राणावत वादावर 23 मार्चला उच्च न्यायालयात सुनावणी

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.