कान्स (फ्रान्स) - चित्रपट निर्माता दिग्दर्शक अनुराग कश्यप यांचा सनी लिओन आणि राहुल भट यांच्या मुख्य भूमिका असलेला केनेडी हा चित्रपट सध्या सुरू असलेल्या कान्स चित्रपट महोत्सवात प्रदर्शित करण्यात आला. कान्स फिल्म फेस्टिव्हल 2023 मध्ये मध्यरात्रीच्या स्क्रिनिंग दरम्यान केनेडीचे प्रदर्शन पार पडले. त्यानंतर प्रेक्षकांच्या टाळ्यांच्या कडकडाटात 7 मिनिटांचे स्टँडिंग ओव्हेशन मिळाले. यानंतर दिग्दर्शक अनुराग कश्यपने चित्रपटातील स्टार्स सनी लिओन आणि राहुल भट यांच्यासोबत रेड कार्पेटवर वॉक केला. इंस्टाग्राम स्टोरीवर निर्माता रंजन सिंग यांनी केनेडी स्क्रीनिंगची एक झलक शेअर केली.
स्क्रिनिंगच्या आधी, रंजनने अनुराग, राहुल भट, निर्माता कबीर आहुजा आणि दिग्दर्शक विक्रमादित्य मोटवाने यांचा समावेश असलेला एक फोटो शेअर केला. त्याने पोस्टला कॅप्शन दिले, 'आणि आम्ही तयार आहोत! केनेडी प्रीमियर्सचा कान्स फिल्म फेस्टीव्हलमधील आयुष्यभराचा क्षण!' लाल मखमली पोशाखात रेड कार्पेटवर पदार्पण केल्यानंतर, दुसऱ्या लूकसाठी सनी लिओनीने तिच्या केनेडी चित्रपटाच्या प्रीमियर दरम्यान गुलाबी रंगाचा सॅटीन गाउन निवडला. सनीने इंस्टाग्रामवर तिच्या गाऊनमधील आणि केनेडी टीमसोबतचे फोटो शेअर केले.
प्रीमियरसाठी सनीने वन-शोल्डर हाय-स्लिट गुलाबी गाऊन परिधान केला होता. ग्लॅमसाठी, तिने तिचे केस स्लीक बनमध्ये बांधले आणि हिऱ्याचे झुमके आणि सुशोभित हिल्सची निवड केली. सनीने अनुराग कश्यप आणि तिचा को-स्टार राहुल भटसोबत पोज दिली. फोटो शेअर करताना तिने लिहिले, 'माझ्या कारकिर्दीतील आतापर्यंतचा सर्वात अभिमानाचा क्षण! या क्षणासाठी अनुराग कश्यप धन्यवाद! आणि राहुल भट्ट, या अप्रतिम कामगिरीमध्ये मला तुमच्यासोबत स्क्रीन शेअर करू दिल्याबद्दल धन्यवाद! तुमच्या दोघांवर प्रेम आहे!'
सनीने तिच्या गाऊनमधील फोटोंची मालिका देखील काढली आणि त्याला कॅप्शन दिले, 'केनेडीचा जागतिक प्रीमियर आणि मला भारतीय चित्रपटाचे प्रतिनिधित्व करण्यात यापेक्षा जास्त अभिमान वाटू शकत नाही. माझ्यासाठी आणि संपूर्ण टीमसाठी हा ंस्मरणीय क्षण!' कश्यप दिग्दर्शित 'केनेडी' या चित्रपटात सनी लिओन, राहुल भट्ट आणि अभिलाष थापलियाल यांच्या प्रमुख भूमिका आहेत. हा चित्रपट एका निद्रानाश झालेल्या माजी पोलिसाभोवती फिरतो. त्याला दीर्घकाळ मृत समजले जाते, परंतु तरीही भ्रष्ट व्यवस्थेसाठी तो कार्यरत आहे, आणि मुक्ती शोधत आहे. या वर्षी महोत्सवात अधिकृत निवड झालेल्या भारतातील केवळ दोन चित्रपटांपैकी केनेडी चित्रपटाचा समावेश आहे.
हेही वाचा - Queen Of Rock N Roll : पॉप स्टार टीना टर्नर यांचे वयाच्या ८३ व्या वर्षी निधन