ETV Bharat / entertainment

Ankita lokhande and vicky jain : अंकिता लोखंडे आणि विक्की जैन 'बिग बॉस 17'मध्ये जाणार ? - श्रद्धा आर्या

Ankita lokhande and vicky jain : 'बिग बॉस 17' या शोबद्दल नवनवीन अपडेट्स रोजच येत असतात. दरम्यान 'बिग बॉस 17'मध्ये अंकिता लोखंडे पती विक्की जैनसोबत दिसेल, अशी सध्या चर्चा आहे.

Ankita lokhande and vicky jain
अंकिता लोखंडे आणि विक्की जैन
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Oct 9, 2023, 5:07 PM IST

Updated : Oct 9, 2023, 5:17 PM IST

मुंबई - Ankita lokhande and vicky jain : 'बिग बॉस 17' पाहण्यासाठी चाहते खूप आतुर आहेत. या शो संबंधित नवनवीन अपडेट्स रोज येत राहतात. आता या शोच्या काही स्पर्धकांबद्दल माहिती समोर आली आहे. याशिवाय यावेळी शोची थीम काय असेल हे देखील सांगितलं गेले आहे. काही दिवसांपूर्वी अंकिता लोखंडे पती विक्की जैनसोबत या शोमध्ये स्पर्धक म्हणून जाणार असल्याच्या बातम्या समोर येत होत्या. या शोसाठी ती जोरदार तयारी करत असल्याचं देखील समजलं होत. याआधीही अंकिताला अनेकदा शो ऑफर करण्यात आला होता, मात्र अंकितानं प्रत्येक वेळी नकार दिला होता. आता यावेळी ती खरंच या शोमध्ये भाग घेणार का? यावर नेमकी माहिती समोर आलेली नाही.

'बिग बॉस 17' : काही दिवसांपूर्वी बातमी आली होती की, अंकिताला शोमध्ये तिचा स्टायलिश अवतार दाखवायचा आहे. याशिवाय तिला तिचा एकही आउटफिट रिपीट करायचा नाही. त्यामुळे ती शोमध्ये 200 आउटफिट्स घेऊन जाणार आहे. ती एका दिवसात 3 पोशाख बदलेल. याशिवाय विक्की हा दिवसातून दोनदा आपला पोशाख बदलेल.. एका रिपोर्टनुसार, अंकिताला एका आठवड्यासाठी 10-15 लाख रुपये मानधन दिलं जाणार असल्याचं सांगितलं गेलं होतं. या सीझनमधील सर्वात महागड्या स्पर्धकांपैकी ती एक असेल, अशा बातम्यादेखील समोर आल्या होत्या. दरम्यान आता या संदर्भात कोणतीही पुष्टी झालेली नाही.

श्रद्धाचा अंकिताला मेसेज : श्रद्धा आर्याला नुकतंच स्पॉट करण्यात आलं होते आणि यावेळी तिला घरात जाण्यापूर्वी मैत्रिण अंकिताला काय संदेश द्यायचा आहे, असे विचारण्यात आलं तेव्हा ती म्हणाली, मी तिला शुभेच्छा देऊ इच्छिते आणि मला माहित आहे. ती स्वतःला चांगले हाताळेल, त्यामुळे अंकिता ही 'बिग बॉस 17'ची स्पर्धक असू शकते या चर्चा अधिक रंगायला लागली. अंकिता लोखंडे 'पवित्र रिश्ता'मधील अर्चनाची भूमिका साकारून घराघरात पोहोचली आहे. याशिवाय तिनं 'मणिकर्णिका: द क्वीन ऑफ झांसी' मधील झलकारी बाई भूमिका साकारली आहे. या चित्रपटामध्ये तिनं अफलातून अभिनय करून प्रेक्षकांची मन जिंकली. अंकिता जर 'बिग बॉस 17'मध्ये गेली तर ती एक मजबूत स्पर्धक ठरु शकते.

हेही वाचा :

  1. Ganapath Trailer out : टायगर श्रॉफ क्रिती सेनॉन स्टारर 'गणपथ'चा ट्रेलर प्रदर्शित, पहा हाय-ऑक्टेन अ‍ॅक्शन ड्रामा
  2. karan johar and kangana ranaut : करण जोहरच्या 'कॉफी विथ करण सीझन 8'मध्ये कंगना राणौत झळकेल...
  3. Akshay Kumar :ट्रोल झालेल्या अक्षय कुमारनं तोडला पान मसाला कंपनीचा करार

Last Updated : Oct 9, 2023, 5:17 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.