मुंबई - Animal Vs Sam Bahadur Advance Booking Collection : अभिनेता रणबीर कपूरची प्रमुख भूमिका असलेला 'अॅनिमल' आणि विकी कौशल यांचा चरित्रपट 'सॅम बहादूर' 1 डिसेंबर रोजी थिएटरमध्ये प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. दोन्ही चित्रपट एकाच दिवशी प्रदर्शित होणार असल्यानं चित्रपट रसिक अॅक्शन पॅक्ड मनोरंजनासाठी सज्ज झाले आहेत. विशेष म्हणजे अॅडव्हान्स बुकिंगच्या बाबतीत विकी कौशलच्या 'सॅम बहादूर' चित्रपटापेक्षा 'अॅनिमल'नं आघाडी घेतल्याचं सध्या चित्र आहे.
-
#Xclusiv… #Animal advance booking status at *national chains*… Note: [Friday] Day 1 tickets sold…
— taran adarsh (@taran_adarsh) November 27, 2023 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
⭐️ #PVRInox: 97,000
⭐️ #Cinepolis: 22,500
⭐️ Total: 1,19,500 tickets sold.
⭐️ #Miraj: 10,000+ / 3 pm
⭐️ #MovieMax: 4,100 / 3.15 pm#AnimalTheFilm pic.twitter.com/wQxVPd65qe
">#Xclusiv… #Animal advance booking status at *national chains*… Note: [Friday] Day 1 tickets sold…
— taran adarsh (@taran_adarsh) November 27, 2023
⭐️ #PVRInox: 97,000
⭐️ #Cinepolis: 22,500
⭐️ Total: 1,19,500 tickets sold.
⭐️ #Miraj: 10,000+ / 3 pm
⭐️ #MovieMax: 4,100 / 3.15 pm#AnimalTheFilm pic.twitter.com/wQxVPd65qe#Xclusiv… #Animal advance booking status at *national chains*… Note: [Friday] Day 1 tickets sold…
— taran adarsh (@taran_adarsh) November 27, 2023
⭐️ #PVRInox: 97,000
⭐️ #Cinepolis: 22,500
⭐️ Total: 1,19,500 tickets sold.
⭐️ #Miraj: 10,000+ / 3 pm
⭐️ #MovieMax: 4,100 / 3.15 pm#AnimalTheFilm pic.twitter.com/wQxVPd65qe
'अॅनिमल'नं आपल्या पहिल्या दिवसाच्या अॅडव्हान्स बुकिंगमध्ये बॉक्स ऑफिसवर आपली मोहोर उमटवली आहे. 'सॅम बहादूर'नं पहिल्या दिवशी माफक 1.24 कोटींची कमाई करण्यापर्यंत मजल मारलेली असताना 'अॅनिमल'नं 13.95 कोटी रुपयांची कमाई करुन मोठी आघाडी घेतली आहे. संदीप वंगा रेड्डी दिग्दर्शित 'अॅनिमल' चित्रपट हिंदी, तेलगू, तमिळ, कन्नड आणि मल्याळमसह अनेक भाषांमध्ये रिलीज होणार आहे.
- " class="align-text-top noRightClick twitterSection" data="">
सेन्सॉर बोर्डाकडून (CBFC) "A" प्रमाणपत्र मिळालं असतानाही 'अॅनिमल' चित्रपटाच्या आगाऊ बुकिंगला अभूतपूर्व प्रतिसाद मिळत आहे. केवळ रविवारी 3 डिसेंबर रोजी हिंदीमध्ये 4,01,118, तेलुगूमध्ये 99,917 आणि तमिळमध्ये 1,511 तिकिटे विकली गेली आहेत. मल्याळम आणि कन्नडसह सर्व भाषांमध्ये या चित्रपटाची तब्बल 5,04,078 तिकिटे बुक झाली आहेत.
- " class="align-text-top noRightClick twitterSection" data="">
मेघना गुलजार दिग्दर्शित 'सॅम बहादूर' हा चित्रपट भारताचे पहिले फील्ड मार्शल सॅम माणेकशॉ यांच्या जीवनावर आधारित चित्रपट आहे. 1971 च्या भारत-पाकिस्तान युद्ध आणि बांगलादेशच्या मुक्ती संघर्षाची कथा या चित्रपटात मांडण्यात आली आहे.
रिलीजपूर्वी पहिल्या दिवशी 'सॅम बहादूर' चित्रपटाची बॉक्स ऑफिसवर 38,556 पेक्षा जास्त तिकिटे आरक्षित झाली असून यातून 1.24 कोटी रुपये चित्रपटाच्या खात्यात जमा झाले आहेत. या चित्रपटात विकी कौशल शिवाय इतर कलाकारांमध्ये फातिमा सना शेख, सान्या मल्होत्रा, मोहम्मद झीशान अय्युब आणि नीरज काबी यांचा समावेश आहे.
'अॅनिमल'बद्दल सांगायचं तर रणबीर कपूर यामध्ये मुख्य भूमिका साकारतोय. त्याच्या व्यक्तिरेखेव्यतिरिक्त चित्रपटात अनिल कपूर, बॉबी देओल आणि रश्मिका मंदान्ना यांच्याही महत्त्वपूर्ण भूमिका आहेत. चित्रपटाची कथा वडील आणि मुलाच्या गुंतागुंतीच्या नात्याभोवती फिरते. रश्मिका मंदान्ना यात रणबीरच्या प्रेयसीची भूमिका साकारतेय. तर बॉबी देओलने चित्रपटाच्या मुख्य खलनायकाची भूमिका साकारली आहे.
हेही वाचा -
2. 'छपाक'च्या अपयशासाठी मेघना गुलजारनं दीपिका पदुकोणला धरलं जबाबदार
3. आलिया भट्टनं वाढदिवसानिमित्त बहिण शाहीन भट्ट्ला दिल्या शुभेच्छा