ETV Bharat / entertainment

Anil Kapoor Animal first look : 'अ‍ॅनिमल का बाप बलबीर सिंग'... अनिल कपूरचा 'अ‍ॅनिमल' फर्स्ट लूक - Sandip Reddy Vangas film Animals

Anil Kapoor Animal first look : 'अ‍ॅनिमल' हा संदीप रेड्डी वंगा दिग्दर्शित चित्रपट १ डिसेंबरला प्रदर्शित होतोय. या बहुप्रतीक्षित चित्रपटात रणबीर कपूर मुख्य नायकाची भूमिका साकारतोय. यात अनिल कपूरही महत्त्वाची भूमिका करतोय. त्याचा फर्स्ट समोर आला असून नवं पोस्टरही निर्मात्यांनी जारी केलंय.

Anil Kapoor Animal first look
अनिल कपूरचा 'अ‍ॅनिमल' फर्स्ट लूक
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Sep 22, 2023, 10:27 AM IST

मुंबई - Anil Kapoor Animal first look : 'अ‍ॅनिमल' या आगामी अ‍ॅक्शन चित्रपटातील अनिल कपूरचा फर्स्ट लूक समोर आलाय. चित्रपटाच्या फर्स्ट लूक पोस्टरचं अनावरण करण्यात आलंय. हे पोस्टर इन्स्टाग्रामवर चाहत्यांसाठी शेअर करत अनिलनं कॅप्शनमध्ये लिहिलंय, 'अ‍ॅनिमल का बाप..बलबीर सिंग!.' या पोस्टरमध्ये अनिल कपूर छातीवर पट्टी बांधून खुर्चीवर गंभीर लूकमध्ये बसलेला दिसतोय. या चित्रपटात तो बलबीर सिंगची भूमिका साकारतोय.

संदीप रेड्डी वंगा दिग्दर्शित 'अ‍ॅनिमल' चित्रपटात रणबीर कपूर, बॉबी देओल आणि रश्मिका मंदान्ना यांच्या प्रमुख भूमिका आहेत. अभिनेता रणबीर कपूरच्या वाढदिवसानिमित्त या चित्रपटाचा टीझर २८ सप्टेंबर रोजी प्रदर्शित केला जाणाराय.

'अ‍ॅनिमल' चित्रपटाबद्दलची उत्सुकता वाढीस लागली असताना निर्मात्यांनी अलिकडेच रणबीर कपूरचे फर्स्ट लूक पोस्टर जारी केलं होतं. या पोस्टरमध्ये निळ्या रंगाचा सूत घातलेला रणबीर सिगारेट ओढताना दिसत असून त्याने हातात लायटर पकडलाय. त्यानं आपले केस लांब सोडले असून डोळ्यावर सनग्लासेस घातल्याचं दिसतंय.

तत्पूर्वी, 'अ‍ॅनिमल'च्या निर्मात्यांनी चित्रपटाचा प्री-टीझर लॉन्च केला होता. व्हिडिओची सुरुवात अनेक लोकांपासून होते, यात कवटी असलेले मुखवटे, पांढरा शर्ट, काळा कमरकोट आणि टाय घातलेले लोक दिसतात. नायक रणबीर कपूरही मुखवट्यासह दिसत असून त्यानं पांढरा शर्ट आणि लुंगी नेसली आहे. त्याच्या हातात कुऱ्हाड असून तो टीझरमध्ये शत्रूंच्या मुखवट्यांवर प्रहार करतताना दिसतो. त्याचा आक्रमक अवतार पाहून विरोधकांची पळता भुई थोडी होऊन जाते.

हिंदी, तेलगू, तामिळ, कन्नड, मल्याळम या पाच भाषांमध्ये ‘अ‍ॅनिमल’ 1 डिसेंबरला थिएटरमध्ये प्रदर्शित केला जाणार आहे. दरम्यान, अनिल कपूर आगामी एरियल अ‍ॅक्शन थ्रिलर असलेल्या ‘फायटर’ चित्रपटामध्ये हृतिक रोशन आणि दीपिका पदुकोणसोबत काम करतोय.

‘अ‍ॅनिमल’ चित्रपटामध्ये रणबीर कपूर एका राकट भूमिकेत झळकणार आहे. यात तो घनघोर फाईट करताना दिसेल. यासाठी त्याच्या शरीरात बदल करणे आवश्यक होतं. यासाठी त्यानं सेलेब्रिटी जिम ट्रेनर शिवमची मदत घेतलीय. त्याच्या इन्स्ट्रक्शनखाली तो जिममध्ये घाम गाळतोय. तू झूटी मैं मक्कार चित्रपटानंतर रणबीरला शरीराच्या स्नायूंमध्ये वाढ करायची होती. त्यानुसार त्याच्या सौष्ठवात मोठा बदल झाल्याचं दिसून येतंय. याचं सर्व श्रेय तो जिम ट्रेन शिवमला देतोय.

हेही वाचा -

१. Rashmika Mandanna Trolled : रश्मिका मंदान्ना ड्रेसवरुन ट्रोल, पाहा तिचा एअरपोर्ट लूक

२. Sara Ali Visited Kartiks Home : कार्तिक आर्यनच्या घरी सारा अली खान, तर्क वितर्कांना उत

३. Shilpa Shetty Ganesh Immersion : नाशिकच्या ऑल गर्ल ढोल बँडच्या जल्लोषात शिल्पा शेट्टी कुंद्राच्या घरच्या बाप्पाचं विसर्जन!

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.