ETV Bharat / entertainment

Ananya Panday invites troll : मनजोत सिंगपासून फोटोसाठी दूर गेल्याने अनन्या पांडेने दिले ट्रोलर्सना आमंत्रण - Ananya Panday invites troll

'ड्रीम २' चित्रपटाच्या प्रमोशन दरम्यान फोटो काढताना अनन्या पांडे मनजोत सिंगपासून दूर गेली. त्यामुळे ट्रोलर्स तिच्यावर टीका करत आहेत. पण वस्तुस्थिती पाहून अनेकजण तिच्या समर्थनार्ही आले आहेत.

Ananya Panday invites troll
अनन्या पांडेने दिले ट्रोलर्सना आमंत्रण
author img

By

Published : Aug 14, 2023, 5:45 PM IST

मुंबई - अभिनेत्री अनन्या पांडे आणि आयुष्मान खुराना आगामी 'ड्रीम गर्ल २' चित्रपटामध्ये मुख्य भूमिका साकारत आहेत. सध्या या चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये दोघेही गुंतले आहेत. या काळातला एक व्हिडिओ रविवारी सोशल मीडियावर व्हायरल झाला. या व्हिडिओवर अनन्या ट्रोलर्स आर्मी भडकल्याचे दिसत आहे.

व्हायरल व्हिडिओमध्ये फोटो सेशन दरम्यान अनन्या, आयुष्मान आणि ड्रीम 'गर्ल 2' चित्रपटाचा सह-अभिनेता मनजोत सिंगपासून दूर जाताना दिसली. या फोटोच्या वेळी जो वारा सुटला होता त्यात धुळ होती व अनन्याच्या डोळ्यात जात असल्यामुळे तिला त्रास होत होता. खरंतर म्हणून ती दूर गेली. पण ट्रोलर्सनी याचा वेगळा अर्थ काढला. तिला मनजोतच्या शेजारी उभे राहायचे नव्हते म्हणून ती दूर गेल्याचा दावा ट्रोलर्सनी केला आहे.

अनन्याने मनजोतचा सार्वजनिक ठिकाणी अपमान केल्याचे एका युजरने लिहिले आहे. तर अनन्याचे समर्थन करत असेलेल्या युजर्सनी डोळे उघडून पाहा नेमके काय घडतंय असे, म्हणत तिने डोळ्यावर धुळीला रोखण्यासाठी धरलेला हात दाखवला आहे. तिला त्रास होत होता म्हणूनच ती दूर गेल्याचे सांगत, तिला पाठींबा दिला आहे. मात्र निघण्यापूर्वी काही तरी बोलून तिने बाजूला व्हायला पाहिजे होते, असे म्हणत काहीजण तिच्यावर टीका करत आहेत.

'ड्रीम गर्ल 2' हा चित्रपट पहिल्या भागाला मिळालेल्या चांगल्या प्रतिसादामुळे प्रेक्षकांच्या भेटीस आणण्यात आला आहे. या चित्रपटाचा पहिला भाग २०१९ मध्ये रिलीज झाला होता. राज शांडिल्य यांनी या चित्रपटाचे दिग्दर्शन केले होते आणि एकता कपूरने चित्रपटाची निर्मिती केली होती. चित्रपटाचा सीक्वेल येत्या २५ ऑगस्टला थिएटरमध्ये रिलीज होणार आहे.

या चित्रपटाची कथा विनोदी पद्धतीने मांडण्यात आली आहे. आयुष्मान मुलीच्या आवाजात पूजा बनून लोकांशी संवाद साधत असतो. यात त्याला अनेक बकरे भेटतात आणि कथाच्या प्रवासात बरीच धमाल होते. 'ड्रीम गर्ल २' च्या ट्रेलरमध्ये ही धमाल दिसल्यामुळे चित्रपटाबद्दलचा उत्सह चाहत्यांमध्ये अधिक आहे.

हेही वाचा -

१. Operation Valentine release date : वरुण तेज आणि मानुषी छिल्लर स्टारर 'ऑपरेशन व्हॅलेंटाईन'च्या रिलीजची तारीख जाहीर

२. Sanjay Dutt : 'डबल इस्मार्ट' चित्रपटाच्या सेटवर संजय दत्त जखमी

३. Kangana Ranaut : कंगना रणौतने 'चंद्रमुखी २'मध्ये केले भरतनाट्यम ; पण नृत्यामुळे झाली ट्रोल

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.