ETV Bharat / entertainment

Ananya Panday celebrates Halloween : वाढदिवसानंतर अनन्यानं मालदीवमध्ये साजरं केलं हॅलोविन, आदित्य रॉय कपूर सोबत असल्याची चर्चा - अभिनेत्री अनन्या पांडे वाढदिवस

Ananya Panday celebrates Halloween : अभिनेत्री अनन्या पांडेनं तिच्या 25 व्या वाढदिवसाचं सेलेब्रिशन मालदीवमध्ये अतिशय उत्साहात केलं. यावेळी तिच्यासोबत तिचा कथित प्रियकर आदित्य रॉय कपूर असल्याची चर्चाही रंगली आहे. दोघेही मालदीवला जाण्यासाठी मुंबई विमानतळावर जाताना वेगवेगळे दिसले होते.

Ananya Panday celebrates Halloween
अनन्यानं मालदीवमध्ये साजरं केलं हॅलोविन
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Nov 1, 2023, 8:25 PM IST

मुंबई - Ananya Panday celebrates Halloween : बॉलिवूड अभिनेत्री अनन्या पांडेनं, तिचा 25 वा वाढदिवस मालदिवच्या समुद्र किनाऱ्यावर रोमँटिक वातावरणात साजरा केला. तिच्यासोबत तिचा कथित प्रियकर आदित्य रॉय कपूर असल्याची चर्चाही रंगली आहे. वाढदिवसाच्या सेलेब्रिशननंतर अनन्यानं तिच्या हॅलोविन उत्सवाची झलक शेअर केलीय.

बुधवारी सकाळी अनन्यानं तिच्या इंस्टाग्रामवर, काल रात्री पार पडलेल्या बर्थडे सेलेब्रिशनचे फोटो अपलोड केलेत. यावेळी तिनं पांढरा टँक टॉप परिधान करत मालदीवमधील समुद्रकिनाऱ्यावर टिपलेल्या क्लोज-अप शॉट्सची स्ट्रिंग पोस्ट केली आहे. सुंदर फोटोंसाठी तिनं कॅप्शन देताना लिहिलंय, 'समुद्रकिनाऱ्यावर एक डायन, स्पेशल स्पेशल हॅलोवीन.'

तिच्या हॅलोविन फोटोवर अनेक प्रतिक्रिया येत आहेत. एका चाहत्यांना म्हटलंय, 'खूप सुंदर आणि छान दिसत आहेस, फक्त एक WOOOOWW आनंदी हॅलोवीन आहे.' इतरांनी तिच्या मोहित करणाऱ्या सौंदर्याची प्रशंसा केलीय आणि तिला हॅलोविनच्या शुभेच्छा दिल्या. तिला सदिच्छा देणाऱ्यामध्ये अनन्याची आई भावना पांडे देखील सामील झाली आणि कमेंट विभागात लाल हार्ट इमोजी टाकून तिनं आपलं प्रेम व्यक्त केलंय.

अलीकडेच, अनन्या आणि आदित्य यांना मुंबई विमानतळावर स्वतंत्रपणे जाताना पापाराझींनी आपल्या कॅमेऱ्यात कैद केलं होतं. दोघेही विमानतळावर स्पॉट होण्यापूर्वी एकत्र डिनर घेतानाही दिसले होते. विशेष म्हणजे, दोघांनीही योगायोगाने सारखेच काळे पोशाख परिधान करत सहवासाचा आनंद घेत गप्पा गोष्टी केल्या होत्या.

अनन्या पांडेनं 30 ऑक्टोबरला आपला 25 वा वाढदिवस साजरा केला. तिच्यावर सहकलाकार, चाहते आणि कुटुंबीयांनी प्रेम संदेशांचा वर्षाव केला होता. तिच्या खास मैत्रीणी शनाया कपूर आणि सुहाना खान यांनी तिला भरभरुन शुभेच्छा दिल्या. वडील चंकी पांडे आणि आई भावना पांडेनंही लेकीच्या वाढदिवसाला प्रेम व्यक्त करुन संदेश दिला होता. अनन्यानं मालदीवमध्ये पोहोचल्यानंतर सुंदर फोटो आणि व्हिडिओ शेअर करुन बर्थडे सेलेब्रिशन जोरदार होणार असल्याचे संकेत दिले होते. मालदीवच्या सुंदर किनाऱ्यावर आलिशान रेसॉर्टमध्ये तिनं आपल्या मुक्काम केलाय. या ठिकाणी असलेल्या रेस्टॉरंटच्या स्टाफनंही तिचं जोरदार स्वागत केलं. इतकंच नाही तर वाद्यांसह तिच्यासाठी बर्थडे सॉन्गही गायले.

हेही वाचा -

1. Thangalaan Teaser : विक्रम स्टारर 'थंगालन'चा टीझर प्रदर्शित; पाहा व्हिडिओ

2. Pahlaj Nihalani Visits Sai Temple : पहलाज निहलानी साई चरणी नतमस्तक, 'अनारी इज बॅक'च्या यशासाठी केली प्रार्थना

3. Saba Azad Birthday : गर्लफ्रेंड सबा आझादसोबतचे साधे क्षणही हृतिक रोशनला वाटतात जादुई

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.