ETV Bharat / entertainment

Ananya Panday and Aditya Roy Kapur : अनन्या पांडे आणि आदित्य रॉय कपूर अज्ञातस्थळी रवाना... - आदित्य आणि अनन्या अज्ञात स्थळी झाले रवाना

आदित्य रॉय कपूर आणि अनन्या पांडे पुन्हा एकदा चर्चेत आले आहे. नुकतेच हे दोघे मुंबई विमानतळावर स्पॉट झाले आहेत. यापूर्वी आदित्य आणि अनन्या 'ड्रीम गर्ल-2'च्या स्पेशल स्क्रिनिंगमध्ये एकत्र दिसले होते.

Ananya Panday and Aditya Roy Kapur
अनन्या पांडे आणि आदित्य रॉय कपूर
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Aug 27, 2023, 4:25 PM IST

मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री अनन्या पांडे सध्या 'ड्रीम गर्ल 2' या चित्रपटामुळे चर्चेत आहे. अनन्याचा हा चित्रपट 25 ऑगस्ट रोजी रूपेरी पडद्यावर प्रदर्शित झाला. या चित्रपटाने 2 दिवसात खूप चांगली कमाई बॉक्स ऑफिसवर केली आहे. या चित्रपटाला चाहत्यांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. दरम्यान, अनन्या ही बॉयफ्रेंड आदित्य रॉय कपूरसोबत मुंबई बाहेर फिरायला गेली असल्याचे समजत आहे. नुकतेच दोघेही मुंबई विमानतळावर स्पॉट झाले. हे दोघेही वेगवेगळ्या वेळेवर मुंबई विमानतळावर दिसले आहेत, मात्र दोघांचे व्हिडिओ पाहून असा अंदाज लावला जात आहे की, रूम्ड कपल हे एकत्र वेळ घालविण्यासाठी बाहेर जात आहे.

अनन्या आणि आदित्य झाले एकत्र स्पॉट : अनन्या पांडे आणि आदित्य रॉय कपूर यांचा हा व्हिडिओ पापाराझीने आपल्या इंस्टाग्रामवर शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये दोघे कॅज्युअल लूकमध्ये दिसत आहे. अनन्याने पांढऱ्या रंगाचे टॉप आणि कार्गो पॅन्टसह गॉगल घातला आहे. याशिवाय आदित्य राखाडी पॅन्ट, चेक शर्ट, स्नीकर्ससह गॉगलमध्ये दिसत आहे. काही महिन्यांपूर्वी अनन्या आणि आदित्य स्पेनमध्ये दिसले होते. जिथे दोघांनी रोमँटिक पोझ देत फोटो क्लिक केले होते. आता असा अंदाज वर्तवला जात आहे की, हे रूम्ड कपल पुन्हा एकदा एकत्र सुट्टीवर गेले आहेत.

स्पेशल स्क्रिनिंगम : 'ड्रीम गर्ल-2' च्या स्क्रिनिंगमध्ये आदित्य देखील दिसला होता. हा कार्यक्रम गेल्या आठवड्यात आयोजित करण्यात आला होता, ज्यामध्ये चित्रपटाचा मुख्य अभिनेता आयुष्मान खुराना आणि त्याची पत्नी ताहिरा कश्यप, नव्या नंदा, शनाया कपूर, सनी कौशल, सुहाना खान, चंकी पांडे आणि अनेकजण उपस्थित होते. हा चित्रपट पाहिल्यानंतर आदित्यने पापाराझींनाही आपला रिव्ह्यू देऊन चित्रपटाला हिट म्हटले होते. 'ड्रीम गर्ल 2'ने रिलीज झाल्यानंतर दोन दिवसांत 24 कोटी कमाविले आहे. यासह हा चित्रपट आयुष्मान खुरानाच्या कारकिर्दीतील सर्वाधिक ओपनिंग करणारा चित्रपट ठरला आहे.

अनन्या आणि आदित्यचा वर्कफ्रंट : अनन्या पांडे 'खो गये हम कहाँ' या चित्रपटात दिसणार आहे. तर दुसरीकडे आदित्य रॉय कपूरच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचे झाले तर तो अलीकडेच 'द नाईट मॅनेजर 2' या वेब सीरिजमध्ये दिसला होता. आता यानंतर तो 'मेट्रो इन दिनो' या चित्रपटात दिसणार आहे. हा चित्रपट 2024 मध्ये प्रदर्शित होणार आहे.

हेही वाचा :

  1. Rakhi Sawant First Umrah Video : राखी सावंत त्या व्हिडिओनंतर झाली ट्रोल, प्रेक्षक म्हणाले नाटक...
  2. Dream girl २ movie box office collection day २ :'ड्रीम गर्ल २ ' च्या पुजाचा बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ, किती केली कमाई?
  3. Sidharth Malhotra And Kiara Advani : राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार मिळाल्यानंतर प्रथमच सिद्धार्थ आणि कियारा दिसले एकत्र, पहा त्यांचा लूक

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.