ETV Bharat / entertainment

An end to Seema Haider speculations : बिग बॉस आणि कपिल शर्मामध्ये जाणार नसल्याचा सीमा हैदराचा खुलासा - सीमा हैदरची चौकशी जारी

An end to Seema Haider speculations : पाकिस्तानी महिला सीमा हैदर आणि सचिन लोकप्रिय शो बिग बॉस आणि कपिल शर्मामध्ये जाणार असल्याच्या चर्चा काही दिवसापासून रंगल्या होत्या. मात्र चौकशी सुरू असल्यामुळे या शोमध्ये जाणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे. सीमानेच एक व्हिडिओ शेअर करुन या अटकळांना पूर्णविराम दिला.

Etv Bharat
Etv Bharat
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Aug 31, 2023, 8:06 PM IST

An end to Seema Haider speculations : नवी दिल्ली/ग्रेटर नोएडा - पाकिस्तानी महिला सीमा हैदर तिच्या भारतात प्रवेशानंतर बरीच चर्चेत आहे. तिला सोशल मीडियासह सर्वच माध्यमातून अनपेक्षित प्रसिद्धी दिली जात आहे. अनेक वाहिन्या तिच्यासाठी आपला महत्त्वाचा वेळ खर्ची करताना दिसतात. अशावेळी ती बिग बॉसमध्ये प्रवेश करणार अशा वावड्या काही दिवसापासून उठल्या होत्या. इतकेच नाही तर कपिल शर्मा शोमध्ये जाण्यासाठी सर्व सेलेब्रिटी तडफडत असतात त्या शोमध्येही ती झळकणार असल्याच्या बातम्या झळकल्या होत्या. या पार्श्वभूमीवर सीमाने एक व्हिडिओ जारी करुन यासंबंधी खुलासा केला आहे

पाकिस्तानी महिला सीमा गुलाम हैदरने एक व्हिडीओ जारी करून सांगितले की, कपिल शर्मा शो आणि बिग बॉसमध्ये या दोन कार्यक्रमांना सध्या उपस्थित राहण्याचा तिचा कोणताही विचार नाही. भविष्यात या दोन्ही शोमध्ये जाण्याचा विचार केला तर तो आपल्या सर्वांना नक्की कळवेन, असे तिने सांगितले आहे. गेल्या काही दिवसापासून या बातम्यांचे चर्चा चर्वण सुरू होते. अखेर गुरुवारी सीमाने एक व्हिडिओ जारी करत या अटकळांना पूर्ण विराम दिला.

सीमा हैदरची चौकशी जारी - सीमा हैदरचे वकीलने तिला बिग बॉसमध्ये आणि कपिल शर्मा शोमध्ये बोलवणे आल्याची माहिती दिली होती. मात्र कायदेशीरदृष्ठ्या तिला भाग घेणे शक्य होणार नाही. दोन्ही कार्यक्रम मनोरंजक आहेत. त्यामुळे त्यांना नकार देण्याचा विषय नाही. पण सध्याची स्थिती पाहता हे शक्य होणार नसल्याचेही वकिलाने सांगतले.

सीमा हैदरला मिळाली होती चित्रपटाची ऑफर - आपल्याकडे कशाही प्रकारे व्यक्ती चर्चेत आली तर त्याला लोकप्रियता मिळते. निगेटिव्ह पब्लिसिटीदेखील पब्लिसिटीच मानली जाते. त्या प्रमाणे सीमा हैदरला मिळालेल्या प्रसिद्धीचा लाभ घेण्याचा किंवा त्याअनुषंगाने स्वत: प्रसिद्धीत येण्याचा प्रयत्न होत असतो. अमित जानी नामक एका निर्मात्याने सीमा हैदराच्या पाकिस्तान ते भारत प्रवासावर आधारित 'कराची टू नोएडा' हा चित्रपट बनवणार असल्याचे जाहीर केले आहे. त्याला यात सीमा हैदरलाच प्रमुख भूमिकेत घ्यायचे आहे. मात्र ती चौकशाच्या फेऱ्यात अडकल्यामुळे चित्रपटाची निर्मिती सुरू झाली नसल्याचा दावा निर्मात्याकड़ून केला जातोय.

हेही वाचा -

१. Jawan Trailer SRK Dialogue : 'बेटे को हाथ लगाने से पहले...', शाहरुखच्या डायलॉगवर लोक म्हणतात, समझदार को इशारा काफी है!

२. Jawan trailer viewers reaction : 'जवान'च्या रोमांचक ट्रेलरवर प्रेक्षकांच्या उत्स्फुर्त प्रतिक्रिया

३. trailer of Jawan : 'जवान' चित्रपटाचा बहुप्रतीक्षित ट्रेलर रिलीज, शाहरुखच्या अ‍ॅक्शनसवर चाहते फिदा

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.