ETV Bharat / entertainment

Amitabh Bachchan Tweet On Blue Tick : ए ट्विटर खेल खतम, पैसे हजम.. बिग बींनी पुन्हा घेतली ट्विटरची फिरकी - ट्विट

बीग बी अमिताभ बच्चन यांनी ट्विटरच्या ब्लू टिकसाठी पैसे मोजले आहेत. मात्र ट्विटरने एक मिलियन फॉलोअर्स असलेल्या वापरकर्त्यांना ब्लू टिक मोफत देण्याचे जाहीर केले. त्यामुळे अमिताभ बच्चन यांनी ट्विटरवर मजेदार शैली ट्विटरच्या धोरणावर निशाणा साधला आहे.

Amitabh Bachchan Tweet On Blue Tick
अमिताभ बच्चन यांचे संग्रहित छायाचित्र
author img

By

Published : Apr 24, 2023, 8:47 AM IST

हैदराबाद : बिग बी अमिताभ बच्चन यांनी ब्लू टिक गेल्यानंतर मजेदार ट्विट करत ट्विटरची चांगलीच फिरकी घेतली होती. त्यानंतर त्यांची ब्लू टिक ट्विटरकडून परत करण्यात आली होती. याबाबत तू चीझ बडी है मस्क मस्क म्हणत अमिताभ बच्चन यांनी ट्विटरसह एलन मस्कचे आभार मानले होते. मात्र आता पुन्हा बीग बी अमिताभ बच्चन यांनी ट्विटरची फिरकी घेतली असून ट्विटरने पैसे हजम केल्याचा आरोपही केला आहे.

ट्विटरने केले पैसे हजम : ट्विटरने आपल्या नवीन धोरणानुसार ब्लू टिक काढून टाकल्या असून ब्लू टिक हवी असल्यास पैसे भरावे लागणार आहेत. त्यासाठी बिग बी अमिताभ बच्चन यांनी पैसेही भरले आहेत. मात्र ट्विटरच्या धोरणानुसार 1 मिलियन फॉलोअर्स असल्यास ट्विटर ब्लू टिक मोफत देणार असल्याचे एलॉन मस्क यांनी जाहीर केले आहे. अमिताभ बच्चन यांचे ट्विटरवर तब्बल 48.4 मिलियन फॉलोअर्स आहेत. मात्र तरीही अमिताभ बच्चन यांना ब्लू टिकसाठी पैसे भरावे लागले आहेत. त्यामुळे अमिताभ बच्चन यांनी पुन्हा ट्विटरवर मजेदार ट्विट करत निशाणा साधला आहे.

  • T 4627 - अरे मारे गये गुलफाम , बिरज में मारे गये गुलफाम 🎶

    ए ! Twitter मौसी, चाची, बहनी, ताई, बुआ .. झौआ भर के त नाम हैं तुम्हार ! पैसे भरवा लियो हमार, नील कमल ख़ातिर ✔️ अब कहत हो जेकर 1 m follower उनकर नील कमल free म
    हमार तो 48.4 m हैं , अब ??
    खेल खतम, पैसा हजम ?!😳

    — Amitabh Bachchan (@SrBachchan) April 23, 2023 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

अमिताभ बच्चन यांचे मजेदार ट्विट : एक मिलियन ट्विटरवर फॉलोअर्स असल्यानंतर ट्विटर ब्लू टिक मोफत देणार असल्याचे एलन मस्क यांनी जाहीर केले होते. मात्र अमिताभ बच्चन यांनी ब्लू टिकसाठी पैसे मोजले आहेत. त्यामुळे अमिताभ बच्चन यांनी ए ट्विटर मौसी, बुआ ट्विटर किती नावे आहेत ट्विटरचे, माझ्याकडून तुम्ही ब्लू टिकसाठी पैसे भरुन घेतले. मात्र एक मिलियन फॉलोअर्सला तुम्ही मोफत ब्लू टिक देण्याचे जाहीर केले. माझे तर 48.4 मिलियन फॉलोअर्स आहेत. तरी माझ्याकडून पैसे घेतले. खेल खतम, पैसे हजम. असे मजेदार टिवट करत अमिताभ बच्चन यांनी ट्विटरवर निशाना साधला आहे.

काय आहे ट्विटरचे धोरण : ट्विटरने आपल्या नवीन धोरणानुसार ब्लू टिक आपल्या खात्यावर वापरण्यासाठी पैसे मोजावे लागण्याचे धोरण एलॉन मस्क यांनी जाहीर केले होते. एक एप्रिलपासून हे नवीन धोरण लागू होणार होते. मात्र त्यानंतर एलन मस्क यांनी 20 एप्रिलपासून हे धोरण लागू करण्याचे जाहीर केले. त्यामुळे 20 एप्रिलपासून अनेक दिग्गजांच्या खात्यावरुन ब्लू टिक काढून टाकण्यात आल्या आहेत.

हेही वाचा - Sachin Tendulkar Birthday : क्रिकेटचा देव सचिन तेंडुलकरने गाठले वयाचे अर्धशतक, एमसीए देणार मोठे गिफ्ट

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.