मुंबई Amitabh Bachchan Buy Plot in Ayodhya : राम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्यापूर्वी अमिताभ बच्चन यांनी अयोध्येत घर बांधण्याचा निर्णय घेतलाय. अमिताभ यांनी अयोध्येत 14.5 कोटी रुपयांची जमीन खरेदी केलीय. मिळालेल्या माहितीनुसार, अमिताभ बच्चन यांनी मुंबईस्थित 'डेव्हलपर द हाऊस ऑफ अभिनंदन लोढा' यांच्याकडून सेव्हन स्टार टाऊनशिप 'सरयू एन्क्लेव्ह'मध्ये जमीन खरेदी केलीय. ही जमीन राम मंदिरापासून अवघ्या 15 मिनिटांच्या अंतरावर आहे. याशिवाय अयोध्या विमानतळपासून 'सरयू एन्क्लेव्ह' 30 मिनिटांच्या अंतरावर आहे.
अमिताभ बच्चन यांचं अयोध्येत होणार घर : मिळालेल्या माहितीनुसार, अयोध्येत अमिताभ बच्चन हे 10 हजार चौरस फुटामध्ये घर बांधणार आहेत. 22 जानेवारीला राम मंदिरात अभिषेक सोहळा होत आहे. याच दिवशी 'सरयू एन्क्लेव्ह'चं उद्घाटन होणार आहे.
बच्चन यांनी खरेदी केलेल्या जमिनीची किंमत : सध्या सर्वत्र २२ जानेवारीला होणाऱ्या अयोध्येतील राम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्याची जोरदार चर्चा सुरु आहे. भारतवासीय या ऐतिहासिक सोहळ्यासाठी प्रचंड उत्सुक आहेत. या कार्यक्रमाची जय्यत तयारी अयोध्येत सुरु आहे. या सोहळ्यासाठी देशभरातील विविध मान्यवरांना निमंत्रण देण्यात आलंय. हा सोहळा भव्यदिव्य करण्यासाठी सर्वच स्तरातून रामनगरीमध्ये युद्धपातळीवर काम सुरू आहे. आता याच अयोध्यानगरीत अमिताभ बच्चन यांनी जमीन खरेदी केलीय. सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, बच्चन यांनी तब्बल 14.5 कोटी रुपये खर्च करून ही जमीन खरेदी केलीय. याबाबत अधिकृत दुजोरा मिळालेला नाही.
राम मंदिर सोहळ्याचं अमिताभ यांना निमंत्रण : अमिताभ बच्चन वर्क फ्रंट : अमिताभ बच्चन यांचा जन्म प्रयागराज येथे झाला होता. प्रयागराज ते अयोध्यापर्यंतचा प्रवास 4 तासांचा आहे. 'सरयू एन्क्लेव्ह'चा हा प्रोजेक्ट मार्च 2028 पर्यंत पूर्ण होणे अपेक्षित आहे. बिग बी यांना 22 जानेवारीला अयोध्या राम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्यात येण्याचं निमंत्रणही देण्यात आलंय. या कार्यक्रमात अमिताभ यांच्याशिवाय रजनीकांत, अक्षय कुमार, जॅकी श्रॉफ, टायगर श्रॉफ, रणबीर कपूर, आलिया भट्ट, रणदीप हुड्डा-लिन लैश्राम, कंगना रणौत, राजकुमार हिरानी, अनुपम खेर, माधुरी दीक्षित, सनी देओल, आयुष्मान खुराना, संजय लेशम या स्टार्सला देखील आमंत्रित करण्यात आलंय.
हेही वाचा :